Posts

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

Image
घराचा हप्ता रश्मी झोपाळ्यावर बसून छानपैकी कॉफीचा आस्वाद घेत होती. नुकताच त्यांनी काही वर्षांपूर्वी शहरापासून थोडे लांब, एका आटोपशीर टाऊनशिप मध्ये छानसा फ्लॅट घेतला होता. आजूबाजूला भरपूर झाडे असल्याने उन्हाळा जाणवत नव्हता. पुढच्या बाजूला छोटीशी गुलाबाची बागही होती. मार्च महिना असूनही वातावरणात गारवा होता. कॉफीचा मग घेऊन तुषारही झोपाळ्यावर येऊन बसला. वातावरण एकदम मूडी झाले होते. "तु ऽऽऽषार!" रश्मी लटक्या रागात झोपाळ्यावरून उठून सज्जाकडे जाऊन उभी राहिली. "गेली तीन वर्षे आपण कुठेही फिरायला गेलो नाही." "तू आता एकदमच बदलून गेला आहेस!" "You are changed!" "O sss H No Rashmi! असे काही नाही." तुषार तिच्या जवळ जात म्हणाला. "तुला कल्पना आहे, आपण घराचे लोन पूर्ण फेडल्याशिवाय अवाजवी खर्च करणार नाही आहोत. म्हणूनच आपण EMI देखील दुप्पट केला आहे." "हे आपण नाही तू ठरवले आहेस" इति रश्मी. मंडळी! पुढचे संवाद काय असतील आणि शेवट काय...

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

Image
"काय, १ करोड? प्रसंग पहिला: काय, फक्त १ करोड? नाही... नाही शक्यच नाही! अरे सहा महिन्यापूर्वीच बाजूचा प्लॉट दीड करोड पेक्षा जास्तीने गेला. आता आम्हाला गरज आहे म्हणून एवढ्या कमी किंमतीत, शक्यच नाही. प्रसंग दुसरा: "हॅलो आई, माझा आवाज नीट ऐकू येतो आहे का?" अमेरिकेतून प्रशांतचा फोन. "हो, बोला प्रशांत" आई उत्तरली. "अगं, त्या मुरबाडच्या प्लॉट चे काय करायचे?" "अरे! तू ठरवलं आहेस ना विकायचा मग विकून टाकू. शेजारचे परांजपे घ्यायला तयार आहेत आणि किंमत पण बरी मिळते आहे." " अगं हो आई, पण टॅक्स जाऊन जास्ती काही शिल्लक राहणार नाही". इती प्रशांत. "अरे, बापरे!" प्रशांतच्या आईने दीर्घ उसासा टाकला. मंडळी, आर्थिक गुंतवणूक ही पुढील खर्चाचे नियोजन असते आणि स्वाभाविकपणे ते स्वतःसाठी असते तसेच ते नियोजन आपल्या प्रियजनांसाठीही असते. आता प्रत्येक प्रिय व्यक्...

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

Image
प्रिमियम मेम्बरशिप "साहेब ७ लाखाची हॉलिडे रिसॉर्टची प्रिमियम मेंबरशिप घेतली आहे. आता हे ४ दिवस नाही वापरले तर फुकट जातील. मित्राला सांगितले होते पण त्याला जमत नाही, म्हणून आता मला जावे लागते आहे." नमस्कार मंडळी!! हा आमचा अभय. वय वर्ष ३५ च्या आसपास. दोन मुले व पत्नी असे चौकोनी कुटुंब. अभय, कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती. मंडळी, अनावश्यक खर्च कसे अलगदपणे आपल्याला मिठीत घेतात ह्याचे हे उत्तम उदाहरण. आपल्या प्रियजनांसोबत उत्तम जीवनशैलीचा आनंद घ्यावा ही इच्छा दिवसेंदिवस प्रबळ होत आहे, आणि तशी इच्छा प्रबळ होण्याच्या दृष्टीने मार्केटिंग पण केले जात आहे. अशा मार्केटिंगचा सारासार विचार न करता आपण त्याला भुलत जात आहोत. 'जीवन छानपैकी, मजेत जगण्यासाठी खर्च हा केलाच पाहिजे आणि अत्ता तरुणपणी मजा नाही करायची तर केव्हा?' या विचारसरणीत, कर्ज काढून हप्त्याने आपल्या आवाक्यात नसलेली जीवनशैली जगण्यात आनंद शोधणे हे तरुणाईचे गीत झाले आहे. घराचा हप्ता, कारचा हप्ता, हा आहेच पण ...

Blog 28 - 'Age 60 Years'

Image
“Hello, Did you get the claim file from Mr. Deshpande?” “Please check the case papers” “ The case is a bit complicated” Ashokrao was instructing his staff. This is our Ashokrao, age – 60 plus, but yet so energetic, he would run to catch the local train and munch on mutton like a youngster. He spent his youth searching for a job and traveling by train. Because his father lost his job abruptly, he had to shoulder the responsibility of the family a bit too early. He was never satisfied with his job. He could never come to terms with the shift duties, untimely meals, irregular sleeping patterns, and frequent changes in the weekly offs. All was chaos. Fortunately, he got an opportunity in a business, and he made a fortune out of it. In a very short span, he had uplifted his monetary status, and his lifestyle got his son properly educated, and later he too joined him. Eventually, they had their own offic...

अनुदिनी २८ - 'वय वर्षे ६०'

Image
“अरे, क्लेम फाईल आणली का त्या देशपांड्यांकडून?” "जरा केस पेपर्स तपासून घ्या!" "जरा कॉम्प्लिकेटेड केस आहे!" अशोकराव आपल्या स्टाफला सूचना देत होते. हे आमचे अशोकराव, वय वर्षे ६० प्लस,पण एकदम टुणटुणीत,अजूनही धावत लोकल पकडणारे, मटणाची नळी फोडणारे. ह्यांची ऐन उमेदीची वर्षे ही नोकरी शोधण्यात आणि ट्रेन च्या प्रवासात गेली. वडिलांच्या नोकरीने दगा दिल्याने कुटुंबाची जबाबदारी अचानकपणे आणि थोडी लवकरच घ्यावी लागली.असलेल्या नोकरीत त्यांना राम, लक्ष्मण, सीता, कोणीच दिसेना. म्हणजे मंडळी, आमचे अशोकराव नोकरीत रमेनात. त्या शिफ्ट ड्युट्या,वेळी अवेळी जेवण,झोप आणि बदलणाऱ्या सुट्ट्या सगळेच अस्ताव्यस्त. योगायोगाने त्यांना व्यवसायात संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. थोड्याच कालावधीत आर्थिक स्तर उंचावला, राहणीमान सुधारले, मुलाचे शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण झाले आणि तोही त्यांना सामील झाला. बघता, बघता त्यांचे स्वतःचे कार्यालयही झाले. सर्वकाही उत्तम! अशोकरावांची गाडी रुळावर आली, त्...

अनुदिनी २७ - 'बळवंतराव आणि परीराणी'

Image
आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे! भावगीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत भावसरगम. "कोमेजून निजलेली एक परीराणी उतरलेले तोंड डोळा सुकलले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही" श्रोतेहो, आत्ताच आपण संदीप खरे व सलील कुलकर्णींनी ह्यांनी गायलेली 'दमलेल्या बाबाची कहाणी' हे..... , निवेदकाचे पुढचे बोलणे वातावरणात विरत होते. केतकीच्या कानात फक्त 'दमलेल्या बाबा ची कहाणीचे' सूर घुमत होते. डोळ्यातील टपोऱ्या थेंबातून आठवणींची गंगा वाहत होती. अश्रूंच्या त्या चवीत ती बाबासोबतच्या आठवणींची गोडी चाखत होती. बळवंतरावांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे त्यांचा घरात पाय ठरत नसे.आपल्या अश्या ह्या नोकरीमुळे आपल्या एकुलत्या एका लेकीचे व पत्नीचे हाल होऊ नयेत म्हणून ते एकटेच फिरतीवर असत. पण ज्या वेळी ते घरी असत तेव्हा ते जास्तीत जास्त वेळ केतकी सोबत घालवत. त्या धुसर दृष्यातही केतकीला पाठंगुळीवर घेऊन पळणारा, तिच्या आजारपणात जागणारा, तिला आईस्क्रीम खाऊ घ...

Blog 27 - 'Balwantrao & PariRani'

Image
This is the Mumbai station of “Akashwani” We now present the “Bhav-Sargam” programme on emotional songs. “One fairy fell asleep fully withered Disparity on face and tears in eyes dried This is the routine; nothing new today I can’t stand with a sorry face every day…………” Audience, You all just heard the song “The tale of a tired father” sung by Sandeep Khare and Salil Kulkarni. The words of the anchor were fading in the atmosphere. The lyrics of “The tale of the tired father” were echoing in the ears of Ketki. All the memories were flooding out in the form of tears in her eyes. She was reliving and tasting those sweet moments with her father in each drop of the tears. Balwantrao's job called for frequent relocation, due to which he was not able to spend time at home. Because of this nature of his job, he had opted to relocate alone and stationed his wife and only daughter ...

अनुदिनी २6 -‘अजित' / Blog 26 - 'Ajit'

Image
अजित मंद निळा प्रकाश ड्रॉइंग रुम मध्ये पसरला होता. समोरच्या खिडकीला लागूनच मोठा फिशटॅन्क ठेवला होता. खिडकीला लावलेले पडदे वाऱ्याच्या मंद झुळकीवर हलकेच झुलत होते. झुंबराचा किण-किणाट रात्रीच्या शांत वातावरणात एक लय धरत होता. त्या लयीत निरनिराळे रंगीत मासे जणू काही तालधरुन गिरक्या घेत लक्ष वेधून घेत होते. बेडरूममधून त्यांच्या या हालचाली, पळापळ बघण्यात वेळ कसा जायचा हे कळायचेच नाही. गेल्या महिन्यापासून अजितचं हे रूटीन झाले होते. अजितची ब्रेन ट्युमरची ट्रीटमेंट चालू होती. महत्वाचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. आता त्याला recovery, ला वेळ द्यायचा होता. आराम आणि वेळचे-वेळी औषधं याने तो महिन्याभरात ऑफिसला रूजू होणार होता. गेल्या काही महिन्यांपासून पगार बंद पण खर्च बेबंद होत होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ताणतणाव नव्हता. त्याने समोर आलेली परिस्थिती स्वीकारली होती; आनंदाने नाही, तर समंजसपणे. आजारपण वा दुखणे, येणे न-येणे त्याच्या हाती नव्हते, पण त्याच्याकरिता समाधानाची बाब ही होती की अश्या...

अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५ ‘ / Blog 25 - '5, 10 or 15'

Image
'अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५' अरे वा वा!! अलभ्यलाभ! सुमित च्या आई ने पूजा व तिच्या यजमानांचे स्वागत केले. पूजा सुमितच्या आईची म्हणजे अश्विनीची बालपणीची मैत्रीण. दोघीही अगदी बालवाडी पासूनच्या मैत्रिणी; मधल्या काळात काही वर्षांकरिता पूजाच्या यजमानांची दुबईला बदली झाल्याने २/३ वर्षे काही भेट नव्हती आणि आज अचानक कही न कळवता पूजा दरात उभी! “ अगं काय गं सुमितचं लग्न ठरवलंस आणि काही कळवलंच नाहीस! लटक्या रागात पूजाने विचारले. तेवढ्यात सुमित आला, हॅलो मावशी केव्हा अलीस? अरे ही बघ आत्ताच आले! आणि हे काय! लग्नाची तयारी एकदम जोरदार चाललेली दिसते!! अग हो मावशी मला आवडलेला ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’ बुक केलाय ते ही तीन दिवसांसाठी. संगीत, हळद, पण एकदम दणक्यात करणार. मेन्यू म्हणशील तर एकदम different, संगीत ला ‘चाट काउंटर’ सोबत ‘इटालियन काउंटर’ पण ठेवलंय. हळदीला मस्त हुरडा, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, चवीला झणझणीत मिरचीचा ठेचा आणि इंडो वेस्टर्न फ्युजनही आहे. ...

अनुदिनी २४, 'अप्पासाहेबांचा प्लॅन' / Blog-24, 'Appa Saheb's Plan'

Image
'अप्पासाहेबांचा प्लॅन' "भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती……." अप्पासाहेब स्तोत्र म्हणत आंघोळीहून आले. पुजेला बसण्यासाठी देवघराकडे वळताना त्यांनी सहजच हॅालमधे नजर फिरवली. मंदार कोणासोबत तरी बोलत होता. आपले जानवे टॅावेलनेपुसत ते पुजेची तयारी करू लागले. पूजा चालू असतांना त्यांच्या कानावर दोघांचे संभाषण येत होते. अप्पासाहेबांची साग्रसंगीत पूजा आटोपली आणि ते पेपर वाचत बाल्कनीत बसले. "Dad इकडे या ना!" मंदारने हाक मारली. "हं, बोल” इती अप्पासाहेब. "तुम्ही असे काही केले आहे का?" मंदारने लॅपटॉपच्या screen कडे बोट दाखवत विचारले. मंदारच्या लॅपटॅापवर हे दिसत होते. Investment : ₹ 25 Lacs Withdrawal per month : ₹ 21,000 Expected Growth rate : 7% pa Time period : 16 Years "दिसतंय का?" मंदारने त्याची खुर्ची थोडी बाजूला सरकवत विचारले. अप्पासाहेबांनी खुर्ची जवळ घेतली. हे बघा, तुम्हाला दरमहा २१,००० या...

अनुदिनी २३ - ‘चाय पे चर्चा -२’ 'Blog 23 - Chai pe Charcha - 2'

Image
'चाय पे चर्चा -२' ठाणं, ठाणं, ठाणं!!!! संदिपच्या फ़ॅब्रिकेशनच्या वर्कशॅाप मध्ये पोहोचलो. संदिपने नुकतेच हे वर्कशॅाप सुरू केले होते. आजूबाजूला ३-४ कामगार कामात व्यग्र होते. वेगवेगळे आवाज आणि फ़ॅब्रिकेशनचा गंध वातावरणात भरलेला होता. मी बाहेर संदिपच्या बोलाविण्याची वाट बघत होतो. तो फोनवर तावातावाने बोलत असल्याचे दिसत होते. माझ्याशी नजर मिळताच त्याने मला आत बोलावले. “हे बॅंकवाले काही ऐकायलाच मागत नाहीत. CC ची लिमीट वाढवून द्यायला काय नाटकं करतात ना! काय तर म्हणे तुमची बॅलन्सशीट बरोबर नाही,"  फोन ठेवत संदिप पुटपुटला. “बरं ते जाऊ दे! तू कसा आहेस” संदिपने एकदम ट्रॅक चेंज केला. “एकदम झक्कास मजेत! बरेच दिवस भेट नाही!” “हा! बरं झालं तू आलास ते, मला ह्या कामातून वेळच मिळत नाही. आत्ता ऐकलंस ना,  ह्या CC च्या लिमिट करीता मागे लागू की उद्योगधंदा बघू?” “चहा घेशील ना!” “हो”! मी उत्तरलो. “थोडक्यात काय तर सध्या तुझी आर्थिक चणचण चालू आहे”. ...

अनुदिनी -२२ 'तुळशी विवाह - विवाह' / Blog-22 'Tulsi Vivah - Vivah'

Image
'तुळशी विवाह - विवाह' नमस्कार मंडळी! कसे आहात ? कशी काय गेली दिवाळी ? खरं तर अजून दिवाळी संपलीच कुठे? अहो, अजून तुळशीचं लग्न कुठे लागलंय! काय, बरोबर ना ? आणि मंडळी तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतरच तर आपल्या जोडीदाराच्या गाठीचे, म्हणजेच लग्नाचे मुहूर्त बघायला सुरवात होते. त्यामुळे इकडे ही  दिवाळी सरत आली की दुसरीकडे नात्यातील 'सस्नेह-दिवाळीची' मुहूर्तमेढ पक्की केली जाते आणि हीच तर आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. तर, असो! मंडळी, बघता बघता 'अनुदिनी' सुरु करून एक वर्ष होत आलं की! आपल्याला हा 'संडे-ब्लॉग' आवडतो, हे कळवले व सांगितले त्या बद्दल धन्यवाद! पण, मंडळी 'आवड' ही व्यक्तीसापेक्ष बाब असते, अगदी गुंतवणूकीच्या बाबतीतही ती व्यक्ती नुसार बदलते. पण, जरी गुंतवणूकीचे ठोकताळे वेगवेगळे असले तरी, बरीचशी आर्थिक उद्दिष्टे ही सामायिक म्हणजे एकसारखी असतात, जसे की...