अनुदिनी २४, 'अप्पासाहेबांचा प्लॅन' / Blog-24, 'Appa Saheb's Plan'

'अप्पासाहेबांचा प्लॅन'

"भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती……."

अप्पासाहेब स्तोत्र म्हणत आंघोळीहून आले. पुजेला बसण्यासाठी देवघराकडे वळताना त्यांनी सहजच हॅालमधे नजर फिरवली. मंदार कोणासोबत तरी बोलत होता.

आपले जानवे टॅावेलनेपुसत ते पुजेची तयारी करू लागले. पूजा चालू असतांना त्यांच्या कानावर दोघांचे संभाषण येत होते.

अप्पासाहेबांची साग्रसंगीत पूजा आटोपली आणि ते पेपर वाचत बाल्कनीत बसले.

"Dad इकडे या ना!" मंदारने हाक मारली.

"हं, बोल” इती अप्पासाहेब.

"तुम्ही असे काही केले आहे का?"

मंदारने लॅपटॉपच्या screen कडे बोट दाखवत विचारले.

मंदारच्या लॅपटॅापवर हे दिसत होते.

  • Investment : ₹ 25 Lacs
  • Withdrawal per month : ₹ 21,000
  • Expected Growth rate : 7% pa
  • Time period : 16 Years

"दिसतंय का?" मंदारने त्याची खुर्ची थोडी बाजूला सरकवत विचारले.

अप्पासाहेबांनी खुर्ची जवळ घेतली.

हे बघा, तुम्हाला दरमहा २१,००० यातून मिळतील.

"Dad!!! तुम्ही बोलत नाही पण मी ओळखले आहे. सध्या तुम्हाला महिन्याला पैसे कमी पडत आहेत. तुमचे सामाजिक उपक्रम (social projects) अडकलेत."

"Dad, तुम्ही एव्हडं छान पैकी मला MS पर्यंत शिकवलंत, सगळी हौस-मौज पुरवलीत, आता तुमची हौस पूर्वा की!

तुमच्या पश्चात तुमचे पैसे मला नकोत, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमचे पैसे खर्च करा.

आत्ता तुमची जी FD Matured झाली आहे ना, ती तुम्ही ह्या अशा ठिकाणी गुंतवून महिन्याला एक ठराविक रक्कम घेऊ शकता.

अचानक अप्पासाहेबांच्या डोळ्या समोरचा लॅपटॉपचा स्क्रीन घुसर (faint) झाला, त्यांनी पटकन चष्मा पुसायचे निमित्य करून रुमालाने डोळे पुसले.

अरे! इथेतर आपली सगळी गुंतवलेली रक्कम संपतेय की रे? सावरून अप्पासाहेबांनी विचारलं.

"Dad, Wait!"

सगळं काही समजावून सांगतो.

मंडळी आपण काय कराल?

मंदारने जे अप्पासाहेबांना सांगितले ते आपण समजून घेऊ.

हे जे मंदारने अप्पासाहेबांना दाखवले ते Mutual Fund मधील 'Systematic Withdrawal' आहे, म्हणजे आपल्या तरूणाईच्या आवडत्या 'SIP' च्या उलट.

उलट म्हणजे कार्यप्रणालीत (in functionality) उलट!

ह्यात आपल्याला दिसत असेल की १६ वर्षांनंतर गुंतवलेल्या २५ लाख रक्कमेच्या समोर रु १,२९,८९९ एवढीच शिल्लक उरत आहे.

२५ लाखाच्या समोर अप्पासाहेबांना एकूण रू ४०,३२००० मिळाले जे त्यांनी दरमहा खर्चाच्या रूपात काढले.

अपेक्षीत ७% च्या वाढीमुळे अप्पासाहेबांना मुद्दलावर रूपये १५ लाख ३२ हजार जास्ती काढता आले.

तर, मंडळी! कसाकाय वाटला आमच्या अप्पासाहेबांचा प्लॅन?

जरूर कळवा.

'Appa Saheb's Plan'

“Bhim rupi Maharudra Vajra Hanuman Maruti…..” Appasaheb came out chanting the stotra after bathing.

He was about to start his “Pooja,” and in the hall, he saw Mandar speaking to somebody.

Wiping his ceremonial thread “Janve,” he started readying for the “Pooja.” While performing the “Pooja,” he could hear the conversation between the two.

He completed his Pooja and was sitting in the balcony reading the newspaper.

“Dad, please come here,” Mandar summoned.

“Yes, Tell me,” Appasaheb said.

“Have you done anything like this?” asked Mandar as he pointed his finger at the Laptop’s screen.

The following had shown up on Mandar’s Laptop.

  • Investment : ₹ 25 Lacs
  • Withdrawal per month : ₹ 21,000
  • Expected Growth rate : 7% pa
  • Time period : 16 Years

“Can you see it?” asked Mandar adjusting the chair for Appasaheb.

Appsaheb drew his chair closer to the Laptop.

 “See, you will get ₹ 21,000/- per month through this investment”.

“Dad!!! you didn’t tell me, but I know that you are facing a paucity of money. Your social projects are all getting held up”.

“Dad, you have reared me up so well, you have given me everything I had asked for, you have got me well educated up to M.S., now you should pursue your hobbies and interests. I don’t want your money after you go away; spend all your money as you like”.

“You can invest the amount of FD that has just matured in such a scheme and earn a fixed income every month.”

Suddenly, the screen in front of Appasaheb started turning blurry, and Appasaheb wiped his tears under the guise of wiping his spectacles.

“But in this scheme, all the investment I have will get exhausted!” Appasaheb exclaimed.

“Dad, Wait; I will explain you everything”

Friends. What would you do?

Let us understand what Mandar explained to his Dad.

Mandar explained the “Systematic Withdrawal” option in Mutual Funds investment. The exact opposite of the most popular SIP among today’s youngsters.

Opposite means opposite in functionality

You will see that after 16 years, the balance available is just ₹ 1,29,899 against ₹ 25 Lacs.

Actually Appasaheb got ₹ 40,32,000 against the investment of ₹ 25 Lacs by withdrawing a certain fixed amount every month. 

Due to the expected growth of 7% pa, Appasaheb could withdraw ₹ 15 Lacs, 32 thousand more.

So, Friends! How do you like our Appasaheb’s Plan?

Please do inform.

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !