Posts

अनुदिनी ८२ -NPS मधील नवीन पर्याय. / Blog 82 – New Options in NPS

Image
  “अरे , आता पुढल्या आठवड्यात महालक्ष्मी म्हणजे घटस्थापना होणार की रे!”   “मग ?”  मी विचारलं. “त्या सात दिवसात एवढी गर्दी असते की डोळे भरून देवीचं दर्शनच होत नाही.”    बाईकवरून मी आणि महेश उतरलो , गाडी स्टॅन्डवर लावून आम्ही देवीच्या मंदिरात पोहोचलो.  “काय रे , देवीकडे काय मागितलं ?”  मी आपलं सहज विचारलं.  “अरे , आता ह्या महिन्याअखेरी मी निवृत्त होणार. थोडा हाताश होत महेश म्हणाला.  आता काय करायचं ? एकदम पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते रे.”  “अरे थोड्या दिवसांकरिता वाटेल असं. सवय नसते ना.” “अरे , मला चिंता वाटते ती ह्या वाढत्या महागाईची. आत्तापर्यंत ठीक होतं रेग्युलर इन्क्रिमेंट , प्रमोशन होत होती. त्यामुळे इन्कम वाढत होतं. आता व्याजावर जगताना त्या व्याजदराची शाश्वती राहिली नाही. मुद्दल तर काही वाढत नाही. मग वाढणारे खर्च कसे काय सांभाळायचे ? मेडिक्लेमचा हप्ता तर  वर्षागणिक वाढतो आहे. त्याच्या वाढीच्या दराची तुला कल्पना आहेच ; त्यात तर काही तडजोड करता येत नाही. भले मी SWP (Systematic Withdrawal Plan ) मधून सोय करणार आहे पण त्...

अनुदिनी ८१- Liability and Asset / Blog 81 – Liability & Asset

Image
पहाटेच जाग आली. . तर समोर काचेतून टुमदार घरं दिसत होती . सगळीच घरं एक जात सुंदर होती. त्यांच्यासमोरून लहानशी गल्ली होती. रस्त्याला लागून त्या एक सारख्या दिसणाऱ्या घरांच्या कुंपणापर्यंत छान हिरवेगार गवत होते. त्यावरून एक जण कुत्र्याला फिरवत होता. मध्येच त्या श्वानाने त्याचा नैसर्गिक विधी उरकला. सोबतच्या त्या व्यक्तीने लगेचच हातातल्या पिशवीने ते उचलले. अरे , परवा आपण मॉलमध्ये गेलो होतो ना ,  मला वाटलं आपल्या पुढचा तो  मनुष्य दार सोडून पुढे निघून जाईल.  पण  आपल्याला येतांना बघून तो चक्क दार धरून थांबला की रे!   भले काही सेकंद थांबला , पण आपल्या मागून लगोलग कोणीतरी येत आहे तर त्याच्यासाठी दार धरून ठेवण्याचे सौजन्य त्याने दाखवावे ? काय पण हा सायकलवाला ?  ह्याला कोण जाऊन सांगणार की त्याच्यामुळे आपण मागे अडकलो आहोत.  आता ह्याला आपल्या गाडीचा आवाज येत नसेल का ?   पण तुम्हाला हॉर्न वाजवायची परवानगी नाही , आणि त्याला ओव्हरटेक करायच असेल तर नियमांचं भान ठेवायचं ते ही ह्या जंगलात जिथे तो आणि फक्त आपणच आहोत.     " आजी तू आणि आई या इथे ...