Posts

Showing posts from March, 2022

नुकसान भरपाई - Indemnify

Image
/> नुकसान भरपाई नमस्कार मंडळी! आपल्याला, “To indemnify the loss and not to make a profit” हे विधान माहित आहे का? मंडळी! हे विधान सर्वसाधारण विमा व्यवसायास (General Life Insurance) लागू होते, ज्यात, मेडिक्लेम, बिल्डिंग, मशीनरी, गाडी-घोडा इ. चा विमा अंतर्भूत होतो. आता म्हणाल, आज एकदम गाडी-घोडयावर? हा! तर, झालं असं! रोहन, म्हणजे माझ्या मित्राच्या मुलाला कार घ्यायची होती. पठ्याने अगोदरच ऑनलाईन टेस्ट-ड्राईव्ह बुक केली होती. मस्त पैकी अर्धातास रपेट मारली. मलापण गाडी आवडली, मस्त १८ इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि एकदम हटके डिझाईन, SUV च्या वरच व्हेरिएंट होतं. काका! आवडली का? रोहनने विचारलं. येस! एकदम मस्त! आणि पठ्याने, थोड्याच वेळात गाडी बुक केली पण.

अक्षय पात्र -Akshay Patra

Image
अक्षय पात्र मंडळी ! मागचा "फुलपुडीचा" ब्लॉग वाचून एक जेष्ठ आप्त म्हणाले "मिलिंद, अरे! जुन्या गोष्टींची आठवण झाली रे!. त्या वेळेस १२ टक्के व्याज घ्यायचो,आता सगळंच कठीण आहे! या ६ - ७ टक्क्यात कसं काय होणार?". मी म्हणालो, "अहो काका! त्यावेळेस आपण व्याजावर लक्ष दिलेत, पण जर आपण तेव्हा वर्षासन (Annuity) च्या योजना निवडल्या असत्या तर आजही तुम्हाला ११ टक्के परतावा मिळाला असता". मित्रांनो! गुंतवलेल्या रक्कमेवरील परताव्याचे (Returns) चार प्रकार असतात, व्याज,कुपन रेट,लाभांश (Dividend), भाडे (Rent) आणि वर्षासन (Annuity). व्याज म्हणाल तर ते ठराविक कालावधीसाठी ठराविक दराने मिळते. कुपन रेट हा रोख्यावरील (Bond) परताव