अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५ ‘ / Blog 25 - '5, 10 or 15'

'अनुदिनी २५ -‘५, १०, किंवा १५'

अरे वा वा!!

अलभ्यलाभ!

सुमित च्या आई ने पूजा व तिच्या यजमानांचे स्वागत केले. पूजा सुमितच्या आईची म्हणजे अश्विनीची बालपणीची मैत्रीण. दोघीही अगदी बालवाडी पासूनच्या मैत्रिणी; मधल्या काळात काही वर्षांकरिता पूजाच्या यजमानांची दुबईला बदली झाल्याने २/३ वर्षे काही भेट नव्हती आणि आज अचानक कही न कळवता पूजा दरात उभी!

“ अगं काय गं सुमितचं लग्न ठरवलंस आणि काही कळवलंच नाहीस! लटक्या रागात पूजाने विचारले.

तेवढ्यात सुमित आला, हॅलो मावशी केव्हा अलीस?

अरे ही बघ आत्ताच आले!

आणि हे काय! लग्नाची तयारी एकदम जोरदार चाललेली दिसते!!

अग हो मावशी मला आवडलेला ‘लेक व्ह्यू रिसॉर्ट’ बुक केलाय ते ही तीन दिवसांसाठी.

संगीत, हळद, पण एकदम दणक्यात करणार.

मेन्यू म्हणशील तर एकदम different,

संगीत ला ‘चाट काउंटर’ सोबत ‘इटालियन काउंटर’ पण ठेवलंय.

हळदीला मस्त हुरडा, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, चवीला झणझणीत मिरचीचा ठेचा आणि इंडो वेस्टर्न फ्युजनही आहे.

सुमितच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे लग्न मोठ्या थाटात पार पडलं.

ठरवल्यापेक्षा थोडा जास्तच खर्च झाला. पण सुमितच्या आईने काही आडकाठी केली नाही.

ती त्याच्या डोळ्यात त्याच्या वडिलांचा आनंद बघत होती. तेच ते सदा चमकणारे हसणारे डोळे. बरोब्बर गेल्यावर्षी कायमचे मिटले.

रिती रिवाजानुसार, ठरलेले लग्न वर्षाच्या आत करणे आवश्यक होते. लग्नसोहळ्यात सढळ हाताने खर्च झाला.

सुमितच्या वडिलांच्या विम्याची रक्कम बरीचशी लग्नात खर्च झाली. परिणामी महिन्याच्या खर्चासाठी पुनर्रगुंतवणुकीकरता फंड कमी उरला. आता कसं काय करायचं हा एक मोठा यक्षप्रश्न सुमीतच्या आईपुढे उभा राहिला.

मंडळी आपण काय करू शकतो?

अशा प्रकारे आलेली मोठी रक्कम एकरक्कमी न घेता ती जर ५ किंवा १० अथवा १५ वर्षाच्या हप्त्यात घेण्याचा पर्याय घेतला असता तर अवाजवी खर्चाला वेळीच लगाम घालता आला असता.एका ठराविक उत्पन्नाची खात्रीशीर सोय झाली असती.

मंडळी आपल्याला काय वाटतं?

'5, 10 or 15'

Oh Wow!!

Such a pleasant surprise!

Sumit’s mother welcomed Pooja and her husband. Pooja is Sumit’s mother’s childhood friend. They both were fast friends right from the Nursery School. In between, Pooja’s & her husband had shifted to Dubai for 2 to 3 years owing to her husband’s transfer. Pooja and Sumit’s mother had not met during this time and now suddenly Pooja arrived at their home without any intimation.

“I understand that you have fixed up Sumit’s marriage and you didn’t tell me anything” Pooja taunted with some discontent.

Just then Sumit entered “Hello Aunty!! When did you come?”

“Just now. And it appears that you all are very busy preparing for the upcoming marriage”

“Yes Aunty, We have booked my favorite Lake view resort for 3 days. All the rituals shall be grand.

Menu would be totally different.

We have Chat and Italian Counter, both, for Sangeet.

For Halad it will be the tender Jowar (Hurda), Brinjal delicacy and Bajra Bread with spicy zingy chilly mash (Thecha).

We have indo-western Fusion too.”

As per Sumit’s father’s wish, the marriage and all ceremonies were grand. The expenses marginally exceeded the planned budget. But sumit’s mother did not object.

She was seeing the same sparkle and excitement in Sumit’s eyes that she saw in his father’s eyes.

Sadly, those sparkling eyes of Sumit’s father shut permanently last year.

It is customary to conduct such ceremonies within one year after any death in the family and there was no frugality in the expenses of marriage.

Most of the insurance amount of Sumit’s father was spent in the marriage. Due to this, Sumit’s mother was staring at a big question of re-investing the money for earning an income to meet her monthly expenses.

Friends what can we do?

If she was to choose the option of withdrawing such big amount in installments of 5 years or 10 years or 15 years, the expenses of marriage would have had been aptly contained.

This would have helped in provisioning for an assured income in future.

What say friends?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !