Posts

Showing posts from February, 2024

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

Image
प्रसंग १ "धन्यवाद बाप्पा!" निमिषने गणपतीच्या गाभाऱ्यातील घंटा वाजवली आणि तो काहीवेळ नतमस्तक झाला. मंडळी विचारात पडला असाल ना ! काय झालं? तर कारण असं होतं की निमिषला अमेरिकेतील 'H1B Visa' मिळाला, दोन वेळा संधी हुकली आणि अखेरच्या शेवटच्या चान्समध्ये त्याला लॉटरी लागली. नाहीतर पठ्ठेरावांना बॅग भरून मायदेशी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळी स्वप्ने धुळीस मिळाली असती.( ह्या शब्दप्रयोगाची उत्पत्ती बहुदा डोंबिवलीतच झाली असणार.) "हॅलो बाबा!" निमिषचा फोन. "हां बोल!" "एक मस्त घर बघितलं आहे!" "अरे वा!" "कितीला?" "चार ते साडेचार लाख डॉलरच्या घरात जाईल. (काय गंमत, घराची किंमत घरात, पण कारची किंमत कारमध्ये जात नाही) असो! "लोन तर होईलच, पण काही डाऊन पेमेंट करायचे असा माझा विचार आहे". प्रसंग २ "अरे दोन कडक चहा आण " श्यामने ऑर्डर सोडली. "मी मुलीला सांगितले आहे, तुझ्यासाठी कर्ज काढतो आहे, तुलाच ते फेडायचे आहे."