Posts

Showing posts from May, 2023

अनुदिनी ३६ -'लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज' / Blog no. 36 - 'Lifebuoy, Hawkins, and Bajaj'

Image
‘लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज’ नमस्कार मंडळी! काय, कसे आहात? तुम्ही ही जाहिरात बघितली किंवा ऐकलीत का? "तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय लाईफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ" बरं, ही जाहिरात? "ये जमीन ये आसमान, ये जमीन ये आसमान, हमारा कल, हमारा आज, बुलंद भारत की, बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज" अरे, काय चाललंय? सांगतो, सांगतो! आणि ही एक शेवटची, "हॅाकिन्स की सिटी बजे खुशबू ही खुशबू उडी मजेदार लज्जतदार खाना है तैय्यार हर खाना स्वादिष्ट बनाये, मिनीटोमें झटपट पकाये हॉकिन्स प्रेशर कुकर" ह्यांचा इथे काय संबंध? सांगतो, सांगतो! बरं, मंडळी आपल्याला लाईफ ईन्शुरन्स काय असतो हे माहित आहे. टर्म प्लॅनचा तर राव, मोठाच गवगवा आहे. आयुर्विम्यात परतावा हा कमी असतो ही माहिती बहुतेकांना आहे. तर, विम्याची मिळणारी रक्कम मग ती मुदत संपल्यावर असू दे किंवा मृत्यूच्या पश्चात, ती करमुक्त असते हे

अनुदिनी ३५ – ‘निवांत’ / Blog 35 – ‘Relaxed’

Image
‘निवांत’ नमस्कार मंडळी! काय कसे आहात? असे विचारल्यावर, "मजेत, छान, मस्त, ठीक," यांपैकी कोणतेही उत्तर न येता "एकदम निवांत" असे चारही मुंड्या चीत करणारे उत्तर कसे वाटते? मागील आठवड्यात आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला भेटण्याचा, दर्शनाचा योग आला. तिथे ह्या 'एकदम निवांतची' गाठ-भेट झाली. म्हणजे तिथे कोणी कोणाची ख्याली-खुशाली विचारली की त्याला एकच उत्तर, 'एकदम निवांत'! मंडळी, निवांत म्हटलं की कसं एकदम 'शांत, शांत' वाटतं ना? म्हणजे आपल्याकडील, मजेत, मस्त, छान, यांच्यापेक्षा अधिक उजवा 'निवांतपणा' वाटतो ना? ह्या, 'निवांतपणात' असं वाटतं जणू काही एकदम समाधीच लागली आहे, आजूबाजूच्या इतर गोष्टींपासून एकदम अलिप्त! असा हा 'निवांतपणा' आपल्याला साठी नंतरच जवळचा वाटतो; आपल्या पेन्शनच्या कारकीर्दीत. बरोबर ना! आता, पेन्शन म्हंटलं की Employees’ Pension Scheme (EPS), Superannuation Scheme, National Pension Scheme (NPS), हे परि