Posts

Showing posts from November, 2023

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

Image
नमस्कार मंडळी! काय, कुठे आहात? अहो, म्हणजे काय झालं, मागे आपण वाचलं असेलच की आपले प्रेमळ त्रिकुट, ‘रश्मी-ऋषी-सन्नी’ गोव्याला गेले, म्हणून विचारलं. तुम्ही कुठे बाहेर पडलात की नाही? मी तर आर्थिक नियोजनाच्या गप्पा मारुन, लिहून एकदम बोअर झालो की राव! म्हटलं बुध्दी देवतेचा आशीर्वाद घ्यावा आणि तैलबुध्दी वृद्धिंगत करण्यासाठी मत्स्यआहाराचे हवन करावे; मग निघालो की राव! आपल्या कोकणात, ‘तुरळला.' तेथून पुढे ‘गणपतीपुळे’ आणि 'तारकर्ली' आणि मग परतीचा प्रवास! हां! तर राव, आम्ही आधी विठोबा केला, म्हणजे आधी बाप्पांचे दर्शन घेतले मग पोटोबा करता तारकर्लीला वळलो. तर, मंडळी! ‘तारकर्ली’ ऐकून, सॉरी वाचून आमच्या सारख्या मत्स्यप्रेमी खव्वयांची जीभ एकदम खवळली असेल! काय बरोबर ना! तर मंडळी हे सगळं सांगायचं कारण की, हे आर्थिक नियोजन वगैरे सगळं करायचं कशाला तर, निवांतपणे हिंडता-फिरता यावं, मनासारखे चार पैसे खर्च करता यावेत म्हणूनच ना!

अनुदिनी ४९- 'उच्चशिक्षणा सोबत ट्रिपचे प्लॅनींग कसे कराल' / Blog 49 – 'Planning for a trip and funding for MS as well'

Image
रवीवारची सकाळ! रश्मीने डोळे उघडले. तीने मोबाईल चाचपडला, बघते तर ५:३० वाजले होते. रोजचा गजर ६:१५, असे असूनही तिला एकदम ताजंतवानं वाटत होतं. रविवार म्हणून परत लोळत पडावे असे तिला वाटले नाही. हॉलमधे येऊन तीने स्लायडींग विन्डो सरकवल्या. छानशी मंद गार वाऱ्याची झुळूक तिला प्रसन्न करुन गेली. पूर्वेला मंदपणे शुभ्रसा शुक्रतारा झळकत होता. त्याला बघता,बघता तिची तन्द्री लागली. "च ऽऽऽ हा!" रेश्मा एकदम दचकली. ऋषिकेश, हातात चहाचे मग घेऊन समोर उभा. "गुड मॅार्निंग मॅडम!" "अगं, काय!" "उभ्या उभ्या काय झोपतेस!" "अरे नाही रे!" "इकडे ये, तो बघ शुक्रतारा कसा छान दिसतोय. तांबड्या आकाशात ही त्याचं रुपडं कसं खुललंय. सगळं वातावरण कसं एकदम उल्हसित झालंय ना!" "ऋृषी, आपण दिवाळीत मस्त फिरायला जाऊया?" "फिरायला?" "अगं आपलं काय ठरलंय? अगोदर टॅक्स प्लॅनिंग. आता जानेवारी पासून दणादण टॅक्स कापायला सुरवात करतील." "अरे, करु रे! असा एकदम मूड