Posts

Showing posts with the label Insurance Awareness

अनुदिनी ७८ - सहावं बोट / Blog 78 - 6th Finger

Image
  हा ये रे! नितीनने दार उघडले. आज काय ठाण्यातले कॅाल्स का ? हो! म्हंटलं बरेच दिवस भेटला नाहीस तर भेटून जावं. मला आठवतं आमची दोघांच्या सामयिक मित्रामुळे ओळख झाली.  तो माझा उमेदवारीचा काळ होता. साहजिकच मेहनत आणि शिक्षण दोन्हींचा कस एकाच वेळी आणि तेही मार्केट मध्ये , चार भिंतींतील सोडवलेल्या पेपरप्रमाणे बंदिस्त नाही. म्हणजे जो काय रिझल्ट लागेल तो समोरासमोर उघडपणे. म्हणजे एकतर समोरची व्यक्ती तुमच्या विधानाला , शब्दाला मानेल तरी किंवा सरळपणे पर्दाफाश करून मोकळी तरी होईल. त्यामुळे खूपच जपून , तोलून- मापून बोलणे आवश्यक आणि मला तर आयुर्विमा योजना विकायची होती. नवशिका असल्याने दडपण होते. नितीनचे वडिल त्या वेळेस ‘ UTI’  करता काम करत सोबत कंपन्याच्या मुदत ठेवी योजनाही विकत असत ; त्यावेळी मला आठवतं ‘ Ceat’  कंपनी   १७% व्याज देत होती. त्यामुळे काका फक्त रिटर्नवरच बोलत. त्या वेळी पोस्टाच्या योजनांप्रमाणे विमा , किती मिळणार आणि केव्हा मिळणार ?  ह्या दोन मुद्द्यांवरच विकला जात होता. त्यापुढे , सेलिंग पॅाईंट , कर सवलत ( Income Tax Rebate) मिळणार ना ?  आणि पगारदार व...

अनुदिनी ७५ -हरवलेला माणूस आणि विमादावा / Blog 75- Missing person and insurance

Image
  दारावरची बेल वाजली आणि पेपरचं भेंडोळं आत पडलं. मिहीरने हातातला चहाचा कप बाजूला ठेवून पेपर उचलला. आतून दोन-तीन हॅन्डबीलं खाली पडली. ‘Golden Voyage’, नवविवाहितांसाठी एक अनोखी योजना! मिहीर हातातलं पॅम्पलेट वाचू लागला आणि ते वाचत असतानाच त्याला आपल्या विमा पॅालीसीचा हप्ता भरायची आठवण झाली. त्याने लगेचच login केले पण त्याच्या डोळ्यांसमोरुन प्राजक्ताचा चेहरा काही हलेना. समोर बॅन्डवर हलक्या सुरात पाश्चात्य संगीताची धून वाजत होती. आज लेफ्टनंट कर्नल वैद्य ह्यांचा वाढदिवस होता. कॅप्टन राऊत ह्यांनी त्यांच्या बंगलीच्या हिरवळीवर त्या निमित्ताने पार्टी दिली होती. पार्टीत मिलिटरीतील काही अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे आप्तस्वकीयही होते. मिहीरला नुकतेच कमिशन मिळाले होते आणि तोही आमंत्रितांपैकी एक होता. मिलिटरी पोशाखात तो भलताच रुबाबदार दिसत होता. त्याची रक्तवर्णी गुलाबी बोटं हातातील रमच्या ग्लासाभोवती फिरत होती. आणि निळेशार डोळे आजूबाजूचा आसमंत न्याहाळत होते . Welcome Mihir!  असा खणखणीत आवाज आणि पाठीवर थाप , दोन्ही एकदमच मिहीरवर आदळले. “ ओ , कॅप्टन राऊत!” मिहीर मागे वळून बोलता झाला. “I don’t bel...