अनुदिनी ८३ – विमा लक्ष्मी / Blog 83 -Bima Laxmi
“हॅलो, शुभदा!
अगं आवाज ऐकू येतोय का?” लीनाने बेडरुमची स्लायडींग विंन्डो पूर्ण सरकवली.
“हं आता आला!
बोल, बोल!” शुभदा.
“यंदाचा दिवाळी सुट्टीचा काय प्लॅन?
मी ‘सेव्हन सिस्टरचं’ वर्कआउट केलंय, साधारण ८० हजारापर्यंत बजेट होतंय.
चालेल का?” लीनाने विचारणा केली.
“मी बघते ह्याला विचारून!” शुभदा.
“बाय द वे एक अफलातून प्लॅनिंग मला समजलंय.
परवा आमच्या भिशीत खास स्त्रियांसाठी आलेली योजना समजावायला एकजण आली होती.”
लीना उत्साहाने सांगायला लागली.
“सध्या आपण १०, ००० ची भिशी चालवतो आहोत; दहाजणींमध्ये आपण प्रत्येक महिन्यात लकी ड्रॉ काढून एकीला एकरकमी रुपये एक लाख वापरायला देतो आहोत. आता आपण काही सर्वच रक्कम आपल्यासाठी खर्च करीत नाही. नाही म्हटलं तरी घरात ह्याला त्याला देण्यात बरेच खर्च होतात. त्या ऐवजी आपण LIC कडे भिशी लावायची आणि LIC आपल्याला दर एक वर्षाआड रुपये ६०, ००० देणार.”
“वा!”
“ऐक, हे रुपये ६०, ००० खात्रीपूर्वक असतील एवढंच नव्हे तर त्यावर कर म्हणजे टॅक्स सुद्धा लागणार नाही.
अगं माझ्या डोक्यात कल्पना आली.
ह्या योजनेच्या मार्फत आपण ' Women's Holiday celebrate करू या!”
“अरे वा! एकदम झकास प्लॅन. म्हणजे दरवर्षाआड ग्रुपची लेडीज स्पेशल ट्रिप आपण करू शकतो.” आता शुभदा एक्साईट झाली.
“ह्या योजनेतील वयोमर्यादेमुळे ‘कल्पना' आणि 'चारू’ यांना हा प्लॅन मिळू शकत नाही. त्याला पर्याय म्हणून त्यांच्या मुलींच्या नावावर हा प्लॅन घेऊन त्याचे फायदे त्या घेऊ शकतात.” (वयोमर्यादा १८ ते ५० असल्याने)
“हे ही बरंच झालं. त्या दोघी ट्रीपला पाहिजेतच नाहीतर गॉसिपिंगला काय मजा?” दोघी फोनवरच टाळी घेतात.
“आयुर्विम्या बरोबर एक महत्वाचा मुद्दा असा की ह्यात ‘Critical illness’ रायडरचा ही आपण समावेश करू शकतो.
पॉलिसीचा हप्ता आपण ७ ते १५ वर्षांत भरण्याचा पर्याय निवडू शकतो. आणि मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम पण गॅरेंटेड.”
“ही रक्कम मिळणार केव्हा?” शुभदाने पृच्छा केली.
“पॉलिसीची २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे त्यावेळी आपण ८ जणी साधारण ६० वर्षांच्या असू; कल्पना आणि चारू सोडल्यातर.
अगं ती सांगत होती, की सरतेशेवटी मॅच्युरिटीला जी एक रक्कमी पुंजी मिळणार आहे ना, ती आपण दरवर्षी पुढील १५ वर्षे घेण्याचा पर्याय आहे.”
“वा! मस्तंच!”
“म्हणजे साठी नंतर सुद्धा आपल्या फिरण्याची सोय झाली. आणि तीही दरवर्षी हे महत्त्वाचं.”
“मला तर वाटतं ना आपल्या भिशीच्या संकल्पनेलाच LIC ने ह्या प्लॅन द्वारे प्रोमोट केले आहे.”
“अगं हे सगळं ठीक. बाकी फराळाचं कुठवर आलं आहे?
की ऑनलाईन?”
“अगं नाही!
प्रशांतला रव्याचे लाडू आणि मिहिरला चकल्या हव्या आहेत. दोनच पदार्थ करायचे आहेत उद्यापासून सुरवात करेन.”
“माझ्या थोड्या करंज्या झाल्या आहेत उरलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करणार. चिवडा, शंकरपाळे परवापर्यंत होतील, पाठवेन तुला. बाकी दिवाळीनंतर आपण भेटूच आपल्या भिशीच्या मीटिंगला. तेव्हा अश्विनीला पण बोलावते, म्हणजे 'विमा लक्ष्मी' विषयी काही शंका असतील तर समोरच निरसन होईल आणि इतरही सविस्तर माहिती मिळेल.”
“चल बाय!”
“बाय!”
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ही 'लक्ष्मी' घरी आणा!
तर, मित्रांनो आपला अभिप्राय जरूर कळवा आणि इतरांना ही माहिती फॉरवर्ड करा.
------------------------------------------------------------------------------------
“Hello, Shubhada!
Hello! Can you hear me?” Leena slid the sliding window fully.
“Yes, now I can listen!
Tell me!” Shubhada.
“What is your plan for this Diwali?
Look, I have checked the Seven Sisters tour. The budgetary expenses are approximately Rs. 80,000.
Are you okay with this?”
“I will ask Prashant!”
“By the way, I have got to learn one exceptionally brilliant planning. Recently, someone came to explain a special plan for the ladies in one of my friends' Chit-fund groups.” Leena added.
“Presently, we have a chit fund of Rs. 10,000 each.
Amongst the 10 of us, we give a lump-sum amount of Rs. 1 Lakh to the winner of the monthly lucky draw.
Now we don’t spend all the money on our requirements.
As such, we spend a good amount on making ends meet at home.
Instead of our chit fund, we should have chit-fund with LIC, and LIC shall give us Rs. 60 thousand every alternate year.”
“Wow!”
“Listen, this Rs. 60 thousand is assured and tax-free.”
“Then?”
“Look, I got an idea. We can plan to celebrate ‘Women’s Holiday’ with this money.
But Kalpana & Charu are not eligible for this plan due to their age.
Alternatively, they can avail themselves of this plan and its benefits in their daughters' names. (Age limit being 18 to 50 years)”
“That’s better. We need those two members on our trips. Otherwise, our gossip will not become enjoyable.”
They gave each other a high-five over the phone.
“Along with Life insurance, we can add the ‘Critical Illness’ rider in this plan as well.
*We can choose to pay the premium for 7 to 15 years. And the amount after maturity is guaranteed too.” Leena explained further.
“And when do we get this amount?”
“After completion of 25 years of the policy.”
“That means eight of us shall be about 60 years old after discounting Kalpana and Charu.”
“Also, she was saying the maturity amount, which is given as a lump sum, optionally, can be taken every year over the next 15 years”.
*“Wow! Great!” Shubhada exclaimed.
“That means we can tour after our 60, and, importantly, every year.
I feel that LIC has promoted this plan, inspired by our chit-fund idea itself.
This is all fine; what about the progress of sweets and savories for Diwali? Or are you buying them online?” Leena asked.
“Prashant wants Semolina Laddu, and Mihir wants Chakli. Only these two items are to be prepared. I shall start tomorrow.” Shubhada answered.
“I have made a few Karanji, and I shall make the balance on the day of Laxmi Puja. Shankarpale will be done by the day after tomorrow. I will send some to you.
Rest, we will discuss it during the chit-fund meeting after Diwali.
I will call Ashwini also, so that if anyone has any doubts on ‘Bima Lakshmi,’ she can clear them, and also, we get more relevant information.” Leena quipped?
“Ok Bye.”
“Bye.”
Bring home this “Lakshmi” on the auspicious occasion of “Lakshmi Pujan”
Friends! Don’t forget to share your comments.

.jpg)


.jpg)

Call me Milind . Need more clarity on this to explain my children .
ReplyDelete