Posts

Showing posts with the label LIC Bima Lakshmi

अनुदिनी ८३ – विमा लक्ष्मी / Blog 83 -Bima Laxmi

Image
  “ हॅलो , शुभदा! अगं आवाज ऐकू येतोय का ?” लीनाने बेडरुमची स्लायडींग विंन्डो पूर्ण सरकवली. “ हं आता आला!    बोल , बोल!” शुभदा. “ यंदाचा दिवाळी सुट्टीचा काय प्लॅन ?  मी ‘ सेव्हन सिस्टरचं ’ वर्कआउट केलंय , साधारण ८० हजारापर्यंत बजेट होतंय.  चालेल का ?” लीनाने विचारणा केली. “ मी बघते ह्याला विचारून !” शुभदा. “ बाय द वे एक अफलातून प्लॅनिंग मला समजलंय. परवा आमच्या भिशीत खास स्त्रियांसाठी आलेली योजना समजावायला एकजण आली होती .”  लीना उत्साहाने सांगायला लागली .   “ सध्या आपण १० , ००० ची भिशी चालवतो आहोत ; दहाजणींमध्ये आपण प्रत्येक महिन्यात लकी ड्रॉ काढून एकीला एकरकमी रुपये एक लाख वापरायला देतो आहोत. आता आपण काही सर्वच रक्कम आपल्यासाठी खर्च करीत नाही. नाही म्हटलं तरी घरात ह्याला त्याला देण्यात बरेच खर्च होतात. त्या ऐवजी आपण LIC कडे भिशी लावायची आणि LIC आपल्याला दर एक वर्षाआड रुपये ६० , ००० देणार. ” “ वा! ” “ ऐक , हे रुपये ६० , ००० खात्रीपूर्वक असतील एवढंच नव्हे तर त्यावर कर म्हणजे टॅक्स सुद्धा लागणार नाही. अगं माझ्या डोक्यात कल्पना आली.  ह्या योजनेच्य...