अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

प्रिमियम मेम्बरशिप

"साहेब ७ लाखाची हॉलिडे रिसॉर्टची प्रिमियम मेंबरशिप घेतली आहे. आता हे ४ दिवस नाही वापरले तर फुकट जातील. मित्राला सांगितले होते पण त्याला जमत नाही, म्हणून आता मला जावे लागते आहे."

नमस्कार मंडळी!!

हा आमचा अभय. वय वर्ष ३५ च्या आसपास. दोन मुले व पत्नी असे चौकोनी कुटुंब. अभय, कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती.

मंडळी, अनावश्यक खर्च कसे अलगदपणे आपल्याला मिठीत घेतात ह्याचे हे उत्तम उदाहरण. आपल्या प्रियजनांसोबत उत्तम जीवनशैलीचा आनंद घ्यावा ही इच्छा दिवसेंदिवस प्रबळ होत आहे, आणि तशी इच्छा प्रबळ होण्याच्या दृष्टीने मार्केटिंग पण केले जात आहे. अशा मार्केटिंगचा सारासार विचार न करता आपण त्याला भुलत जात आहोत.

'जीवन छानपैकी, मजेत जगण्यासाठी खर्च हा केलाच पाहिजे आणि अत्ता तरुणपणी मजा नाही करायची तर केव्हा?'

या विचारसरणीत, कर्ज काढून हप्त्याने आपल्या आवाक्यात नसलेली जीवनशैली जगण्यात आनंद शोधणे हे तरुणाईचे गीत झाले आहे.

घराचा हप्ता, कारचा हप्ता, हा आहेच पण त्याच बरोबर क्लब मेंबरशिप चे हप्ते ही लावून घेतले जातात. अशा या हप्तेरूपी तारांच्या भेंडोळ्यातून सूर हे निघतात पण ते सुश्राव्य नसतात, खरा आनंद देणारे नसतात.

मंडळी, मला असे वाटते की एखादी जीवनशैली म्हणा किंवा एखादी वस्तू, ती मला हप्त्यावर घेणे जमते आहे तर ती घेतली जाणे हे चुकीचे आहे, अपवाद घर.

घर हा अपवाद, कारण घरामुळे व्यक्तीस स्थेर्य येते आणि स्थिरता लाभली की प्रगती होण्यास, करण्यास वाव मिळतो.

पण, अश्या या चुकीच्या हप्त्यांमुळे उपभोगी वृत्त्तीची जोपासना होते. गरज नसतांना व पुरेसे पैसे नसतांनाही खरेदी होते, जे आर्थिक नियोजनात अडसर निर्माण करते. हव्या त्या वस्तूसाठी नियोजन करून, रक्कम जमवून, तेवढे महिने म्हणा किंवा वर्ष वाट बघून मग खरेदी करणे या संयमी वृत्तीच्या आनंदाला आपण पारखे होतो. कारण जमवलेल्या पुंजितून आनंद मिळवण्याच्या विवेकी वृत्तीलाच मुळी आपण तिलांजली देतो.

ही वृत्ती, 'Income - Expenses = Savings' ह्या प्रकारात येते.जिथे खर्चाला भरपूर वाव आणि विवेकाला, गुंतवणुकीला दुय्यम स्थान.
अहो, विवेक सुद्धा असा काही गुंडाळला जातो की केलेल्या खर्चाचे पण हप्ते बांधून घेतले जातात. म्हणजे होते असे की, एकरक्कमी पैसे खर्चाला नाहीत म्हणून प्लास्टिक मनीचा वापर आणि केलेला खर्च भरायला एकरक्कमी शिल्लक नाही म्हणूनही हप्ते.

काय मंडळी!!! जरा जास्तीच बोललो का?

ओ, Sorry ! I mean लिहिले का?

तर मंडळी, आमचा अभय बॅग भरायच्या तयारीला लागला आहे गोव्याला निघाला आहे ना तो!

तर मंडळी, एकूण आपण ह्यातून काय अर्थबोध घेऊ?

गरज व चैन ह्यातील फरक ओळखू.

गरजेसाठी कर्ज घेऊ.

चैनीच्या वस्तू घ्यायच्या असतील तर पैसा साठवून घेऊ.त्यासाठी नियोजन करू.

काय वाटतं, जरूर कळवा!

Premium Membership

“Sir, I have paid premium membership of ₹. 7 Lacs at the holiday resort. If I don’t avail of it this year, four days of membership privileges would go to waste. I asked one of my friends, but he can’t go. Hence, now I have to go."

Hello friends!!

This is Abhay. Age around 35 years, married, and has two children. He is the only earning member of the family.

Friends, this is a classic example of how we fall prey to unwanted expenses.  The urge of spending quality time with an upgraded lifestyle is becoming more common nowadays. And the marketing of such schemes is done with the aim of luring people to yearn for such a lifestyle. 

Sadly, we are getting lured into such a trap of marketing without any rational thinking.

“Obviously, to live a good life with all the fun and frolic, one has to spend the money. And it is at a young age that one needs to enjoy this.”

With such a mentality, the youth of today is taking loans and paying EMIs just to live this kind of lifestyle.

Already there is a burden of EMIs of home loan, car loan and to add to this, people avail a loan for such premium membership. 

Friends, though the people burdened with EMI payments, pretend to enjoy this lifestyle, they are not happy, really.

In my opinion, buying anything, except a home, on loan is not correct.

Home is an exception as the home is the necessity that brings stability and supports progress.

Due to such a wrong pleasure-seeking mentality that has been adopted, people buy things, on credit, that they don’t need. And such expenses hinder financial planning.

We get deprived of that happiness of buying the needed things after patiently accumulating money over a few months or years.

Because we do not nurture the rational mentality of deriving happiness by expending through accumulated money.

Such a pleasure-seeking mentality is developed by this simple equation,

“Income – Expenses = Savings.”

Where there is a lot of scope for expenses and saving is given second preference.

Actually, one gets entangled in such a vicious cycle of expenses and EMIs that when there is no money to buy things, they use plastic money to buy, and then when there is no money to repay it in a lump sum, they get it scheduled in EMI.

Friends, did I talk, oh!! I mean write, exceedingly more?

Abhay is busy packing for his trip to Goa. 

But what is the moral of this?

We should differentiate between need and pleasure.

Avail loan for need.

If we want to buy things that give us pleasure, then we shall plan, accumulate money, and then buy.  

Do revert with your opinion.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'