Posts

Showing posts with the label Long Term Insurance Planning

अनुदिनी ७८ - सहावं बोट / Blog 78 - 6th Finger

Image
  हा ये रे! नितीनने दार उघडले. आज काय ठाण्यातले कॅाल्स का ? हो! म्हंटलं बरेच दिवस भेटला नाहीस तर भेटून जावं. मला आठवतं आमची दोघांच्या सामयिक मित्रामुळे ओळख झाली.  तो माझा उमेदवारीचा काळ होता. साहजिकच मेहनत आणि शिक्षण दोन्हींचा कस एकाच वेळी आणि तेही मार्केट मध्ये , चार भिंतींतील सोडवलेल्या पेपरप्रमाणे बंदिस्त नाही. म्हणजे जो काय रिझल्ट लागेल तो समोरासमोर उघडपणे. म्हणजे एकतर समोरची व्यक्ती तुमच्या विधानाला , शब्दाला मानेल तरी किंवा सरळपणे पर्दाफाश करून मोकळी तरी होईल. त्यामुळे खूपच जपून , तोलून- मापून बोलणे आवश्यक आणि मला तर आयुर्विमा योजना विकायची होती. नवशिका असल्याने दडपण होते. नितीनचे वडिल त्या वेळेस ‘ UTI’  करता काम करत सोबत कंपन्याच्या मुदत ठेवी योजनाही विकत असत ; त्यावेळी मला आठवतं ‘ Ceat’  कंपनी   १७% व्याज देत होती. त्यामुळे काका फक्त रिटर्नवरच बोलत. त्या वेळी पोस्टाच्या योजनांप्रमाणे विमा , किती मिळणार आणि केव्हा मिळणार ?  ह्या दोन मुद्द्यांवरच विकला जात होता. त्यापुढे , सेलिंग पॅाईंट , कर सवलत ( Income Tax Rebate) मिळणार ना ?  आणि पगारदार व...

अनुदिनी ७४ - बीमा कवच आणि मी / Blog 74 – ‘Bima Kavach’ and me

Image
नमस्कार मंडळी! काय कसे आहात ? सगळं काही ठीक चाललंय ना! असो , तर सांगायचं असं की नेहमीप्रमाणे एका कॉलवर गेलो होतो. पठ्ठ्याला टर्म प्लॅन हवा होता. तर ' बिमा कवच ' योजना त्याला पसंत पडली.  हा विमा दोन करोडचा होता आणि विमा संरक्षण वयाच्या शंभरी पर्यंत होते आणि आपला पठ्ठ्या उर्फ प्रथमेश , प्रीमियम त्याच्या वयाच्या १०० वर्षापर्यंत भरणार होता.   प्लॅनविषयी सर्व काही सांगून झाल्यावर प्रथमेशने मला उलट प्रश्न विचारला की , " काका हा प्लॅन विमा कंपनीला कसा काय परवडतो ?" तर आपणही जाणून घ्या ह्या उलट तपासणीला  मी काय उत्तर दिलं.  " प्रथमेश त्याचं असं आहे की या योजनेत विमा संरक्षण हे वयाच्या शंभरी पर्यंत असल्याने कंपनीला दावा तर द्यावा लागणार आहेच , जो की दोन करोडचा असणार आहे. त्यामुळे तुला पडलेला प्रश्न हा बरोबर आहे की , दोन करोड न भरता विमा कंपनी दोन करोडचा दावा देणार कशी ? प्रथमेश , आता सर्वसाधारणपणे आपल्याकडील आयुष्यमान हे वाढत असून ते ऐंशी वयापर्यंत विचारात घेतलं जातं. आता समजा ही योजना घेतलेल्या  शंभर लोकांच्या समुदायातील जवळपास नव्वद टक्के व्यक्ती ह्या सरासरी वयाप...