Posts

Showing posts with the label bonds

अनुदिनी ७१ -सिप, टर्म इन्शुरन्स आणि युलिप / Blog 71 – SIP, Term Insurance, and ULIP

Image
मधल्या काळात एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाक्षिकातील लेख वाचनात आला. त्याने युलीप योजना कशा अयोग्य आहेत त्याविषयी बरीच मुक्ताफळे उधळली होती आणि त्याच्या म्हणण्यानुसार गुंतवणुकीसाठी फक्त बाजारच योग्य आहे. मंडळी , गुंतवणुकीचे त्या त्या काळातील उपलब्ध असलेले मान्य पर्याय हे गुंतवणूकदारांची भलामण करण्यासाठी नसून प्रत्येकाच्या मानसिकतेतील जोखीम घेण्याच्या कमी-अधिक वृत्तीला पूरक असतात.  उदाहरणच द्यायचं झालं तर बँकेतील मुदत ठेव योजना ( Fixed Deposits), यावरील परतावा हा अत्यंत जुजबी स्वरूपातील असूनही त्यात गुंतवणूक ही होतच असते. ह्यात गुंतवणूकदार आपली सोय , मुद्दलाची सुरक्षितता बघत असतो.  तर , भविष्य निर्वाह निधीतली ( PPF) गुंतवणूक ही जरी १५ वर्षांसाठी असली तरी त्यावरील मिळणारा करमुक्त परतावा व सुरक्षितता , ह्या बाबी गुंतवणूकदाराला आकर्षित करतात.  असो , तर मंडळी आजच्या अनुदिनीचं प्रयोजन हे आपल्याला एखादं गुंतवणुकीचं माध्यम अथवा योजना ही दुसऱ्या गुंतवणुकीसमोर कशी अयोग्य आहे हे दाखवायचं नसून उपलब्ध पर्यायातील कोणता पर्याय तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो हे समजावून सांगणं आहे.  ह्या...

अनुदिनी ६८-व्याजदर आणि रोख्याची किंमत / Blog 68–Interest rate and bond price

Image
हातातल्या कागदातील शेवटची भजी मटकावताना सॅम उर्फ समर्थचे लक्ष त्या कागदावरील मजकुराकडे गेले.  ' इंटरेस्ट रेट्स अँड बाँड प्राईस हॅव इन्व्हर्स रिलेशनशिप ',   ' व्याजदर आणि रोख्याची किंमत यांच्यात व्यस्त संबंध असतो. '   " समर्थ , तुलाही वडापाव हवा का ?" अरूकाकांनी आवाज दिला.  " चालेल!"   सँडी अगोदरच गाडीत जाऊन बसलेला , मागोमाग सॅम आणि अरूकाकाही आले.    ते तिघेही पावसाळी पिकनिकच्या पायलट ट्रिपसाठी निघाले होते.    गाडीत सॅमने अरूकाकांसमोर मघाचा कागद फडकावला.   “ काका याबद्दल जरा समजवता का ?” " हो , हो सांगतो!" काकांनी पाण्याचा घोट घेत सुरूवात केली.  " अरे तुम्हाला ‘आयपीओ’ प्रकार परिचयाचा आहे ना ?" " हो!" " तर मग , लोकांकडून निधी गोळा करण्याचाच हा एक प्रकार , पण यावर तुमच्याकडून घेण्यात येणाऱ्या रकमेवर परताव्याचा दर हा सुरवातीलाच अधोरेखित केलेला असतो त्याला ‘कूपन रेट’ म्हणतात. दुसरे असे की बाजारात हे कर्जरोखे निधी गोळा करण्यासाठी सरकारी व निमसरकारी संस्था , आस्थापने या दोघांकडून बाजारात आणले जातात.   आता हे आणताना ज्याप्...