Posts

Showing posts from March, 2024

अनुदिनी ५६ – श्रीमंती / Blog 56 – Magnanimity

Image
नमस्कार मंडळी! काय,एकदम 'बिझी बी?' हा, आता इयरएन्ड म्हटल्यावर जरा जास्तच बिझी असणार! चालायचंच, त्यातही एक मजा असते की हो राव! हा, म्हणजे कामा सोबत इयरएन्ड नंतर फिरायला जायचेही बेत ठरत असतात,ठरतात, आणि मग त्या उत्साहात ३१ मार्च केव्हा संपला ते कळतच नाही. तर,असो! मंडळी, आज थोडं काही वेगळं मनामध्ये आहे. वेगळं म्हणजे कोणत्या आर्थिक गुंतवणुकीविषयी नसून एक वेगळ्याच ‘गुंतवणुकीविषयी' आहे. ही ‘गुंतवणूक’ तुम्हाला-आम्हाला कोणताच परतावा देत नाही पण मनाची श्रीमंती मात्र जरूर वाढवते. सांगतो, सांगतो! झालं असं! परवा एका कॉलला गेलो होतो. स्टेशन बाहेर आलो, रिक्षात बसलो, थोड्या अंतरानंतर सिग्नलला रिक्षा थांबली. मंडळी! ट्रॅफिक सिग्नल हे ठिकाण काही सेकंदात-मिनिटांत, मनोव्यापाराचे दर्शन घडवणारी उत्तम जागा! समोरच काही मुलं चाफ्याच्या फुलांची माळ घेऊन गाडीच्या खिडकीजवळ नाचवत हिंडत होती, तर काही मुलं हातातील फड