Posts

Showing posts with the label Retirement Planning

अनुदिनी ८२ -NPS मधील नवीन पर्याय. / Blog 82 – New Options in NPS

Image
  “अरे , आता पुढल्या आठवड्यात महालक्ष्मी म्हणजे घटस्थापना होणार की रे!”   “मग ?”  मी विचारलं. “त्या सात दिवसात एवढी गर्दी असते की डोळे भरून देवीचं दर्शनच होत नाही.”    बाईकवरून मी आणि महेश उतरलो , गाडी स्टॅन्डवर लावून आम्ही देवीच्या मंदिरात पोहोचलो.  “काय रे , देवीकडे काय मागितलं ?”  मी आपलं सहज विचारलं.  “अरे , आता ह्या महिन्याअखेरी मी निवृत्त होणार. थोडा हताश होत महेश म्हणाला.  आता काय करायचं ? एकदम पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते रे.”  “अरे थोड्या दिवसांकरिता वाटेल असं. सवय नसते ना.” “अरे , मला चिंता वाटते ती ह्या वाढत्या महागाईची. आत्तापर्यंत ठीक होतं रेग्युलर इन्क्रिमेंट , प्रमोशन होत होती. त्यामुळे इन्कम वाढत होतं. आता व्याजावर जगताना त्या व्याजदराची शाश्वती राहिली नाही. मुद्दल तर काही वाढत नाही. मग वाढणारे खर्च कसे काय सांभाळायचे ? मेडिक्लेमचा हप्ता तर  वर्षागणिक वाढतो आहे. त्याच्या वाढीच्या दराची तुला कल्पना आहेच ; त्यात तर काही तडजोड करता येत नाही. भले मी SWP (Systematic Withdrawal Plan ) मधून सोय करणार आहे पण त्य...

अनुदिनी ७६ - भटकंती आणि निवृत्तीचे नियोजन / Blog 76 – Wanderlust and retirement planning

Image
  “ ह्या एप्रिल महिन्यात कुठे फिरायचं म्हंटलं की माझ्या तर अंगावर काटा येतो. ” नाक्यावरच्या इराण्याच्या कॅफेत थंडगार बियरचा घोट घेत शंतनू खुलत होता. " सॅम! अरे , श्रेयाला भटकायला चिक्कार आवडतं. आणि तुला सांगतो , ते ही साला एकदम डिफरंट ना रे! गेटवे पासून ते भाऊच्या धक्क्या पर्यंत पौर्णिमेच्या रात्री Yacht वरून हिंडायचे ; सोबत कुमार गंधर्व , लता , तलतची गाणी . " " शंत्या , आयला तुझी फियान्सी एकदमच भन्नाट आहे. पण मला तू हे सगळं ह्या भर उन्हात सांगायचं कारण ? म्हणजे एकतर तुला 'Foster' चढली किंवा श्रेयाच्या बकेट लिस्टने तुझी उतरली." " अरे , सॅम थोडं बहुत तसंच रे!" " म्हणजे तुझी उतरली." खदाखदा हसत सॅमने फेसाळणाऱ्या बियरचा घोट घेतला. " हा रे!  आयला तिचे फंडेच निराळे.....   तिला मुलं नको. वयाच्या पंचेचाळीशी पर्यंतच काम करणार. नंतर फक्त फिरायचं." " अरे , पण आत्ता चांगले खोऱ्याने ओढताय ना ?"  सॅमने वेटरला रिपीटची खूण करून चिकन चिलीचा एक बाईट घेतला. " ते सगळं ठीक रे! पण तिचं बोलणं मी आत्तापर्यंत मनावर घेतलं नव्हतं. म्हंटलं ,...