Posts

Showing posts with the label Mutual funds

अनुदिनी ८० - शार्प रेशो / Blog 80 – Sharpe Ratio

Image
  नमस्कार , मंडळी! झालं असं मागे पहिल्या पावसाच्या सरींचा आनंद घेण्याच्या निमित्ताने आमची मस्त पैकी पार्टी झाली. आम्ही जमलोच ते अर्ध अधीक ओले होऊन. त्यामुळे गरमागरम कांदाभजीची लज्जत काही वेगळीच लागली. सोबत हिरवीकंच मिरची आणि वडापाव ही होताच. त्या तिखट-झणझणीत वडापाव-मिरचीच्या स्वादाला गरमागरम चहाचा झुरका जिभेला चटका लावत होता . “ म्युचलफंडातील गुंतवणुक आणि रेशो!” प्रशांत , हातातील वडापावच्या कागदावरचा मजकूर वाचत होता.  “ अरे , बरं झालं! योग्य वेळी हे समोर आलं. मला सांग , आता हा ‘ Standard Deviation’ चा रेशो असतांना ‘ Sharp Ratio’ कशाला हवा ?  त्याचा काय उपयोग ?” “ सांगतो! ” मी म्हणालो. “ आता , ‘Standard Deviation’ ह्या रेशोचा निकष लावून एखाद्या फंडाची कामगिरी बघतांना त्याच्या वार्षिक परताव्यात ( Annual Return) सरासरीच्या ( Average Return) तुलनेत किती प्रमाणात बदल आहे (Volatility/Risk) हे पाहिले जाते ; तो बदल जर कमी प्रमाणात असेल तर त्या फंडाची कामगिरी ही सहाजीकच उत्तम! हे तर तू जाणतोस! ह्या बदलाला आपण , ‘Standard Deviation’  म्हणतो! ” प्रशांतने मान डोलावली. “ आत...

अनुदिनी ६९ - म्युचलफंड पोर्टफोलिओ / Blog 69 – Mutual Fund Portfolio

Image
नमस्कार , मंडळी ! काय म्हणतोय पावसाळा ! यंदा त्याने लवकरच हजेरी लावली . त्यामुळे पाण्याची चिंता नाही . पावसाच्या ह्या कामगिरीने बळीराजा (Farmer) आणि अर्थव्यवस्थाही सुखावलेली आहे . तर , आता आपल्या वैयक्तिक आर्थिक गोळा बेरजेचे गणित मांडायलाही हा काळ योग्य .  तर , आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलीमध्ये काही बदल किंवा नव्याने सुरूवात करायची असल्यास जरूर बघून घ्या .  मंडळी , आता पोर्टफोलीयोचा विषय निघालाच आहे तर आपण एका मुद्द्यावर माझ्याशी सहमत असाल , की आज तुम्ही - आम्ही बऱ्यापैकी गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात (asset class)  पैसे अडकवत असतो . म्हणजे , PPF, म्युचलफंड , NPS (National Pension Scheme)  आणि एवढेच नाही तर डीमॅटच्या स्वरूपात शेअर्स सोबत सोनंही घेऊन ठेवलं जातं .          ह्या सगळ्याबरोबरचं बहुतेक जणांचा टर्म प्लॅन हा असतोच .  आणि हो , सेकंड होम ! ते ही असतं किंवा असावं अशी इच्छा मनी असतेच . आता एवढं सगळं असलं की आपली ...