Posts

Showing posts with the label healthinsurance

अनुदिनी ७० - बेड चार्जेस / Blog 70 – Bed Charges

Image
नमस्कार , मंडळी! काय म्हणता ? कसे आहात ? नुकताच दसरा येऊन गेला. आता दिवाळीचे वेध. आणि आता तर काय मोदी साहेबांनी ‘ GST’ माफीची भेट देऊ केलीय. त्यामुळे यंदा दिवाळीत जरा जास्तच फटाके फुटतील! बंर , असो! राव , ह्या GST वेव्हरने खरा सुस्कारा कोणी सोडला असेल ना तर तो , ‘ जेष्ठ नागरिकांनी!’ “ का बरं ?”  म्हणून विचारताय! अहो , मेडिक्लेमचे प्रिमियम! ज्या टक्यांनी ‘मेडिक्लेम’ चे प्रिमियम वाढत आहेत ती बघता बरेच जण वार्षिक प्रिमियम भरण्यासाठी बॅंकेत आवर्ती ठेव योजना ( Recurring Deposit) सुरु करत आहेत. अहो , बरोबरच आहे ना! पन्नास-साठ हजाराचा फटका एकदम एका महिन्यात , खरोखरच फटकारतो की हो!  आता त्यावर १८ टक्याचा GST नाही , म्हणजे नऊ-दहा हजाराचा सुखद गारवा जेष्ठांच्या खिश्याला ऊब देतोय. तर मंडळी आता मेडिक्लेमचाच विषय निघालाय तर एक किस्सा आठवला.  झालं असं की , आपल्या या कथेतील नायक आप्पासाहेबांना हॅास्पिटलमध्ये भरती करावं लागलं. नेहमीप्रमाणे हॅास्पिटलमधून विचारणा झाली , “ मेडिक्लेम आहे का ?” “ हो , पाच लाखांचा आहे!”  अप्पासाहेबपण निर्धास्त होते. पण , बघतात तर त्यांच्या रूममध्ये अजून ए...

अनुदिनी ६५ - वाढीव हप्ता आणि पूल फंड / Blog 65 -An increased Premium and Pool Fund.

Image
नमस्कार मंडळी! असं कधी आपल्या बाबतीत झालं आहे का ? म्हणजे तुम्ही विमा पॅालीसी घेते वेळी एक प्रिमियम होता आणि ज्या वेळेस तुमचा प्रस्ताव  ( Proposal)  विमा कंपनीने स्विकारला त्या वेळेस तो वाढला. जर , असं झालं असेल ना तर मंडळी काळजीचं कारण नाही. का ? विचारता. सांगतो , सांगतो! राव , थोडा वेगळा विचार करा! विमा पॅालीसी विकणारी ‘विमा कंपनी’ ही एक कंपनी आहे ना की , धर्मदाय संस्था ?  म्हणजे ती फायद्यातच काम करणार. बरोबर ना! हा , तर! तिचा नफा , I mean profit  कशात असणार ? विमा पॅालीसीचा कालावधी जर वीस वर्षाचा असेल तर पूर्ण वीस वर्ष प्रिमियम घेण्यात की मधेच मृत्यूदावा ( Death claim) देण्यात ? काय , चक्रावलात का ? हा! बरोबर विचार केलात , पूर्ण वीस वर्षे प्रिमीयम घेण्यात विमा कंपनीचा फायदा आहे , ना की मधील काळात मृत्यूदावा देण्यात! मंडळी , आता विमा कंपनीने विमाप्रस्ताव स्वीकारण्यात तिचा  नफा बघितला हे तर तुम्हाला पटलं. बरोबर! ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे कंपनीला खात्री आहे की , ही व्यक्ती पॅालीसीचा कालावधी पूर्ण करणार.  काय राव , बरोबर ना ? So, tension not! तुम्ही म्हणाल ...