अनुदिनी ८२ -NPS मधील नवीन पर्याय. / Blog 82 – New Options in NPS
“अरे , आता पुढल्या आठवड्यात महालक्ष्मी म्हणजे घटस्थापना होणार की रे!” “मग ?” मी विचारलं. “त्या सात दिवसात एवढी गर्दी असते की डोळे भरून देवीचं दर्शनच होत नाही.” बाईकवरून मी आणि महेश उतरलो , गाडी स्टॅन्डवर लावून आम्ही देवीच्या मंदिरात पोहोचलो. “काय रे , देवीकडे काय मागितलं ?” मी आपलं सहज विचारलं. “अरे , आता ह्या महिन्याअखेरी मी निवृत्त होणार. थोडा हाताश होत महेश म्हणाला. आता काय करायचं ? एकदम पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते रे.” “अरे थोड्या दिवसांकरिता वाटेल असं. सवय नसते ना.” “अरे , मला चिंता वाटते ती ह्या वाढत्या महागाईची. आत्तापर्यंत ठीक होतं रेग्युलर इन्क्रिमेंट , प्रमोशन होत होती. त्यामुळे इन्कम वाढत होतं. आता व्याजावर जगताना त्या व्याजदराची शाश्वती राहिली नाही. मुद्दल तर काही वाढत नाही. मग वाढणारे खर्च कसे काय सांभाळायचे ? मेडिक्लेमचा हप्ता तर वर्षागणिक वाढतो आहे. त्याच्या वाढीच्या दराची तुला कल्पना आहेच ; त्यात तर काही तडजोड करता येत नाही. भले मी SWP (Systematic Withdrawal Plan ) मधून सोय करणार आहे पण त्...