अनुदिनी २३ - ‘चाय पे चर्चा -२’ 'Blog 23 - Chai pe Charcha - 2'

'चाय पे चर्चा -२'

ठाणं, ठाणं, ठाणं!!!!

संदिपच्या फ़ॅब्रिकेशनच्या वर्कशॅाप मध्ये पोहोचलो. संदिपने नुकतेच हे वर्कशॅाप सुरू केले होते. आजूबाजूला ३-४ कामगार कामात व्यग्र होते. वेगवेगळे आवाज आणि फ़ॅब्रिकेशनचा गंध वातावरणात भरलेला होता. मी बाहेर संदिपच्या बोलाविण्याची वाट बघत होतो. तो फोनवर तावातावाने बोलत असल्याचे दिसत होते. माझ्याशी नजर मिळताच त्याने मला आत बोलावले.

“हे बॅंकवाले काही ऐकायलाच मागत नाहीत. CC ची लिमीट वाढवून द्यायला काय नाटकं करतात ना! काय तर म्हणे तुमची बॅलन्सशीट बरोबर नाही,"

 फोन ठेवत संदिप पुटपुटला.

“बरं ते जाऊ दे! तू कसा आहेस” संदिपने एकदम ट्रॅक चेंज केला.

“एकदम झक्कास मजेत! बरेच दिवस भेट नाही!”

“हा! बरं झालं तू आलास ते, मला ह्या कामातून वेळच मिळत नाही. आत्ता ऐकलंस ना,  ह्या CC च्या लिमिट करीता मागे लागू की उद्योगधंदा बघू?”

“चहा घेशील ना!”

“हो”! मी उत्तरलो.

“थोडक्यात काय तर सध्या तुझी आर्थिक चणचण चालू आहे”.

" हो रे!

" तू ‘Overnight Fund’ विषयी काही ऐकलं आहेस का?" मी विचारले.

"नाही रे!" चहाचा घोट घेता घेता संदिप उत्तरला.

"काय असतं ते!"

“ऐक!”

“तुझं चालू खाते I mean, Current Account आहे.”

“हा!”

“त्यावर तुला व्याज मिळत नाही.”

“बरोबर!”

“काय कर! म्युच्युअल फंडातील ‘Overnight Fund’ मध्ये तू दुपारी १.३० च्या आत गुंतवणूक कर.

“समजा, तू शुक्रवारी दुपारी १.३० च्या आधी गुंतवणूक केलीस तर तुला गुरुवारची निव्वळ मालमत्ता मूल्य म्हणजे, NAV मिळेल, तुझी रक्कम ३ दिवस मुद्रा बाजारात म्हणजे, Money Market मध्ये गुंतवलेली राहील आणि सोमवारी सकाळी १०.०० वाजता तुझ्या खात्यात पैसे जमा."

"पण ह्या तीन-चार दिवसात काय होईल?" इती संदिप.

अरे हा Overnight Fund आहे याची परिपक्वता (Maturity) ही एक दिवसासाठीच असते.

हे एक प्रकारचे लोनच आहे जे प्रामुख्याने बॅंकेला दिले जाते त्यावर दिवसाला व्याज आकारले जाते, भले मुद्रा बाजार (Money Market) बंद असले तरीही.

"ओ!" संदीप उद्गारला.

"तुला ५ ते ६ टक्के कमाई व्हायला काहीच हरकत नाही" चहाचा कप ठेवत मी म्हणालो.

“वा, मस्त!”

तर, मंडळी तुम्हा-आम्हाला काय करता येईल?

आपल्याला दरमहा काही ठरावीक खर्च हा असतोच, बरोबर?

बरेचदा हा खर्च साधारणपणे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच असतो.

तर काय करायचं! हा 'ठरावीक खर्च' सुरवातीच्या महिन्यात आपल्या इतर शिलकीतून बाजूला काढून तो 'Liquid Fund' मधे गुंतवायचा आणि पुढील महिन्यात हव्या असणाऱ्या तारखेला तो काढून घ्यायचा.

मंडळी, अशा स्वरुपाच्या सूचना एकदाच कळविल्या की कायमस्वरुपी ही आपण ठरवलेली रक्क्म 'Liquid Fund' मधे जाणे व ठरावीक तारखेला बचत खात्यात येणे (Saving Account) चालू राहील. यामुळे दोन गोष्टी होतील,

•  अवाजवी खर्च टळेल व आपल्याला आर्थिक शिस्त लागेल.

•  ह्यात वर्षाला ७ टक्क्या पर्यंतचा परतावा अपेक्षित करू शकतो आणि हा परतावा जरी करपात्र असला तरी बॅंकेच्या तुलनेत तो उजवाच असेल.

मंडळी! 'Liquid Fund' हे सरकारी रोखे (Govt Bonds), कोषागार बिले (Treasury Bills) ह्या अश्या खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. ह्या फ़ंडाचा मुदतीचा कालावधी हा ९१ दिवसापर्यंतचा असतो आणि जोखीम म्हणाल तर "ना के बरोबर"!

पटतंय का ? जरूर कळवा !

'Chai pe Charcha - 2'

Bang, Bang, Bang !!

I reached Sandeep’s fabrication shop. Sandeep had recently started this shop. About 3-4 workers were busy with their jobs around. A cacophony of sound and the smell of fabrication were in the air. I was standing outside, waiting for Sandeep to call me. He was busy on the phone arguing with somebody. He called me in once he saw me.

“These bank fellows won’t budge at all. Making all the lame excuses not to increase my CC limit, citing the reason that my balance sheet is not correct,” grumbled Sandeep while ending his phone call.

“Oh! Leave it. How are you?” asked Sandeep and changed the topic.

“I am good; long time no see!!” I answered.

“Yes, Good that you came; I don’t get time now a, days after I started this new shop. You just heard; I don’t understand whether I should chase these bank fellows for CC limit increase or should I concentrate on my work?”

“You will have tea? Right!”

“Yes,” I said. In short, you are reeling through the paucity of finance.”

“Yes, man!”

“Have you heard about the “overnight fund”?” I asked.

“No,” said Sandeep while sipping on his tea.

“Listen then!”

“You have a current account!”

“Yes!”

“And you don’t get any interest on the amount in that account?”

“Right!”

“You invest in the “Overnight fund” of the mutual fund at 1:30 in the afternoon.”

“Suppose you invest on a Friday before 1:30 pm, then you get the NAV of Thursday for that amount, and your amount will get invested in the money market for 3 days, and the money will get credited to your account on Monday by 10 am.”

“But how will it happen in just these 3 days?” Asked Sandeep.

“Man, this is an overnight fund, and its maturity is in one day.”

“This is a type of loan that is mainly lent to the Banks, and interest is levied on this amount on a daily basis, even if the market is closed.”

“OH!’’ Exclaimed Sandeep.

“You would earn about 5 to 6% interest with ease, I suppose,” I said.

“That’s great!”

So Friends, What can we do?

We have definite expenses every month, right?

Most of the time, all these expenses are in the first week of every month.

So what is to be done is that you need to keep aside this “definite expense” amount from the savings and invest it in the Liquid fund and withdraw it on the required date of the next month.

Friends, once these “one-time” instructions are given to the bank, the intended amount gets invested in the liquid fund on the designated date, and the returns will get credited to the saving account on the designated date. With this, two things shall happen.

Unnecessary expenses shall get curtailed, and financial discipline shall get inculcated.

7% returns can be expected from this transaction. Though this is taxable, it will still be beneficial compared to the returns that Bank gives.

Friends the Liquid Funds are invested in reliable funds like Govt. Bonds, Treasury bills, etc. The lock-in period for these types of funds is up to 91 days, and the risk is almost NIL!

Do inform me if you are convinced.

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'