अनुदिनी २6 -‘अजित' / Blog 26 - 'Ajit'

अजित

मंद निळा प्रकाश ड्रॉइंग रुम मध्ये पसरला होता. समोरच्या खिडकीला लागूनच मोठा फिशटॅन्क ठेवला होता. खिडकीला लावलेले पडदे वाऱ्याच्या मंद झुळकीवर हलकेच झुलत होते. झुंबराचा किण-किणाट रात्रीच्या शांत वातावरणात एक लय धरत होता. त्या लयीत निरनिराळे रंगीत मासे जणू काही तालधरुन गिरक्या घेत लक्ष वेधून घेत होते.

बेडरूममधून त्यांच्या या हालचाली, पळापळ बघण्यात वेळ कसा जायचा हे कळायचेच नाही. गेल्या महिन्यापासून अजितचं हे रूटीन झाले होते.

अजितची ब्रेन ट्युमरची ट्रीटमेंट चालू होती. महत्वाचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. आता त्याला recovery, ला वेळ द्यायचा होता. आराम आणि वेळचे-वेळी औषधं याने तो महिन्याभरात ऑफिसला रूजू होणार होता.

गेल्या काही महिन्यांपासून पगार बंद पण खर्च बेबंद होत होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ताणतणाव नव्हता. त्याने समोर आलेली परिस्थिती स्वीकारली होती; आनंदाने नाही, तर समंजसपणे. आजारपण वा दुखणे, येणे न-येणे त्याच्या हाती नव्हते, पण त्याच्याकरिता समाधानाची बाब ही होती की अश्या अघटीत परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आलीच तर त्याची त्याने तरतूद केली होती.

हां मंडळी, तुम्ही बरोब्बर ओळखलंत!

पण, तुमचा गेस पूर्ण नव्हता.

कारण, अजितची मेडीक्लेम पॉलीसी होतीच पण सोबत त्याने ‘अतीगंभीर’ आजाराला (critical illness), तरणोपाय म्हणून ‘Critical illness’ ची वेगळी पॉलीसी पण घेतली होती.

त्यामुळे झाले असे की, त्याला एक रक्कमी १० लाखांची जी रक्कम मिळाली त्याने कुटुंबाला ‘Without Pay’ ची झळ बसू दिली नाही.

ह्या, पॉलीसी अंतर्गत, नमूद केलेल्या विशिष्ट अतिगंभीर आजारात, विम्याची रक्कम दिली जाते.

ज्याची मर्यादा ही २५ लाखांपर्यंत असते.

आपण काय करू शकता?

मंडळी! आर्थिक नियोजन हे फक्त गुंतवणुकीचे, परताव्याच्या टक्क्यांचे पर्याय धुंडाळण्यात नसावेत.

'Critical illness’ सारखी पॉलीसी आपल्या ‘Financial portfolio’ त जरूर असावी.

ती, आर्थिक नियोजनाची गणितं बिघडू देत नाही जरी ती कोणतेही परताव्याचे टक्के देत नसली तरीही.

मंडळी, सदर योजनेत मुदतीअंती (maturity benefit) परतावा नसतो.

मग, काय विचार केलात?

Ajit

The drawing room was illuminated with faint blue light. A fish tank was placed under the window on the opposite side. The curtains were swaying to the breeze, and the tinkling sound of wind chime rhymed to the quiet of the night. It appeared that the colorful fishes in the fish tank were dancing to the tune of the wind chime and were attracting attention.

Watching the movement of these fishes, Ajit would never know how his time was passing. This had become his routine since last month.

Ajit was recuperating after a successful major surgery on a brain tumor. He wanted to allow himself time to recover. Adequate rest and timely medicines would help him to bounce back and join the office in one month.

For the last few months, he had no salary and had a huge expense to incur. In spite of all this, there was not a crease of tension on his face. He had accepted the situation he was facing, not with happiness, but with thoughtfulness.

Though the ailment he was facing was not in his hands, it was a respite for him that he had provisioned for such contingency if at all it arose.

Yes, friends, you guessed it right.

But your guess is not complete.

Because not only did Ajit have his medical policy, but he also had a critical illness policy, which he had taken for any such contingency.

And because of this, he got a lump sum amount of ₹. 10 Lacs which helped him in protecting his family from the paucity of funds.

What can you do?

Friends, financial planning just does not mean only investments and returns. One should always have one such critical illness policy in one’s financial portfolio.

It does not overturn the financial balance though it does not fetch any returns.

Under such policy, the amount given to the policyholder for such critical illness is up to a tune of ₹. 25 Lacs.

Friends, please note that such policies do not have any maturity benefit.

Then, what have you decided?

Comments

Popular posts from this blog

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

अनुदिनी ३८ - 'EPS-NPS’ / Blog 37 - 'EPS-NPS'