अनुदिनी -२२ 'तुळशी विवाह - विवाह' / Blog-22 'Tulsi Vivah - Vivah'

'तुळशी विवाह - विवाह'

नमस्कार मंडळी!

कसे आहात ?

कशी काय गेली दिवाळी ?

खरं तर अजून दिवाळी संपलीच कुठे?

अहो, अजून तुळशीचं लग्न कुठे लागलंय!

काय, बरोबर ना ?

आणि मंडळी तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतरच तर आपल्या जोडीदाराच्या गाठीचे, म्हणजेच लग्नाचे मुहूर्त बघायला सुरवात होते. त्यामुळे इकडे ही  दिवाळी सरत आली की दुसरीकडे नात्यातील 'सस्नेह-दिवाळीची' मुहूर्तमेढ पक्की केली जाते आणि हीच तर आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे.

तर, असो!

मंडळी, बघता बघता 'अनुदिनी' सुरु करून एक वर्ष होत आलं की!

आपल्याला हा 'संडे-ब्लॉग' आवडतो, हे कळवले व सांगितले त्या बद्दल धन्यवाद!

पण, मंडळी 'आवड' ही व्यक्तीसापेक्ष बाब असते, अगदी गुंतवणूकीच्या बाबतीतही ती व्यक्ती नुसार बदलते.

पण, जरी गुंतवणूकीचे ठोकताळे वेगवेगळे असले तरी, बरीचशी आर्थिक उद्दिष्टे ही सामायिक म्हणजे एकसारखी असतात, जसे की शिक्षण, लग्नकार्य, पेन्शन वगैरे, इत्यादी करता आवश्यक आर्थिक तजवीज.

आता ह्या उद्दिष्टांकडे लक्ष देत असताना खाली नमूद केलेल्या बाबींकडे आपण कितपत सजगपणे बघता हे देखील महत्वाचे आहे.

म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर, आपले उत्पन्न आणि आपला असलेला विमा ह्यांची आवश्यक ती सांगड तसेच आर्थिक आणीबाणीच्या काळात जरुरीची असणारी गुंतवणुकीची तरलता (Liquidity) हे काही मुद्दे.

तर अश्या स्वरूपातील १० प्रश्न; पुढे दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये विचारले आहेत.

आपण दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने सध्याचा असलेला आपला 'आर्थिक नियोजनाच्या स्थितीचा रिपोर्ट' (Present Financial Health) आपल्याला ईमेल केला जाईल.

आपल्याला काय करायचं आहे ?

तर, वरील दिलेल्या लिंकला क्लीक करून गुगलफॉर्म वर विचारलेल्या प्रश्नांसमोरचा एक पर्याय निवडायचा आहे आणि तुम्हाला पाठवलेला रिपोर्ट अभ्यासायचा आहे.

करताय ना क्लीक !

'Tulsi Vivah - Vivah'

Hello Friends!!

How are you all?

How was your Diwali?

Actually, the Festivities are yet to be over!!

We are yet to celebrate the marriage of Tulsi, right?

And friends, after the celebration of 'Tulsi Vivah,' we all start looking for the auspicious day for the general marriage ceremonies. That’s how and why, when the Diwali festivities are about to end, it marks the beginning of new relations. And this is the first step of financial planning.

So!

It has been about a year since I started writing this blog. I am thankful for your response and feedback that you like this Sunday blog.

Friends, fondness, or liking is a relative term and vastly varies from person to person. Exactly is the case with investment patterns also.

Though the methods of investments are varied, most of the financial goals are similar or the same, e.g., financial provisioning for education, marriage, pension, etc.

Now, while planning for these goals, it is important that proper attention is paid to following as well. For example, the insurance policy and our income are to be proportionate, liquidity of investments in case of emergency, etc.

Friends!

The google form that follows shall have 10 questions. Please answer these 10 questions seriously, and based on the answers, we shall email you your present financial health report.

To fill out this form, please click the link below and select the correct option for each question. Once you get the report, you can analyze it.

So, are you ready to click and fill out the form?

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'