अनुदिनी २७ - 'बळवंतराव आणि परीराणी'
आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे! भावगीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत भावसरगम. "कोमेजून निजलेली एक परीराणी उतरलेले तोंड डोळा सुकलले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही" श्रोतेहो, आत्ताच आपण संदीप खरे व सलील कुलकर्णींनी ह्यांनी गायलेली 'दमलेल्या बाबाची कहाणी' हे..... , निवेदकाचे पुढचे बोलणे वातावरणात विरत होते. केतकीच्या कानात फक्त 'दमलेल्या बाबा ची कहाणीचे' सूर घुमत होते. डोळ्यातील टपोऱ्या थेंबातून आठवणींची गंगा वाहत होती. अश्रूंच्या त्या चवीत ती बाबासोबतच्या आठवणींची गोडी चाखत होती. बळवंतरावांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे त्यांचा घरात पाय ठरत नसे.आपल्या अश्या ह्या नोकरीमुळे आपल्या एकुलत्या एका लेकीचे व पत्नीचे हाल होऊ नयेत म्हणून ते एकटेच फिरतीवर असत. पण ज्या वेळी ते घरी असत तेव्हा ते जास्तीत जास्त वेळ केतकी सोबत घालवत. त्या धुसर दृष्यातही केतकीला पाठंगुळीवर घेऊन पळणारा, तिच्या आजारपणात जागणारा, तिला आईस्क्रीम खाऊ घालणारा आणि तिची नजर चुकवून तिच्या आईस्क्रीमचा चावा घेणारा, तिला हसवणारा-रडवणारा, बाबा दिसत होता. अचानक तिच्या हातातील मोबाईल वर SMS चा अलर्ट वाजला आणि ती भानावर आली. तिच्या खात्यात बाबा गेल्यापासून दरमहिना पंचवीस हजार जमा होत होते. बाबा ने तिच्यासाठी आयुष्यभराची तरतूद करून ठेवली होती. त्याच्या मायेची उब तो त्याच्या पश्चातही तिला कायमचा देऊन गेला होता. मंडळी, बळवंतरावांनी केतकीकरिता काय केले होते? त्यांनी, केतकी सोबत ‘जीवन शांती’ ही पेन्शन योजना घेतली होती. त्यात त्यांनी एकरक्कमी पैसे गुंतवले होते. मागच्याच वर्षी त्यांना पेन्शन सुरु झाले आणि अचानक त्यांचे जाणे झाले. आता केतकीला तिच्या आयुष्यभर तेवढीच रक्कम कायम मिळणार होती आणि तिच्या पश्चात तिच्या मुलीला आजोबांकडून एकरक्कमी रक्कम मिळणार होती. मंडळी, कशी वाटली आमच्या बळवंतरावांच्या परिराणीची कहाणी? जरूर कळवा. |
Comments
Post a Comment