Posts

Showing posts from October, 2023

अनुदिनी ४८-'वार्षिकी / Blog 48 - 'Annuity'

Image
"हा, अरे भाई, ये ये!" संदीपने मिलिंदभाईला आत घेतले. संध्याकाळची वेळ होती. घरातली मंडळी डायनींग टेबलभोवती चहाची मस्त तल्लफ भागवत होती आणि सोबत मस्त गरमागरम 'खेकडा-भजी.’ (मंडळी, खेकड्याची भजी नव्हे तर एका विशिष्ठ प्रकारे चिरलेल्या कांद्याची भजी) लगोलग भाईलासुद्धा चहाचा कप आला. संदीपची आई, 'लीलाकाकू' वय वर्षे ६५. शाळेतून निवृत्त झालेल्या त्यांच्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय सुचवण्यासाठी 'मिलिंदभाई' चे आगमन झाले होते. आता लीलाकाकू पेन्शनधारक होत्या, दोन्ही मुले कर्ती-सवरती झाली होती त्यामुळे 'गुंतवणुकीच्या फ्रंटवर' त्या निवांत होत्या. असणारी पेन्शन देखील त्यांना वापरायची गरज पडत नव्हती. येत असलेली काही पेन्शन सरळ बँकेत रिकरिंग खात्यात व काही मुलांच्या आग्रहाखातर म्युच्युअल फंडात, SIP मध्ये जात होती. मोठ्या मुलाच्या ऑफिसमधील मेडिक्लेम पॅालीसीत त्यांचे नाव होते. थोडक्यात मंडळी, लिलाकाकू चांगला बँकबॅलन्स ठेवून होत्या आणि मस्त आनंदाने दिवस जगत होत्या, ढकलत नव्हत्या.

अनुदिनी ४७ - 'साडूभाऊ आणि मेडीक्लेम-रिचार्ज' / Blog 47 – ‘Co-brother and Mediclaim recharge’

Image
काय, कसा काय झाला गणपती उत्सव? आपला हा भाद्रपद महिना एकदम भरगच्च असतो ना? असतो फक्त गणपती बाप्पाचा उत्सव पण १० दिवस फुल जल्लोष. मंडळी, नाक्यावर आमच्या मित्रांच्या गप्पा चालल्या होत्या. बोलता बोलता एका मित्राच्या साडूभाऊंचा विषय निघाला. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यांनी सेकंड ओपिनियन घेतले आणि मग ठरवून रीतसर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता दिल का मामला म्हणजे जरा नाजूकच की! पण, हा साडूभाऊ एकदम बिनधास्त. ऑपरेशन थेटरमध्ये नेईपर्यंत ‘OTT’ वर मस्त सिनेमा बघत होते. झालं काही नाही, डॉक्टरांना ग्राफीमध्ये दोन ठिकाणच्या रक्तवाहिन्या (Blood Vessels) जरा जास्तच अरुंद दिसल्या. ग्राफिच्या ऐवजी ‘बायपास’ करणेच योग्य ठरणार होते. मग केली की राव! काय करता? परत परत कोण हा उद्योग करेल? दोन सोडून तीन ठिकाणी केली. आता खर्च विचारू नका. जसे ‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ’ विचारू नये म्हणतात तसे एकदा का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले की डॉक्टरांचे बिल विचारू नये. भरून मोकळे होणे हा एकमेव पर्याय असतो. आता तुम्ही म्हण