Posts

Showing posts with the label Economy

अनुदिनी ७३ - अंडरस्टैंड सिबिल स्कोर एंड इकनोमिक ग्रोथ रिलेशन / Blog 73 – Understand the CIBIL score and economic growth relation.

Image
लाउंज मधून बाहेर पडलो आणि गेटपाशी जायला निघालो.  समोरच गेट नंबर ४५ कडे जाण्याचा बाण दाखवला होता. आम्ही गेटपाशी पोहोचलो तर समजलं फ्लाईट अर्धा तास उशिरा सुटणार आहे.  " चला बरं झालं!" असे पुटपुटत पुरुषोत्तमभाईंनी आपली डफल बॅग वेटिंग लाउंजच्या एका  मोकळ्या खुर्चीवर ठेवून दिली. आणि समोरच्या कॉफी स्टॉलकडे मोर्चा वळवला.  " चला मिलनभाई कॉफी घेऊ!"  कॉफी खरोखरच लाजवाब होती. पुरुषोत्तम भाईंनी १०० मिली च्या दोन कॉफी साठी साडेचारशे रुपये मोजले. मी संभ्रमात पडलो. अदानी लाउंज मध्ये दोन रुपयात जवळपास हजार रुपयांचा बफे ब्रेकफास्टचा आग्रह धरणारे , त्याकरिता आपली वेगवेगळी क्रेडिट कार्डस् पडताळून पाहणारे , आता पाचशे रुपये देऊन मोकळे.  मला राहवले नाही. मी सरळ त्यांना विचारता झालो.  " पुरुषोत्तमभाई एक विचारू का ? Please, don’t take it otherwise!"   " अरे विचारा की , मिलनभाई काही वांदा नाही!" पुरुषोत्तमभाईंनी डोळ्यावरची सोनेरी बट बाजूला करीत माझ्या पाठीवर थाप मारली.     " मघाशी तुम्ही दोन रुपयात बफे ब्रेकफास्ट मिळतोय म्हणून वेळ काढून तुमच्याकडची क्रे...

अनुदिनी ७१ -सिप, टर्म इन्शुरन्स आणि युलिप / Blog 71 – SIP, Term Insurance, and ULIP

Image
मधल्या काळात एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाक्षिकातील लेख वाचनात आला. त्याने युलीप योजना कशा अयोग्य आहेत त्याविषयी बरीच मुक्ताफळे उधळली होती आणि त्याच्या म्हणण्यानुसार गुंतवणुकीसाठी फक्त बाजारच योग्य आहे. मंडळी , गुंतवणुकीचे त्या त्या काळातील उपलब्ध असलेले मान्य पर्याय हे गुंतवणूकदारांची भलामण करण्यासाठी नसून प्रत्येकाच्या मानसिकतेतील जोखीम घेण्याच्या कमी-अधिक वृत्तीला पूरक असतात.  उदाहरणच द्यायचं झालं तर बँकेतील मुदत ठेव योजना ( Fixed Deposits), यावरील परतावा हा अत्यंत जुजबी स्वरूपातील असूनही त्यात गुंतवणूक ही होतच असते. ह्यात गुंतवणूकदार आपली सोय , मुद्दलाची सुरक्षितता बघत असतो.  तर , भविष्य निर्वाह निधीतली ( PPF) गुंतवणूक ही जरी १५ वर्षांसाठी असली तरी त्यावरील मिळणारा करमुक्त परतावा व सुरक्षितता , ह्या बाबी गुंतवणूकदाराला आकर्षित करतात.  असो , तर मंडळी आजच्या अनुदिनीचं प्रयोजन हे आपल्याला एखादं गुंतवणुकीचं माध्यम अथवा योजना ही दुसऱ्या गुंतवणुकीसमोर कशी अयोग्य आहे हे दाखवायचं नसून उपलब्ध पर्यायातील कोणता पर्याय तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो हे समजावून सांगणं आहे.  ह्या...

अनुदिनी ६२ - Indexation / Blog 62 – Indexation

Image
कुलकर्णी सरांनी डोळ्यावरचा चष्मा काढून बाजूला ठेवला आणि समोर टीपॅायवर पेपर घडी घालून ठेवला. वाफाळलेला चहाचा कप त्यांची वाट बघत होता. चहाचा एकेक घोट घेत असताना त्यांच्या डोक्यात विचारांचे चक्र चालू होते. तेवढ्यात पिरियड संपल्याची बेल झाली आणि ते हातात पुस्तक घेऊन क्लासरुमकडे निघते झाले पण पिरियड संपल्यावर प्रिन्सिपल परांजप्यांना भेटायचे त्यांनी निश्चित केले. शाळेत कुलकर्णी सर हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. पुस्तकी अभ्यासक्रमाव्यतीरिक्त विषय हे मुलांना कळावेत त्यांची ओळख व्हावी आणि झालीच तर त्याची आवड निर्माण व्हावी म्हणूत ते नेहमी सजग असत, जागरूक असत. मागे ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी अमेरिकेत गेले असताना त्यांची एका जपानी प्राध्यापकाबरोबर ओळख झाली. ती व्यक्ती बागकाम ( horticulture ) च्या क्षेत्रात कार्यरत होती. तेथून आल्यावर सरांनी लगोलग मुलांकरिता ‘बोन्साय’ ह्या विषयावर एक सत्र घेतले. नुसतेच क्लासरुम लेक्चर न घेता त्यांनी एका नावाजलेल्या नर्सरीत त्यावर कार्यशाळा पण घेतली. तर, मंडळी सांगायचं काय होतं तर नुकतेच संसदेत बजेट मंजूर झाल्याने त्यांना मुलांना त्या विषयी माहिती देण्याच...