Posts

Showing posts from October, 2022

अनुदिनी -२२ 'तुळशी विवाह - विवाह' / Blog-22 'Tulsi Vivah - Vivah'

Image
'तुळशी विवाह - विवाह' नमस्कार मंडळी! कसे आहात ? कशी काय गेली दिवाळी ? खरं तर अजून दिवाळी संपलीच कुठे? अहो, अजून तुळशीचं लग्न कुठे लागलंय! काय, बरोबर ना ? आणि मंडळी तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतरच तर आपल्या जोडीदाराच्या गाठीचे, म्हणजेच लग्नाचे मुहूर्त बघायला सुरवात होते. त्यामुळे इकडे ही  दिवाळी सरत आली की दुसरीकडे नात्यातील 'सस्नेह-दिवाळीची' मुहूर्तमेढ पक्की केली जाते आणि हीच तर आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. तर, असो! मंडळी, बघता बघता 'अनुदिनी' सुरु करून एक वर्ष होत आलं की! आपल्याला हा 'संडे-ब्लॉग' आवडतो, हे कळवले व सांगितले त्या बद्दल धन्यवाद! पण, मंडळी 'आवड' ही व्यक्तीसापेक्ष बाब असते, अगदी गुंतवणूकीच्या बाबतीतही ती व्यक्ती नुसार बदलते. पण, जरी गुंतवणूकीचे ठोकताळे वेगवेगळे असले तरी, बरीचशी आर्थिक उद्दिष्टे ही सामायिक म्हणजे एकसारखी असतात, जसे की

अनुदिनी - २१ 'सुनील-तात्यासाहेब -पाटील' Blog-21 'Sunil - Tatyasaheb -Patil'

Image
'सुनील-तात्यासाहेब -पाटील' 'हॅलो, सुनील!' "कसा आहेस!" "बरेच दिवसात फोन नाही!" "बरं, तू भारतात केव्हा येणार आहेस?" "अरे, अजून काही नक्की नाही. पण,मला नाही वाटत की मी एवढ्या लवकर येईन. दोन-तीन वर्ष तरी नाहीच." इति सुनील. मंडळी, सुनील अमेरिकेत आहे आणि त्याची विमापॉलीसी परिपक्व (matured) झाली, पण त्याचे इथे येणे काही वर्ष तरी नक्की नसल्याने तो आल्याशिवाय विम्याचे मूळ दस्ताऐवज (Original policy document) मिळणे अशक्य. त्यामुळे विम्याचा दावा हा नाहक प्रलंबित होत होता. घटना क्र.२ "अहो! परवा आईंचा फोन होता, तुम्ही कोल्हापूरला असताना काढलेल्या विमापॉलीसिचे पैसे मिळणार आहेत तर त्याचे पेपर्स वेळेत पाठवून द्या," त्या सांगत होत्या. "अरे, हा बरी आठवण केलीस. मागे आपण नाशिकला असताना  तुझी पॉलिसी काढली होती ती पण शोधून ठेव." तात्यासाहेबांनी बायकोला सांगितले. मंडळी, काय झालं! तात्यासाहेबांच्या फिरतीच्या नोकरीमुळे वेग