Posts

Showing posts from July, 2022

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

Image
राजेश खन्ना-हेमा मालीनी “ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “हो ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “ओडले एड्लीई ओ…” काय मंडळी, हे गाणं आपल्या परिचयाचं नसेल असं होणारच नाही. वाचता, वाचता तुम्ही ते मनात गुणगुणायला सुरवात देखील केली असणार. बरोबर ना! अहो, गाण्यातले शब्द तर अर्थपूर्ण आहेतच पण हे गाणं ज्या दोघांवर चित्रित (picturized) केलंय ती, दोघं ही त्यावेळची एकदम सुपरहिट जोडी ना राव! त्यामुळे भट्टी एकदम मस्त जमली! ह्या गाण्यात राजेश खन्ना, हेमामालिनीला घेऊन ज्या प्रकारे बुलेट चालवतो…, त्याचे ठीक आहे राव, तशी गाडी चालवण्याचे त्याला पैसे मिळाले, पण आपलं काय? एकतर, "मामा" आपल्याला बाजूला घेईल आणि आपलंच पाकीट खाली करेल आणि ह्या पावसात अशी गाडी चालवल्यावर, तर आपलं रद्द केलेलं लायसन्स परत मिळवण्यासाठी आपण धडधाकट असू की नाही ते माहित नाही. पण, आयुष्याच्या त्या वळणावर अशी झोकदार डबलसीट गाडी आपण चालवली असेलच, जरी नसेल चालवली, तरी

चाय पे चर्चा - Chai Pe Charcha

Image
चाय पे चर्चा "काय जोशी साहेब!" "डिक्लेरेशन, चा फॉर्म भरला का?" "अरे! भरला आहे, पण या ८० सी च्या दिड लाखाने गोची करून ठेवलीये ना!" “हां! ते तर सर्वांचंच कायमचं दुखणं आहे”, बळवंतरावांनी दुजोरा दिला. "पण मग, NPS अकाऊंट उघडा की राव!" बळवंतराव पुटपुटले. "अरे, ते माहित आहे! पण आज माझं वय आणि रिटार्यमेन्ट चं वय बघता ह्या ६ - ७ वर्षात NPS मध्ये पैसे भरून काय उपयोग?" "अगदी पूर्ण पन्नास हजार जरी ह्या ६ - ७ वर्षात भरले तर ह्या ३.५० - ४ लाखात पेन्शन ती काय मिळणार?" "त्या पेक्षा टॅक्स भरलेला बरा!", वैतागून जोशी खुर्चीत बसले. हसत हसत, बळवंतरावांनी चहाचा मस्त भुरका घेतला. तेवढ्यात, जोशींचापण चहा आला. "घे, अगोदर चहा घे! मग सांगतो काय करता येईल ते!" बळवंतराव उत्तरले. “तू हस लेका!” “तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड ना!” “दर, ३ - ५ वर्षांनी नव-नवीन गाड्या घ्याल, लेटेस्ट लॅपटॉप घ्याल, आणि मग कर वाचवायचा म्हणून त्