Posts

Showing posts from December, 2023

अनुदिनी ५३ - 'इन्शुरन्स, ऑनलाईन की ऑफलाईन' / Blog 53 - 'Buying Insurance Online or Offline'

Image
"अरे सॅम, त्या एजन्टने ईमेल केलेले इन्शुरन्सचे प्रपोजल तू ऑनलाईन तपासणार होतास ना?" उश्यांचे अभ्रे घालता, घालता उत्तराने समीर उर्फ सॅमला ढोसले. "हो हो बघीतले गं! ऑनलाईन प्रीमियम वर्षाला जवळपास ३०,००० रुपयांनी कमी आहे." परवाच सॅमचे बाबा त्यांच्या ओळखीच्या वित्तीय सल्लागाराला (Wealth Advisor) घेऊन आले होते. सॅम - उत्तराला गुंतवणुकीविषयी काही अडचणी व शंका होत्या आणि त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन हवे होते. विषयाच्या ओघात सध्या असलेल्या विमापॉलिसींविषयी बोलणे झाले. सॅमने त्यांच्या आग्रहाखातर त्या कपाटातून शोधून आणल्या. तेवढ्यात सिद्धू तेथे आला. त्याची लुडबुड सुरू झाली. खरेतर नवीन व्यक्तीला पाहून तो रडायचा, आरडाओरडा करायचा. पण कसा कोण जाणे तो त्या अनोळखी व्यक्तीच्या मांडीवरच जाऊन बसला. सिद्धूच्या एकंदरीत वागण्यामुळे सॅम - उत्तरा पाहुण्यांसमोर त्याला नेत नसत, चारचौघात त्याला नेणे ते टाळत असत. हो मंडळी,कारणच तसं होतं! सिद्धूला डाऊन सिंड्रोम होता! पण आज त्या अनोळखी व्यक्ती सोबत

अनुदिनी ५२ / Blog 52 - 'Planning, Planning & Planning'

Image
नमस्कार मंडळी! "माणूस हा प्लॅनिंग करता नसून माणसासाठी प्लॅनिंग आहे" तर त्यामुळे प्लॅनिंगला किती महत्व द्यायचे हे आपणच ठरवले पाहिजे. अहो, ह्या नियोजनातील अविभाज्य घटक 'भाववाढ'. जो आपल्या हातात नाही. आणि ज्या गोष्टीवर आपण प्रभाव टाकू शकत नाही अशा घटकावर विसंबून आपली आर्थिक गणिते किती अचूक ठरणार? हा, तर मी काय म्हणत होतो! तर, पुढच्या, पुढच्या, म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे किती नियोजन करायच कि वो! मुळात किती योजना आखायच्या? नोकरी लागल्यावर जवानीच्या जोशमधे स्वतःकरता खर्च करतांना ह्या सर्व गोष्टींची जाणीव होत नाही. पस्तीशी पार करता, करता मुलांच्या 'स्कूल' च्या फियांचे आकडे समजायला लागल्या नंतर 'शाळेचे', 'स्कूल' असे बारसे झाल्यावर ऐवढा फरक पडलेला पाहून पश्चिमेकडील ‘DINK' (Double Income No kids) पॅालीसीची आठवण आल्या शिवाय रहात नाही. सालं, आपण वेस्टनकलचर् ऐवढे ईझीली फॅालो करतो तर हे करायला काय हरकत आहे? मोदींना म्हणावं येवढ्या योजना राबवत आहात तरं ही पण

अनुदिनी ५१ - गुंतवणुकीत तारखांचे महत्व / Blog 51 - Importance of dates in investments

Image
'बंद करा तुमचे संगीत, ऐका निसर्गाचे गीत' मिहीरने सर्वांना बोट दाखवून समोर लिहिलेला सूचना फलक दाखवला आणि खरोखरच सर्वांच्या गप्पा, हसणे -खिदळणे बंद झाले. कर्नाळा किल्ल्यावरील ट्रेक मिहीरने आई-वडील आणि त्याच्या बहिणींकरिता आखला होता. नुकतीच दिवाळी संपली होती सुदैवाने वीकेंडला लागून सुट्टी आली होती; मस्त ३ दिवस मिळाले. वातावरणात छान गारवा होता. महत्वाचे म्हणजे सर्वांचे मोबाईल डेड झाले होते. "रेंज येत नाही" असा सुरवातीला खूप गाजावाजा झाला. श्वेता तर मिहिरवर ओरडलीच, "अरे काय रे तुला दुसरा स्पॉट नाही मिळाला का?" पण थोड्याच वेळात सगळेजण आसमंतात गुंजणाऱ्या अनोख्या आवाजांनी स्तब्ध झाले. नक्की कळेना हे आवाज प्राण्यांचे आहेत की पक्ष्यांचे. सर्वांचे डोळे आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांचे वेध घ्यायला लागले. दररोज नजरेच्या टप्प्यात 'कावळा' ह्या एकमेव पक्ष्याला बघणाऱ्या त्या सर्वांना ही पक्ष्यांची वैविध्यता म्हणजे नजरेला एक मेजवानीच होती. चारपाच तास कसे गेले ते कळलेच नाही. दमून भाग