Posts

Showing posts with the label SIP Investment

अनुदिनी ७६ - भटकंती आणि निवृत्तीचे नियोजन / Blog 76 – Wanderlust and retirement planning

Image
  “ ह्या एप्रिल महिन्यात कुठे फिरायचं म्हंटलं की माझ्या तर अंगावर काटा येतो. ” नाक्यावरच्या इराण्याच्या कॅफेत थंडगार बियरचा घोट घेत शंतनू खुलत होता. " सॅम! अरे , श्रेयाला भटकायला चिक्कार आवडतं. आणि तुला सांगतो , ते ही साला एकदम डिफरंट ना रे! गेटवे पासून ते भाऊच्या धक्क्या पर्यंत पौर्णिमेच्या रात्री Yacht वरून हिंडायचे ; सोबत कुमार गंधर्व , लता , तलतची गाणी . " " शंत्या , आयला तुझी फियान्सी एकदमच भन्नाट आहे. पण मला तू हे सगळं ह्या भर उन्हात सांगायचं कारण ? म्हणजे एकतर तुला 'Foster' चढली किंवा श्रेयाच्या बकेट लिस्टने तुझी उतरली." " अरे , सॅम थोडं बहुत तसंच रे!" " म्हणजे तुझी उतरली." खदाखदा हसत सॅमने फेसाळणाऱ्या बियरचा घोट घेतला. " हा रे!  आयला तिचे फंडेच निराळे.....   तिला मुलं नको. वयाच्या पंचेचाळीशी पर्यंतच काम करणार. नंतर फक्त फिरायचं." " अरे , पण आत्ता चांगले खोऱ्याने ओढताय ना ?"  सॅमने वेटरला रिपीटची खूण करून चिकन चिलीचा एक बाईट घेतला. " ते सगळं ठीक रे! पण तिचं बोलणं मी आत्तापर्यंत मनावर घेतलं नव्हतं. म्हंटलं ,...

अनुदिनी ७२- माझा दोन करोडचा टर्म प्लॅन आहे / Blog 72 – I have a two-crore term plan

Image
मंडळी , झालं असं , परवा एका कॉलला गेलो होतो.  तो नुकताच एका मुलीचा बाबा झाला होता. आणि साहजिकच त्याला तिच्यासाठी , तिच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करायचं होतं. “काका , माझा दोन करोडचा टर्म प्लॅन आहे!” निखिलने माहिती द्यायला सुरुवात केली.  “सोबत ‘सुकन्या समृद्धी’ घेतली आहे. त्यात जसे जमेल तसे पैसे भरतो.  आणि हो! स्मिताने रागिणीसाठी   ‘ SIP’ सुरू केलीय. आता अजून काय हवं ?” निखिल जरा त्रासिक चेहरा करत विचारता झाला. “हा प्रश्न निखिल तू एकदम बरोबर विचारलास! उद्याचा तुझा भरवसा नाही म्हणून तू दोन करोडचा विमा काढलास. आता तुझ्या ठिकाणी जर मी आहे असा विचार केला , तर ह्या टर्म प्लॅनचे पैसे मिळण्याच्या बाबतीत कोणती शक्यता असेल ?    म्हणजे , मी जर विम्याचा निवडलेला कालावधी पूर्ण केला तर परिपक्व दावा , म्हणजे ‘ Maturity claim’  देय नसेल ; पण कालावधी दरम्यान माझा मृत्यू झाला असेल तर मात्र दोन करोड देऊन जाईन. पण मित्रा , आपल्या ‘रागिणीच्या’ शिक्षणाच्या बाबतीत तर मात्र ‘जर-तर’ संभवत नाही ना रे! तिच्या कोणत्या वयात जास्त रकमेची आवश्यकता आहे आणि साधारणपणे ती किती असेल ह...