Posts

Showing posts with the label Joint Family System

अनुदिनी ७७ - आकाशचे आकाश / Blog 77 – Aakash!

Image
  " गुड मॉर्निंग , सर!" आकाशने केबिनचे दार नॉक करून आत येऊ का म्हणून विचारले.  " अरे , ये! तुझीच वाट बघतोय." " सॉरी पीटीला थोडा जास्त वेळ थांबावं लागलं." आकाश एका जिममध्ये प्रशिक्षक ( Trainer) म्हणून काम करतो. एकदा विषयाच्या संदर्भात बोलताना त्याला माझ्या व्यवसायाची माहिती समजली , आणि आपण एखाद दिवस जरूर भेटू असे म्हणून तो दिवस आज उगवला.  मी आकाशला त्याच्या कुटुंबाविषयी माहिती करून घेण्याच्या प्रयत्नात काही प्रश्न विचारू लागलो.  " सर माझी गुंतवणूक ही स्वतःला आणि कुटुंबाला फिट ठेवण्यात होते. साहेब तुम्ही आजूबाजूला बघाल ना तर मी तुम्हाला पैज लावून सांगतो एक जात सगळे ढेरपोटे झाले आहेत. मग पैसा लागतोय कुठे ?  पन्नाशीनंतर ही ढेरी त्रास द्यायला सुरुवात करते की!  ‘When a belly becomes a pot, it troubles you lot!’ आणि दुसरी बाब म्हणजे माझ्या मुलाचं कसं काय होणार ? ह्या दोन शारीरिक आणि मानसिक चिंताच साध्या जगण्याचा आनंद हिरावून घेत आहे. सर , आम्हा दोघा भावंडांची लग्न झालेली आहेत. तुम्ही आर्थिक नियोजन करून देता ते ठीक पण आम्ही एक वेगळीच  नियोजन पद्धत स्वीकारली आ...