Posts

Showing posts with the label Family Financial Planning

अनुदिनी ७९ - GIFT CITY / Blog 79 - GIFT CITY

Image
  " अरे , साक्षी आता ऑगस्ट महिन्यात डब्लिनला चालली आहे. तसं तिचं आधीच ठरलं होतं की MS  बाहेरून करायचं. आणि त्याप्रमाणे गेल्या सात आठ वर्षांपासून मी  गुंतवणुकीवर  जरा जास्तच जोर दिला होता. खास करून म्युच्युअल फंडातील 'SIP' मध्ये जाणीवपूर्वक दर वर्षाला रक्कम वाढवत गेलॊ.  पण काही उपयोगच झाला नाही.  तरी बरं दर दोन-तीन वर्षांनी मी फंडांचा आढावा घेत होतो. मला अपेक्षित असलेला तेरा ते चौदा टक्के परतावा मिळत होता." वीरेंद्र तावातावाने बोलत होता.   " मग लेका माशी शिंकली कुठे ?" इती  प्रशांत.  " माशी शिंकली की नाही हे माहिती नाही , पण आपला रुपया डॉलर समोर शिंकून , खोकून बेजार झाला. आणि आम्हाला रडवेला करून गेला." वीरेंद्रने वैतागून एका दमात चहाचा कप रिकामा केला.  " अरे बाबा नक्की झालं काय ?  उगीचच गोलगोल फिरवू नकोस." प्रशांत शांतपणे चहाचा घोट घेत विचारता झाला.     " अरे प्रशांत , सात वर्षांपूर्वी युरोच्या समोर रुपयाचा भाव होता ७८." " म्हणजे जेव्हा तू गुंतवणूक सुरु केलीस तेव्हा ?" " बरोबर! आणि , आज तो ११२ रुपये आहे....

अनुदिनी ७७ - आकाशचे आकाश / Blog 77 – Aakash!

Image
  " गुड मॉर्निंग , सर!" आकाशने केबिनचे दार नॉक करून आत येऊ का म्हणून विचारले.  " अरे , ये! तुझीच वाट बघतोय." " सॉरी पीटीला थोडा जास्त वेळ थांबावं लागलं." आकाश एका जिममध्ये प्रशिक्षक ( Trainer) म्हणून काम करतो. एकदा विषयाच्या संदर्भात बोलताना त्याला माझ्या व्यवसायाची माहिती समजली , आणि आपण एखाद दिवस जरूर भेटू असे म्हणून तो दिवस आज उगवला.  मी आकाशला त्याच्या कुटुंबाविषयी माहिती करून घेण्याच्या प्रयत्नात काही प्रश्न विचारू लागलो.  " सर माझी गुंतवणूक ही स्वतःला आणि कुटुंबाला फिट ठेवण्यात होते. साहेब तुम्ही आजूबाजूला बघाल ना तर मी तुम्हाला पैज लावून सांगतो एक जात सगळे ढेरपोटे झाले आहेत. मग पैसा लागतोय कुठे ?  पन्नाशीनंतर ही ढेरी त्रास द्यायला सुरुवात करते की!  ‘When a belly becomes a pot, it troubles you lot!’ आणि दुसरी बाब म्हणजे माझ्या मुलाचं कसं काय होणार ? ह्या दोन शारीरिक आणि मानसिक चिंताच साध्या जगण्याचा आनंद हिरावून घेत आहे. सर , आम्हा दोघा भावंडांची लग्न झालेली आहेत. तुम्ही आर्थिक नियोजन करून देता ते ठीक पण आम्ही एक वेगळीच  नियोजन पद्धत स्वीकारली आ...