Posts

Showing posts from July, 2023

अनुदिनी ४२ - 'सिग्नल' / Blog 42 - 'Signal'

Image
नमस्कार मंडळी! कसे आहात? आत्ता परवा शिळफाट्यावरून वाशीला चाललो होतो. शिळफाट्याच्या चौकाजवळ रहदारीमुळे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. थोडा वेळ वाट बघितली आणि नंतर गाडी बंद करून शांतपणे आजूबाजूला बघत बसलो. थोड्याच अंतरावर १२ ते १५ वर्षांची २-३ मुले चाफ्याच्या फुलांचा छोटासा हार ट्रॅफिक मध्ये थांबलेल्या गाड्यांसमोर नाचवून विकायचा प्रयत्न करीत होती. तेवढ्यात एक लहान मुलगा हातात लहान स्प्रेची बाटली घेऊन पळत येताना दिसला, त्याच्याकडे छोटासा वायपर देखील होता. समोरच्या कारच्या ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या दाराची काच त्याने पटापट हातातल्या स्प्रेने पाणी मारून, वायपरने स्वच्छ केली आणि काचेवर नॉक करून त्याने पैसे मागीतले. त्या ड्रायव्हरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण मग लगेच त्याने दुसऱ्या कारकडे धाव घेतली. काम करूनही मोबदला दिला जात नाही म्हणून कोणतेही आर्जव वा हुज्जत न घालता तो तडक नव्या उमेदीने दुसऱ्या गाडीकडे वळला होता. मंडळी बघायला गेले तर मुंबईतील कोणत्याही सिग्नलवर दिसणारे एक सर्वसामान्य दृश्य.

अनुदिनी ४१-'जिनी व राक्षस' / Blog 41- 'Genie & Demon'

Image
हॅलो, मिहीर! छान कॅफे शोधलायस. " हो आमचा वीकेंडचा अड्डा येथेच भरतो" इति मिहीर. कुमार सरांनी खुर्ची मागे सरकवून त्यावर आपली बॅग ठेवली आणि बाजूच्या खुर्चीवर बसले. " हाय मिहीर!" "हॅलो अंकल!" मुग्धा आणि राहुल दोघेही एकामागे एक दार ढकलून आत आले. "हॅलो डियर!” कुमार सरांनी दोघांना हॅंडशेक केला. “अरे, मिहीर अंकल साठी काहीच मागवले नाहीस?” मुग्धा टेबल वर पर्स ठेवत डाफरली . " अरे! आज सेकंड Saturday, आजची ऑर्डर आणि बील देण्याचा राहुलचा दिवस आहे." मिहीरने डोळे मिचकावत पाण्याचा ग्लास घेतला. “अरे, नाही! दोस्तलोग आजकी शाम अंकल के नाम" असे म्हणून कुमार सरांनी प्रत्येकाच्या हातात मेन्यू कार्ड ठेवले. “Oh no, uncle! You are our guest" तिघांनी मिळून एकाच सुरात कलकलाट करून सरांना खुर्चीत बसवले. “Rahul! you place the order.” इति मुग्धा. “मला कोल्ड कॉफी अँड नॅचोज विथ डीप” मिहीरने आपली फेवरेट ऑर्डर सोडली. “काका तुम्ही काय घेणार?” राहुलने विचारले. “मला पण कोल्ड क