Posts

Showing posts from February, 2023

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

Image
प्रिमियम मेम्बरशिप "साहेब ७ लाखाची हॉलिडे रिसॉर्टची प्रिमियम मेंबरशिप घेतली आहे. आता हे ४ दिवस नाही वापरले तर फुकट जातील. मित्राला सांगितले होते पण त्याला जमत नाही, म्हणून आता मला जावे लागते आहे." नमस्कार मंडळी!! हा आमचा अभय. वय वर्ष ३५ च्या आसपास. दोन मुले व पत्नी असे चौकोनी कुटुंब. अभय, कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती. मंडळी, अनावश्यक खर्च कसे अलगदपणे आपल्याला मिठीत घेतात ह्याचे हे उत्तम उदाहरण. आपल्या प्रियजनांसोबत उत्तम जीवनशैलीचा आनंद घ्यावा ही इच्छा दिवसेंदिवस प्रबळ होत आहे, आणि तशी इच्छा प्रबळ होण्याच्या दृष्टीने मार्केटिंग पण केले जात आहे. अशा मार्केटिंगचा सारासार विचार न करता आपण त्याला भुलत जात आहोत. 'जीवन छानपैकी, मजेत जगण्यासाठी खर्च हा केलाच पाहिजे आणि अत्ता तरुणपणी मजा नाही करायची तर केव्हा?' या विचारसरणीत, कर्ज काढून हप्त्याने आपल्या आवाक्यात नसलेली जीवनशैली जगण्यात आनंद शोधणे हे तरुणाईचे गीत झाले आहे. घराचा हप्ता, कारचा हप्ता, हा आहेच पण

Blog 28 - 'Age 60 Years'

Image
“Hello, Did you get the claim file from Mr. Deshpande?” “Please check the case papers” “ The case is a bit complicated” Ashokrao was instructing his staff. This is our Ashokrao, age – 60 plus, but yet so energetic, he would run to catch the local train and munch on mutton like a youngster. He spent his youth searching for a job and traveling by train. Because his father lost his job abruptly, he had to shoulder the responsibility of the family a bit too early. He was never satisfied with his job. He could never come to terms with the shift duties, untimely meals, irregular sleeping patterns, and frequent changes in the weekly offs. All was chaos. Fortunately, he got an opportunity in a business, and he made a fortune out of it. In a very short span, he had uplifted his monetary status, and his lifestyle got his son properly educated, and later he too joined him. Eventually, they had their own offic

अनुदिनी २८ - 'वय वर्षे ६०'

Image
“अरे, क्लेम फाईल आणली का त्या देशपांड्यांकडून?” "जरा केस पेपर्स तपासून घ्या!" "जरा कॉम्प्लिकेटेड केस आहे!" अशोकराव आपल्या स्टाफला सूचना देत होते. हे आमचे अशोकराव, वय वर्षे ६० प्लस,पण एकदम टुणटुणीत,अजूनही धावत लोकल पकडणारे, मटणाची नळी फोडणारे. ह्यांची ऐन उमेदीची वर्षे ही नोकरी शोधण्यात आणि ट्रेन च्या प्रवासात गेली. वडिलांच्या नोकरीने दगा दिल्याने कुटुंबाची जबाबदारी अचानकपणे आणि थोडी लवकरच घ्यावी लागली.असलेल्या नोकरीत त्यांना राम, लक्ष्मण, सीता, कोणीच दिसेना. म्हणजे मंडळी, आमचे अशोकराव नोकरीत रमेनात. त्या शिफ्ट ड्युट्या,वेळी अवेळी जेवण,झोप आणि बदलणाऱ्या सुट्ट्या सगळेच अस्ताव्यस्त. योगायोगाने त्यांना व्यवसायात संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. थोड्याच कालावधीत आर्थिक स्तर उंचावला, राहणीमान सुधारले, मुलाचे शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण झाले आणि तोही त्यांना सामील झाला. बघता, बघता त्यांचे स्वतःचे कार्यालयही झाले. सर्वकाही उत्तम! अशोकरावांची गाडी रुळावर आली, त्