अनुदिनी ७७ - आकाशचे आकाश / Blog 77 – Aakash!
"गुड मॉर्निंग, सर!"
आकाशने केबिनचे दार नॉक करून आत येऊ का म्हणून विचारले.
"अरे, ये! तुझीच वाट बघतोय."
"सॉरी पीटीला थोडा जास्त वेळ थांबावं लागलं."
आकाश एका जिममध्ये प्रशिक्षक (Trainer) म्हणून काम करतो. एकदा विषयाच्या संदर्भात बोलताना त्याला माझ्या व्यवसायाची माहिती समजली, आणि आपण एखाद दिवस जरूर भेटू असे म्हणून तो दिवस आज उगवला.
मी आकाशला त्याच्या कुटुंबाविषयी माहिती करून घेण्याच्या प्रयत्नात काही प्रश्न विचारू लागलो.
"सर माझी गुंतवणूक ही स्वतःला आणि कुटुंबाला फिट ठेवण्यात होते. साहेब तुम्ही आजूबाजूला बघाल ना तर मी तुम्हाला पैज लावून सांगतो एक जात सगळे ढेरपोटे झाले आहेत. आणि मग पन्नाशीनंतर ही ढेरी त्रास द्यायला सुरुवात करते!
‘When the belly becomes a pot, it troubles you lot!’
आणि दुसरी बाब म्हणजे माझ्या मुलाचं कसं काय होणार?
ह्या दोन शारीरिक आणि मानसिक चिंताच साध्या जगण्याचा आनंद हिरावून घेत आहे.
सर, आम्हा दोघा भावंडांची लग्न झालेली आहेत. तुम्ही आर्थिक नियोजन करून देता ते ठीक पण आम्ही एक वेगळीच नियोजन पद्धत स्वीकारली आहे.आणि ती ही विचारपूर्वक."
मला आकाशचे मुद्देसूद बोलणे आवडले. त्याला बोलतं करायला ताक मागवलं.
"आम्ही चौघांनी म्हणजे आम्ही भावंड आणि आमच्या सौभाग्यवतींनी आमच्या आई-वडिलांना सोबत घेऊन राहायचं पक्क केलं. आणि हे, लग्ना अगोदरच आम्ही आमच्या बायकांना स्पष्ट केलं. किचन एकच राहील आणि आठवड्यातले दिवस दोन्ही जावांनी वाटून घ्यायचे.
सुरुवातीला एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागला, थोडी कुरबुर होत असे,आताही होते पण त्याचे रूपांतर कधी भांडणांत होऊ दिले नाही. त्या संयमाची, समजूतदारपणाची फळं आम्ही आता चाखत आहोत.
आमच्या घरात मुलांना गप्पा मारायला, खेळायला आजी-आजोबा मिळाले. संध्याकाळी मुलांना मैदानावर फिरायला घेऊन जाण्याचे पर्यवसन, आमची मुलं मोबाईल, टीव्ही पासून लांब आहेत. मुलांना पळण्यात आणि पोहण्यात आवड निर्माण झाली. विशेष म्हणजे परीक्षा काळातही ह्या आवडत्या गोष्टींना ऑप्शनला टाकल्या जात नाही.
सर आज घरोघरी सर्व साधारणपणे काय चित्रं आहे?
मुलं पाळणाघरात, आजी-आजोबा वृद्धाश्रमात, आणि आई-वडील ऑफिसमध्ये.मला वाटतं, ह्यांच्या घरातल्या काम वाल्याच त्यांच्यापेक्षा जास्ती वेळ त्यांच्या ह्या 'EMI' वाल्या घरात असाव्यात." हसत हसत आकाशने ताकाचा ग्लास संपवला.
आमच्याकडे हा फालतू खर्च नाही, आणि 'EMI' वालं घर पण नाही. आम्ही भाड्याच्या घरात राहतो त्यामुळे पगाराला पडणाऱ्या भगदाडापासून आम्ही वाचलो. तुम्ही बघा सर आमच्या आजूबाजूच्या टॉवरमध्ये राहणाऱ्यांचे महिना उत्पन्न हे साधारण सव्वा ते दीड लाखाच्या आसपास असेल.
ह्यातला साठ ते सत्तर हजार घराच्या EMI मध्ये जातात. बाकी पाळणाघर,कामवाल्या बायकांचे पगार, गाडीचा हप्ता आणि दोघांच्या प्रवासाचा खर्च पकडला ना, तर अजून साधारण पंचवीस-तीस हजाराची कल्हई म्हणजे लाखभर पगाराची काशी झाली की हो!
याच्यापुढे घराचा मेंटेनन्स, रेशनपाणी, सणवार आणि दुसरं मोठं भगदाड म्हणजे, मुलांच्या शाळेच्या फीया.
सर, ह्या शाळांचे ‘School’ मध्ये रूपांतर झाले आणि पहिल्या इयत्तेपासूनच फिया लाखाच्या घरात. आणि त्या दरवर्षी दहा ते बारा टक्क्यांनी वाढणाऱ्या.
या फीया भरायला घरावर टॉपअप लोन घ्यायची गरज पडते की काय? ह्याची चिन्ता!
आमची मुलं ही घराजवळच्या मातृभाषेतून शिकवणाऱ्या शाळेमध्ये शिकतात. येण्या जाण्यात बसमध्ये बसलेली पेंगुळलेली मुलं बघितली की त्यांच्या आई वडिलांची खूप कीव येते. साधी पुरेशी झोपही हे पालक मुलांना देऊ शकत नाहीत बाकी सहवास तर लांबचीच गोष्ट. मी दुपारी जेवायला घरी असतो. तेही मुलांसोबत. आम्ही सगळेजण दोन्ही वेळेस एकत्र जेवायला बसतो. मुलांच्या शाळेतल्या गमती जमती ऐकत, हसत खिदळत समोर वाढलेलं ताट केव्हा फस्त होतं ते कळत देखील नाही.
सर, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एकूणऐंशी वर्षे होतील. आज जी काही प्रगती आपला देश करत आहे त्याची पाळंमुळं ही 'सी बी एस इ' आणि 'आय सी एस इ' बोर्डात होती की आपल्या मातृभाषेतून शिकलेल्या शिक्षण पद्धतीत?
आम्ही आमच्या सद्य परिस्थितीत आमच्या कुटुंबाला, विशेषकरून मुलांना काय देऊ शकतो हे बघतोय. आणि आम्हाला समजलं की खऱ्या अर्थाने कुटुंब,घराचं घरपण आणि व्यक्तिमत्व विकास ह्याला पैशांची गरज कमी असते. पण म्हणून मी काही स्वस्थ बसत नाही. जिमच्या व्यतिरिक्त मी 'पी.टी.' देखील घेतो. आवडत्या कामाचे कोणाला वावडे नसते. तसेच मलाही माझ्या कामात स्वतःला फिट ठेवताना दुसऱ्यांना फिट करण्यात आनंद मिळतो.
सर,सध्या आपण, तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणे लहान रक्कमेने गुंतवणुकीला सुरुवात करूयात. आता निघतो घरी जाऊन फ्रेश होऊन PT ला जायचे आहे." आपल्या सिंहा समान पंजाने, हॅन्डशेक करून आकाशने निरोप घेतला.
--------------------------------------------------------------------
“Good morning, Sir!”
Akash knocked on the cabin door and asked for permission to come in.
“Oh, yes, I was waiting for you only.”
“Sorry, the PT took a little more time.”
Akash worked as a trainer in a Gymnasium. Once, he learned about my profession when we were discussing the subject, and he said we would meet one day. That day has come today.
I started asking him a few questions to know more about his family.
“Sir, my investments are done in keeping my family and me fit.
Sir, if you look around, I bet you find everyone with a pot belly.
After fifties, this pot belly starts to trouble!”
‘When the belly becomes a pot, it troubles you a lot!’
“And the second thing is, what about my son?
These two physical and mental worries are robbing the happiness of simple living.
Sir, we two brothers are married. I know you help in financial planning, but we have adopted a different plan with a lot of thinking.”
I liked the way Akash spoke. To keep the conversation going, I ordered buttermilk for him.
“We four of us, i.e., we brothers and our wives, have decided to stay with our parents. And we have already made this very clear to our wives before marriage. The kitchen shall be one, and the SILs shall divide the work for the week daily.
Initially, there were some issues to accommodate each other; there was a bit of cribbing, and it still happens today. But we never allowed it to transform into a quarrel. We are now enjoying the fruits of patience and understanding.
Our children have their grandparents to talk to and play with. They take our children outside to play every evening, which has helped them avoid TV and Mobile Devices. They have developed an interest in running and swimming. Importantly, during exams, these activities are not optional.
Sir, what is the situation in almost every house today?
Children in creches, grandparents in old-age homes, and parents in offices. In my opinion, the maids working in their houses spend more time in their houses.” Akash finished the buttermilk as he laughed at his own statement.
“We don’t have these unwanted expenses, and our house is also EMI-free. We live in a rented house, and we have protected our salaries from erosion.
Sir, the average household income of my friends in the neighborhood's towers is about Rs. 1.25 to 1.5 Lacs per month. Of these, about 50-60 thousand will be paid towards the EMI, with the balance towards the creche, the maids' salaries, the car's EMI, and travel expenses, totaling about 25-30 thousand rupees.
Then there are the maintenance charges, groceries, festivals, and another major expenses: the children's school fees.
Sir, when these modest schools expanded, the fee for the first standard itself is in the range of lakhs of rupees.
As if one may need to top up the home loan to pay the hefty school fees.
Our children attend nearby regional language schools. When we watch the sleepy children traveling on the school bus, we pity their parents. The parents are not even able to provide adequate sleep to their children.
I come home to have lunch with my children. We all have our meals together. We don’t even understand how we finish our meals while listening to the children's anecdotes and funny happenings in their schools.
Sir, we would be completing 79 years since we gained independence!
Whatever progress our country makes today is due to education in CBSE/ ICSE, or due to education
in regional language schools?
We are trying to figure out what we can provide our family members, especially the children, in the current situation. We understand that having a family, the homeliness of the home, and personality development do not cost much.
Yet, I do not while away my free time.
I also conduct 'PT' sessions in addition to the Gymnasium job.
Who does not like to do what one likes?
Also, this keeps me fit and brings me happiness in helping others stay fit.
Sir, let us start the investment with a small amount.
I will leave now; I have to get fresh and attend the PT session.”
With his massive palm, Akash shook my hand and left.




Comments
Post a Comment