एक दुपार ! - One Afternoon !
एक दुपार ! दुपारची वेळ होती. कॉल संपवून घरीच निघायच्या घाईत होतो. पार्किंग मधून गाडी बाहेर काढतांना समोरच्या बसटॉपवर रावसाहेब दिसले. अहो SS रावसाहेब! मी हाक मारली. “गेल्या आठदिवसापासून आमची ही हॉस्पिटलमध्ये आहे. डबा घेऊन चाललोय. तिथे जेवणाची सोय आहे, पण ही चवीने खाणारी! सध्या मॉर्निंग वॉक हा असा चाललाय.” रावसाहेब हसत हसत म्हणाले. ह्या ही परिस्थितीत, रावसाहेब आपली विनोदबुद्धी टिकवून होते. गेले वर्षभर असं चालू आहे. दिनेशची आणि सुनेची पण हॉस्पिटलची वारी चालू असते, सुट्या संपल्यात, आता "विदाऊट पे" वर चकरा चालूच आहेत. दरवेळेस टॅक्सी परवडत नाही, म्हणून हा असा इथे उभा,बसची वाट बघत! चेहऱ्यावर तोच मिस्कीलपणा ठेवत रावसाहेब मन मोकळे बोलते झाले. मंडळी! रावसाहेबांची मेडीक्लेम पॉलिसी होती, त्यामुळे हॉस्पिटलच्या खर्चाची तशी त्यांना चिंता नव्हती. पण जरी ते परिस्थीला हसत सामोरे जात होते तरी इतर गोष्टीतला होणारा खर्च हा नजरेआड होत नव्हता, त्याची झळ पोहचत होतीच. ते खर्च मेडीक्लेम पॉलिसीत मिळू शकत नव्हते. इथे आपण मेडीक्लेम पॉलिसी सोबत "आरोग्य रक्षक" योजनेचा विचार करावयास हवा. या योजनेचं वेगळेपण असे की, कुटुंबप्रमुख (Principal Insured) स्वतःबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांना देखील सहभागी करू शकतो. ही ठरलेले लाभ देणारी (Defined benefits) आरोग्यविमा पॉलिसी आहे. म्हणजे, कोणत्या शस्त्रक्रियेला (Surgery), डेकेअरला (Day care), किती रक्कम मिळणार ह्याचे टक्के (percentage) हे ठरलेले आहे. त्यामुळे, विशिष्ट आजाराला विमा रक्कमेच्या ठराविक टक्के (percentage) हे मिळणारच आणि जरी आपली मेडीक्लेम पॉलिसी असली तरीही त्या व्यतिरिक्त हा ठरलेला लाभ (खर्च) दिला जाईल हे विशेष. मंडळी! आपल्याला टर्म प्लॅन माहित असेलच ज्यात पॉलिसी दरम्यान विमाधारकाच्या मृत्त्यू पश्चातच विमा रक्कम दिली जाते, मुदती नंतर परतावा (Maturity benefits) नसतो. तर, अत्यंत अनोखी बाब म्हणजे, "आरोग्य रक्षक" योजनेत पॉलिसी दरम्यान प्रस्तावकाच्या ( Principal insured) आकस्मित मृत्यूत सदर विमा योजनेतील इतर सदस्यांचे पुढील सर्व प्रिमिअम माफ होतात परंतु विमा योजनेचे फायदे त्यांना उर्वरित कालावधी करता कायम रहातात. आपल्याला काय करता येईल. आपण टर्म प्लॅन सोबत "आरोग्य रक्षक" योजना (plan) घेतलीत तर एखाद्या दुर्घटनेत प्रस्तावकाच्या मृत्यूत टर्म प्लॅन विमा रक्कम देऊ करेल तर "आरोग्य रक्षक" कुटुंबातील सदस्यांची हॉस्पिटलच्या खर्चाची मोफत काळजी घेईल. कारण, आज आणि येणाऱ्या काळात घरांच्या किंमतींची बरोबरी फक्त हॉस्पिटलची बिलच करू शकतील. काय, बरोबर ना? बरय तर मंडळी! काळजी घ्या आणि काळजी करायला लावू नका! |
|
One Afternoon ! It was afternoon, and I was in a hurry to end my meeting and leave for home. While driving out of the parking, I saw Rao Saheb at the bus stop. “Rao Saheb,” I called out. “Since last week, my wife has been hospitalized. I am carrying her lunch. They serve food in the hospital, but my wife prefers home food, so, nowadays, this is my morning walk,” Rao Saheb said with a smile. Rao Saheb had kept his humor intact even in such a situation. “This has been going on for the last year. Dinesh and his wife, too, keep visiting the hospital regularly. All the leaves are exhausted, and now the hospital trips are on “without pay.” Can’t afford taxi every time, hence waiting for the bus.” Rao Saheb confided with the same smiling face. Friends, Rao Saheb had subscribed to the Mediclaim Policy, and hence he did not have to worry about the hospital bills. Though he was facing this situation un-deterred, he could not neglect the other expenses associated with the illness of his wife. He was feeling the pinch of it as the Mediclaim Policy was not reimbursing it. This is where one should consider the “Arogya Rakshak” plan. The significant feature of this plan is that the principal insured can include other family members. This is a defined benefit health insurance policy. That is, the amount of money (percentage) that will get reimbursed against the expenses incurred on various surgeries, Daycare, etc., is pre-defined. Thus, the insured receives a pre-fixed percentage of insurance amount over and above the amount reimbursed through the Mediclaim policy one possesses for the specific ailment. This is to be specially noted. Friends, you all are aware of the "Term Plan," in which the insurance amount is remitted only after the insured's death, and there is no maturity benefit. The unique feature of the "Arogya Rakshak" plan is that if the principal insured suddenly dies during the policy's tenure, the premium of the other included members in this plan is waived off. Yet, they are entitled to all benefits of this plan till the end of the plan tenure. So, what can we do? If one also subscribes to the “Arogya Rakshak” plan along with term insurance, then in the event of death of the insured, the term plan would pay out the sum insured, and the “Arogya Rakshak” plan would take care of the hospitalization of the included members of the family at no cost. In days to come, the soaring hospital bills shall be at par with the cost of new houses! Right? OK then, See you, friends. Do take care and don’t make others worry. |
Comments
Post a Comment