हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle



हापूस आंबा आणि लोणचे

सकाळीच परागच्या वडिलांचा फोन, "परागला चांगला जॉब लागला आहे तर त्याचे लगोलग "SIP" सुरु करा". ठीक आहे, मी म्हणालो. आपण भेटू मग बोलू!

मंडळी !

मला आठवते राष्ट्रीय बचत पत्र (National Savings Certificates) जी पाच वर्षाची असतात ती दरवर्षी घेतली जायची आणि पहिल्याची पाच वर्षाची मुदत संपल्यावर ती परत घेतली जायची अशी पुनर्गुंतवणूक करण्याची सर्वसामान्य गुंतवणूकदाराची पद्धत होती. गरजा कमी असल्याने साहजिकच खर्चही कमी आणि त्यामुळे ही "NSC" ची चेन मधेच बंद करण्याची सहसा गरज पडत नसे आणि परिणामी एका खात्रीपूर्वक रक्कमेची पुढील सुनिश्चित कालावधीसाठी तरतूद होत असे.

आज, असंख्य प्रलोभने, सेवा दारासमोर हात जोडून उभी आहेत. खिशात हात घालून पाकिटातून पैसे आहेत का हे तपासण्याचीही गरज नाही. फक्त कार्ड स्वाईप करा,बस!

एवढ्या सहजतेने पाकीट न काढता पाकिटाला ऐवढी भोके पडत आहेत की, त्यामुळे असावयास हवी तेवढी गुंतवणूक होत नाही आणि झालीच तर ती पटकन मोडता येईल ना, अश्याच ठिकाणी केली जाते आणि म्हणूनच आजचा परवलीचा शब्द आहे "सिप "

मंडळी, हे "सिप" (Systematic Investment Plan) प्रकरण काय आहे?
तर, हा म्युच्युअल फ़ंडातील गुंतवणुकीचा एक मार्ग आहे ज्यात दर महिना काही कालावधी करता ठराविक रक्कम गुंतवली जाते आणि त्या समोर त्या दिवसाच्या युनिटच्या किंमतीनुसार (NAV) युनिट्स विकत घेतले जातात. दर दिवशी युनिटची किंमत ही बदलत असते आणि ह्या बदलत्या किंमतीनुसार कधी जास्त तर कधी कमी युनिट्स विकत घेतले जातात.

मित्रांनो! तरलता (liquidity) हा, ह्या, सिप चा शत्रू आहे, गरज पडली की लगेचच त्या मधून रक्कम काढली जाते आणि त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक बरेचदा संभवत नाही.

सिप, हे law ऑफ average ह्या कार्यप्रणालीवर काम करते. त्यामधून मिळणाऱ्या रक्कमेविषयी मी केवळ अंदाज वर्तवू शकतो. त्या मधील अनिश्चितता सोबतच्या तक्त्या (chart) वरून कळू शकते.

तर सुरक्षित परतावा देणाऱ्या योजना उदा PPF, हे लॉ ऑफ कंपाऊंडिंग ह्या सूत्रावर चालते आणि महत्वाचे म्हणजे मुदतीपूर्वी पैसे काढण्यावर असलेली बंधने आणि वर्षाकरता असलेला सुनिश्चित परतावा (व्याजदर दरवर्षी बदलतात) आपल्याला १५ वर्षांनी मोठी रक्कम उभी करण्यास मदत करते.
सोबतचा तक्ता आपल्याला थोडी अधिक कल्पना देईल.

थोडक्यात, प्रत्येक गुंतवणुकीची स्वतःची ओळख असते ती सर्वप्रथम विचारात घेऊनच गुंतवणूक करणे योग्य.

मंडळी! हापूस आंबा जरी फळांचा राजा असला तरी त्याचे लोणचे घालता येत नाही, त्याची लज्जत ही रस-पुरी सोबत, पंगतीचा आनंद वाढवणारी. त्यामुळे, एकच गुंतवणूक ही सर्व प्रकारच्या निकषावर उतरणार नाही ह्याचे भान असणे आवश्यक.

मग, आपली भूमिका (स्टॅन्ड) काय असावयास हवी?
सर्वप्रथम, माझी आर्थिक उद्दिष्टे ही नजीकच्या काळातील (शॉर्ट टर्म ) आहेत की, दीर्घकालीन (लॉन्ग टर्म ) हे तपासणे आवश्यक; कदाचित ती ह्या दोघांच्या मधली देखील असू शकतील, (मिड टर्म).

सोबत मुदती नंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त (टॅक्स फ्री ) आहे की नाही, जर मिळणारी रक्कम ही करपात्र (Taxable) असेल तर त्यावर Indexation Benefit आहे का?, हे ही बघणे मस्ट! त्या नंतरच गुंतवणुकीचा पर्याय निवडणे.

काय मंडळी, पटतंय ना!

Alphonso mango & Pickle

Parag’s father called me early morning and said, “Parag has secured a good job, hence let us soon start investing in SIP in his name.”

“Congratulations to him, Let’s meet up and discuss,” I said.
Friends,

I remember those days when investment used to be done in NSC (National Saving Certificate). These certificates had a maturity period of 5 years, and people used to invest in these certificates every year. Once matured, the same amount used to be re-invested, which used to be a recurring investment. This was the most common & popular form of investment then. As the wants were meager, the expenses too were less. And hence, there seldom used to be a break in this type of recurring investment. And so, this resulted in a reliable and assured corpus for the future.

Today, there are a lot of lucrative deals and services to lure us into spending. With the ease of spending through a credit card, one does not need to check his wallet.

Due to the ease of spending the money even without confirming the availability of funds has resulted in lesser investment. Also, if the investment is to be made, people are inclined to choose schemes where the liquidity is immediate. As a result, the most popular and preferred option for such investment is SIP.

Now, what is this SIP (Systematic Investment Plan)?
This is an investment plan associated with the investment in mutual funds. Money is invested regularly on a specified date for a stipulated period. Then, and as per the prevailing rates (NAV) on the day, units are purchased. However, the rates fluctuate each day, and fewer or more units are purchased on the designated date.Thus, one may be allotted more or fewer units as per the prevailing rate of the day.

Friends, liquidity is the major setback of the SIP as people can stop investing and withdraw money when they need it. Consequently, a long-term investment plan gets defeated.

SIP investment fetches you returns based on the law of averages. Therefore, I can merely guess the return amount and not the assured returns.
Please refer to the enclosed chart for a better explanation.

However, assured returns can be obtained from investment opportunities like PPF (Public Provident Fund). PPF fetches you the returns based on the law of compounding and aids the investor in accumulating a substantial amount. Notably, there are conditions associated with these schemes, such as lock-in period (No early or “on need” liquidity), fluctuating interest rates (guaranteed for a year & generally reducing), etc. Please refer enclosed chart for more information.

In a nutshell, every investment scheme has its methodology, and hence it is essential to consider all such aspects before investing.

Friends, all said and done, though alphonso mango is called as “king of fruits,” it cannot be used to make pickles. It has to be relished as fruit juice or fruit pulp only. And that is why it is essential to understand that any one type of investment will not be able to meet all our expectations.

To address this, first of all, one needs to firm up one’s targets of Short -Term, Long -Term or Mid-Term investments. Also, it is beneficial to learn if the maturity amount is taxable or tax-free.

Thus, the prudent way is to study all these options before investing.

I hope you corroborate my views.

Thank you

Comments

Post a Comment

Recent Posts

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !