ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

ज्यूलीचे प्रश्न

नमस्कार मंडळी!

आज रविवार आणि मला खात्री आहे,आज ब्लॉग वर काय लिहिलंय ह्या उत्सुकतेने आपण आपल्या गॅझेटवर क्लीक केले असणार.

काय बरोबर ना!

हो, आज थोडासा वेगळा विषय!

मंडळी, आमच्या व्यवसायाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी "मिलिअन डॉलर राऊंड टेबल" ही अमेरिकेत स्थित विशेषकरून विमा क्षेत्रातील उच्च व्यावसायिकांची एक संघटना आहे (Premium Association of Financial Professionals)

ह्या ठिकाणी खास करून विमा विक्रीच्या संबंधातील काळानुरूप बदलत जाणारे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. तसेच, वैयक्तिक विकासासोबत समाजातील दुर्लक्षित वर्गाच्या विकासासाठी ही जगभरात कार्यक्रम राबवणे, असे समाजभिमुख कामही, ही संघटना १९३७ पासून करत आहे.

मंडळी! माणसासाठी भावनिक गुंतवणूक ही फार महत्वाची असते. संपूर्ण आयुष्यात कळायला लागल्या पासून मनात उद्भवलेल्या भावनांच्या बळावरच तो सर्वसाधारण व्यवहार करत असतो. सर्व धावपळीचं, तथाकथित नियोजनाचं सार हे आपापल्या भावविश्वात राहून एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करणं हेच असतं.

काय, बरोबर ना राव!

हा, तर मंडळी! परिपूर्ण आयुष्यावरून (whole person concept) आठवलं, आमच्या मिलियन डॉलर राऊंड टेबल (MDRT-USA) ह्या संघटनेतील (Association) ज्यूली ही एक समव्यावसायिक असून तिने तिच्या सेवार्थींकरिता (clientele) परिपूर्ण आयुष्य (whole person concept) ह्या संकल्पनेच्या आधारावर एक पाहणी केली. त्यात विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला ओळख करून देतो. ओळख करून द्यायला प्रश्न तसे नवीन नाहीत पण त्यांची सांगड ही आर्थिक नियोजनाबरोबर घालणे हे कदाचित नवीन असेल.

ती विचारते,
  • “आपण आपल्या कुटुंबियांबरोबर खऱ्या अर्थाने वेळ (quality time) काढता का?”
  • “आपले आर्थिक प्रश्न आपल्या नात्यांमध्ये महत्वाचे ठरतात का?”
  • आरोग्याविषयी ती विचारते, “आपली एकूण शारीरिक तंदुरुस्ती कशी आहे?”
  • “आपली आध्यात्मिक बैठक आहे का? असल्यास, दररोज ध्यानधारणेकरता किती वेळ देता?”
  • “आपल्या सभोवतालच्या समाजासाठी निरपेक्ष सेवा देऊ शकता का?”
  • “स्वतःच्या शैक्षणिक अनुभवाविषयी आपण कितपत जागरूक आहात? काळानुरूप नव-नवीन गोष्टी शिकत आहात का?”
  • “उपलब्ध गुंतवणुकीसंबंधीत योजनांबाबत आपल्याला कितपत माहिती आहे, गुंतवणुकीविषयी आपण किती सजगपणे (cautious) निर्णय घेऊ शकता?”
  • “स्वतःच्या जीवनशैलीबाबत तसेच, सध्याच्या नोकरी, व्यवसायात, आपण समाधानी आहात का? पुढील संधींबाबत किती जागरूक आहात?”
  • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ती विचारते, "सध्या आपण केलेल्या आर्थिक नियोजनाबाबत समाधानी आहात का?"

तर मंडळी आपल्याला काय करायचंय?

ज्यूलीने तिच्या सेवार्थींना (clientele) विचारलेले प्रश्न आपण स्वतःला विचारा आणि पहा काय उत्तरं मिळतात. काही प्रश्न अनुत्तरित राहतील, काही हरकत नाही, सोडवायचा प्रयत्न तर करू.

शेवटी आयुष्य हे परिपूर्ण नसतंच, तसं असावं असं फक्त आपल्याला वाटत असत इतकंच.

काय, बरोबर ना?

आणि हो! एक आनंदाची बातमी! MDRT-USA, च्या परिषदेत (conference) सहभागी होण्यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर कालच बोस्टनला आलॊ आहे.

Julie's Questionnaire

Hello Friends!

It’s Sunday today and I am sure you must be eager to read today’s blog and must have grabbed your gadget to check it!!

Right!

Yes, today it’s a different topic.

Friends, the “Million Dollar Round table” known as the Mecca of our profession is situated in America. It is, specifically, an association of high-level professionals in the Insurance sector.

It mainly aims at developing the professional skills in the field of Insurance sales in line with the time. Besides personal development, since 1937 it has been actively promoting various social programs across the world towards the development of the backward class of people.

Friends, emotional and sentimental engagement are the crux of Human life. Every human’s behavior is influenced by the emotional and sentimental feelings emerging in the person. The person strives to live a “wholesome life” by nurturing these emotions and sentiments and does the planning with mainly this as a goal. Isn’t it?

So, mentioning the “wholesome life”, I just remembered Julie, our colleague from the MDRT-USA Association. In service of her clientele, she conducted a survey about the “Whole life concept”. I will just quote the questions she asked during this survey. Though these questions are not new, their relationship with financial planning could be a new aspect being revealed.

The questions she asked are

  • Do you spend quality time with your Family in the true sense?
  • Do our financial issues take precedence among relatives?
  • How fit are we physically?
  • Do we meditate? And if yes, how much time do we spend on meditation daily?
  • Can we offer selfless service to our society?
  • How is our awareness regarding the educational experience and are we learning new things to keep abreast with time?
  • How much aware are we regarding the available investment schemes and how cautious are we to make decisions about our finances and investment?
  • Are we satisfied with our lifestyle and the job we are in presently? And how much do we look forward to a new opportunity?
  • And most importantly, are we satisfied with the financial planning that we have done?

So, friends!!

Please ask these same questions, that Julie asked her clientele, to yourself and check your answers. Yes, some questions would not have any answer now. That’s fine; we will attempt to solve them.

After all, life is never wholesome, it is our wish that our life should be wholesome. Right?

And let me end this blog with a happy note. With all the best wishes & blessings of yours, I have arrived in Boston yesterday to participate in the MDRT conference. Thank you all.

Comments

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !