आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

आग्रह आणि स्मोकिंग

दारातून पेपर टाकून पेपरवाला पळाला.

बळवंतरावांनी पेपर उचलला तर आतील पत्रक (Pamphlet) खाली पडले. कोणत्यातरी विम्याच्या योजनेची जाहिरात होती. शांतपणे बळवंतरावानी ते पत्रक बाजूला ठेऊन पेपर उलगडला.

मंडळी!

गेल्या सहा महिन्यांपासून आपण माझ्या अनुदिनीच्या माध्यमातून संपर्कात आहात. आपल्याला जाणवलं असेल कि, विमा योजनांच्या व्यतिरिक्त इतर गुंतवणुकीच्या विषयीच जास्त लिहिलं गेले, कारण जस सिगारेटच्या पाकिटावर वैज्ञानिक ईशारा असतो तसं विमा योजनांच्या जाहिरातीत शेवटी एक वाक्य असते "विमा एक आग्रहाची विशेष वस्तू आहे" (Insurance is the subject matter of solicitation).

तर, मंडळी ज्या बाबतीत आग्रह करावा लागतो अश्या नावडत्या विषयावर जास्त लिहिण्यात काय अर्थ! बरोबर ना!

पण, मंडळी! आग्रह म्हंटला ना की, छान जेवणाच्या पंक्तीतला बासुंदी नाहीतर श्रीखंडाकरिता केलेला प्रेमळ आग्रह आठवतो.

विम्याच्या बाबतीत तो नको असतो पण त्याचे फायदे हवे असतात आणि मंडळी गंमत म्हणजे ज्यावर ईशारा असतो अश्या चैनीच्या वस्तूंपासून तल्लफ हवी असते पण त्याचे परिणाम नको असतात.

म्हणजे, ईशारा असूनही पाकीट खिशात आणि आग्रह करणाऱ्या आपल्या हितचिंतकाला मात्र लांब ठेवलं जातं.

काय,एकदम उलटच की राव!

दारावरची बेल वाजली, वरच्या मजल्यावरचा तेजस पेढे घेऊन आला.

“काका, डन!”

“अरे, काय!”

“Ms ची ऍडमिशन डन!”

“अरे वा SS वा!”

काँग्रॅच्युलेशन!

अमेरिकेत जाणार म्हटल्यावर, आता तुझ्याशी इंग्रजीतच बोलले पाहिजे!

काय, बरोबर ना?

तेजस काहीच बोलला नाही त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. मागच्याच वर्षी तेजसचे वडिल गेले. सुदैवाने त्यांचा पुरेसा विमा होता.

“आणि हो! काका, इथे सही कराल का प्लिज!”

तेजस ने स्वतःला सावरून समोर पेपर ठेवला.

“काय आहे रे!” मी विचारले.

“काका! ह्या पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत, साक्षीदार (witness) म्हणून सही हवी आहे.”

तेजसच्या वडिलांनी त्याच्याकरिता काढलेल्या विमा पॉलिसीचे ऐन क्षणी पैसे मिळणार होते.

विझता, विझता एका पणतीने दिवा प्रज्वलित केला होता.

तर मंडळी तुम्हाला काय करायचं आहे?

तर, वर्ष-दोन वर्षातून तुमच्या ह्या आग्रह करणाऱ्या व्यक्तीला बोलवा आणि आपले विम्याचे सर्व हप्ते वेळेत जात आहेत ना हे तपासून घ्या.

ह्या भेटी दरम्यान प्रत्येक पॉलिसीवर नामांकन आहे की नाही हे तपासून घ्या. विशेष म्हणजे ज्या  विमा पॉलीसी मुलांच्या लहान वयात काढलेल्या आहेत त्या बाबतीत ही काळजी जरूर घ्या.

अपघाती विमा हा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळतो तो, मुलं सज्ञान (Major) झाल्यावर त्यांच्या विमा पॉलीसीवर लागलीच घ्या.

आणखी एक महत्वाचे, आपण बँकेतून कर्ज घेतांना आपली विमा पॉलीसी बँकेच्या नावावर केलेली असेल (assign) आणि आता कर्जाची पूर्ण परतफेड केलेली असेल तर आता ती पॉलीसी आपल्या नावावर (reassign) करून घ्या.

आणि हो ! Successive nomination ही करता येते.

तर मंडळी, ह्या सर्व बाबींची उजळणी दोन ते तीन वर्षातून एकदा व्हायलाच हवी.

मग, बोलावताय ना?

Aagrah & Smoking

The paper delivery boy dropped the paper through the door and shot off.

While Balwantrao picked up the paper, a pamphlet dropped out of it. It was an advertisement for an insurance scheme. Balwantrao kept the pamphlet aside and continued reading the paper.

Friends!

For the last 6 months, I am in touch with you through my blogs. You may have, perhaps, noticed that the blogs were more on subjects of investments and rarely on insurance topics. Just like the health warning displayed on the cigarette packet, the last line of an insurance advertisement also states “Insurance is the subject matter of solicitation”

So friends, what’s the use of writing on unpleasant topics that require solicitation? Right!

But friends, when we talk of solicitation (persuasion), we remember the host lovingly persuading us to have more of Basundi or Shreekhand while relishing a feast. We, rather, enjoy it.

And exactly the opposite, the case is with the insurance, yet we want its benefits. Ironically, when it comes to addictions, we want the satiation of the urge but not the ill effects of addiction.

That means, a cigarette packet is possessed in spite of the warning, but the one who is our well-wisher is conveniently ignored and kept at arm’s length.

Just the opposite, isn’t it?

The doorbell rang; Tejas from the upper floor had come to give Pedha.

Tejas: “Uncle, Done!”

Balwantroa: “What?”

Tejas: “Done with the MS admission”

Balwantrao: “Great! Congratulations. Now as you will go to the US of A, I need to converse with you in English, right?”

Tejas didn’t utter a word. His eyes were watered. He had lost his father a year ago. Luckily, he had adequate funds through insurance.

Tejas: “Uncle, Will you please sign here?” 

Tejas brought up the paper while composing himself.

Balwantrao: “What is in this?”

Tejas: “I will be getting the insurance amount, that’s why I want your signature as a witness”

Tejas’ father had subscribed to an insurance policy in his name and the money that he would get had come at the right time. The noble soul had helped light up the path of his son’s education even after death.

So friends, What do you need to do?

Please meet this well-wisher of yours at least once in one or two years and get it confirmed that all the premiums are getting paid on time.

Also check and confirm whether all the policies have nominees, especially those policies that have been subscribed to when the kids were young.

Accident Insurance can be subscribed after attaining the age of 18, hence once the kids turn 18, do not delay in subscribing to this policy.

One more important thing. If the insurance policy has been assigned to the bank while obtaining any loan, don’t forget to get it reassigned to your name after full repayment of the loan.

And yes, successive nominations also can be done.

So, friends, it is essential to review all the above important things at least once in two years.

Looking forward to your call to meet you in person!!

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

एक दुपार ! - One Afternoon !

घर..घर ! Ghar..Ghar !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !