राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

राजेश खन्ना-हेमा मालीनी

“ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना”

“हो ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना”

“ओडले एड्लीई ओ…”

काय मंडळी, हे गाणं आपल्या परिचयाचं नसेल असं होणारच नाही.

वाचता, वाचता तुम्ही ते मनात गुणगुणायला सुरवात देखील केली असणार.

बरोबर ना!

अहो, गाण्यातले शब्द तर अर्थपूर्ण आहेतच पण हे गाणं ज्या दोघांवर चित्रित (picturized) केलंय ती, दोघं ही त्यावेळची एकदम सुपरहिट जोडी ना राव!

त्यामुळे भट्टी एकदम मस्त जमली!

ह्या गाण्यात राजेश खन्ना, हेमामालिनीला घेऊन ज्या प्रकारे बुलेट चालवतो…, त्याचे ठीक आहे राव, तशी गाडी चालवण्याचे त्याला पैसे मिळाले, पण आपलं काय? एकतर, "मामा" आपल्याला बाजूला घेईल आणि आपलंच पाकीट खाली करेल आणि ह्या पावसात अशी गाडी चालवल्यावर, तर आपलं रद्द केलेलं लायसन्स परत मिळवण्यासाठी आपण धडधाकट असू की नाही ते माहित नाही.

पण, आयुष्याच्या त्या वळणावर अशी झोकदार डबलसीट गाडी आपण चालवली असेलच, जरी नसेल चालवली, तरी तशी चालवण्याची मनीषा तर नक्कीच मनी बाळगली असणार.

काय, मन की बात छेडली ना!

आणि आजच्या तरुणाईची तर काय बात!

ह्या तरुणपणातला जोश, उत्साह एकदमच और असतो. अगदी फसफणाऱ्या सोड्या सारखा.

तर मंडळी, हा जोश, सळसळता उत्साह, ती सुसाट बेभान राजेश खन्ना-हेमामालिनी डबलसीट जोडी, ह्याचा आज काय संबंध?

तर, वैयक्तिक अपघाती विमा योजना (Personal Accident Policy)

सदर पॉलीसीचा हप्ता (Premium) हा अत्यंत अल्प असून, जोखीम गट -१ (Risk Group -1) ज्यात प्रशासकीय कामाचा (Administrative work) अंतर्भाव होतो त्यात १० लाखाकरता वार्षिक हप्ता रु १,७७० येतो.

अपघातामुळे जर कायमस्वरूपी व पूर्णपणे व्यंग (Permanent and Total Disablement) आले तर पूर्ण विमा रक्कम (Capital Sum Insured) दिली जाते.

दुसऱ्या प्रकारात जर व्यंग हे काही अंशी पण कायम असेल (Permanent Partial Disablement) तर उद्भवलेल्या व्यंगानुसार विमारक्मेच्या (CSI) ठराविक टक्के (१% ते ७५% पर्यंत) रक्कम देय होते.

तिसऱ्या प्रकारात, जर आलेले व्यंग हे काही काळापुरते पण पूर्ण स्वरूपातील (Temporary Total Disablement) असेल तर विमारक्कमेच्या (CSI) १% रक्कम हि १०० आठवडे दिली जाते ज्याची कमाल मर्यादा (Limited to) हि रु ३००० आहे.

Rajesh Khanna - Hema Malini

“ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना”
“हो ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना”
“ओडले एड्लीई ओ…”

Hi friends, it is impossible that you have not heard this song. You must have already started humming it while reading. Right?

Not only are the lyrics of this song profoundly meaningful, but the duo on who this song was picturized was an erstwhile great hit. And that’s why this song became a hit too.

The way Rajesh Khanna rides the “Bullet” with Hema Malini as his pillion….? It was okay for him as this was picturized, and he was paid for it. But, if we were to ride this way, the traffic police would nab us and fine us. And if one rides a motorcycle this way during the monsoon, it is difficult to say whether one would be in shape to even claim the suspended license!

Obviously, during your youthful days, you might have ridden your bike double-seat with this zest; if not, you might have dreamt of riding it. Right?

Haven’t I stirred up those thoughts in your mind?

The youth of today are more zestful. Their enthusiasm and energy are totally distinct. Fully bubbly like a frothing soda.

So now wondering why the mention of this energy, enthusiasm, youth, and the duo of Rajesh Khanna and Hema Malini?

Well, Personal Accident Policy!!

The aforesaid Policy premium is meager. In this risk Group-1, which includes administrative work, the yearly premium is ₹.1,770- for a ₹.10 Lacs Policy.

If there is a permanent total disability due to accident, then entire insured capital sum shall be paid to insured.

If there is permanent partial disability, then depending on the disability, a defined percentage of Capital Sum Insured (1% to 75%) shall be paid.

If there is a temporary disability, then 1% of the capital sum insured shall be paid for 100 weeks which a cap of ₹.3000/-

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'