अनुदिनी ७६ - भटकंती आणि निवृत्तीचे नियोजन / Blog 76 – Wanderlust and retirement planning
“ह्या एप्रिल महिन्यात कुठे फिरायचं म्हंटलं की माझ्या तर अंगावर काटा येतो.”
नाक्यावरच्या इराण्याच्या कॅफेत थंडगार बियरचा घोट घेत शंतनू खुलत होता.
"सॅम! अरे, श्रेयाला भटकायला चिक्कार आवडतं.
आणि तुला सांगतो, ते ही साला एकदम डिफरंट ना रे!
गेटवे पासून ते भाऊच्या धक्क्या पर्यंत पौर्णिमेच्या रात्री Yacht वरून हिंडायचे; सोबत कुमार गंधर्व, लता, तलतची गाणी."
"शंत्या, आयला तुझी फियान्सी एकदमच भन्नाट आहे.
पण मला तू हे सगळं ह्या भर उन्हात सांगायचं कारण?
म्हणजे एकतर तुला 'Foster' चढली किंवा श्रेयाच्या बकेट लिस्टने तुझी उतरली."
"अरे, सॅम थोडं बहुत तसंच रे!"
"म्हणजे तुझी उतरली." खदाखदा हसत सॅमने फेसाळणाऱ्या बियरचा घोट घेतला.
"हा रे!
आयला तिचे फंडेच निराळे.....
तिला मुलं नको.
वयाच्या पंचेचाळीशी पर्यंतच काम करणार. नंतर फक्त फिरायचं."
"अरे, पण आत्ता चांगले खोऱ्याने ओढताय ना?"
सॅमने वेटरला रिपीटची खूण करून चिकन चिलीचा एक बाईट घेतला.
"ते सगळं ठीक रे!
पण तिचं बोलणं मी आत्तापर्यंत मनावर घेतलं नव्हतं.
म्हंटलं, असतं एकेकाचं खुळ. पण काल संपूर्ण संध्याकाळ ती फक्त आणि फक्त ह्याच विषयावर बोलत होती.
डोक्याला फुल शॉट!"
"अरे त्यात काय एवढं.
तुम्ही दोघेही चांगले कमावते आहात.
तुम्हाला मी एकदम झक्कास प्लँनिंग करून देतो, तुमची लाईफ एकदम Jinga Lala करून टाकतो."
सॅम चष्म्याची काच पुसता पुसता एकदम सिरिअसली बोलता झाला.
तर मंडळी जाणून घेऊ सॅमने शंतनू-श्रेयासाठी काय नियोजन केलं.

दिलेल्या तक्त्यावरून आपल्याला समजेल की 'Liquid', 'Debt', आणि 'Equity' अशा तीन मालमत्ता प्रकारात (asset class) त्याने गुंतवणूक सुचवली आहे.
ह्या माध्यमातून वयाच्या पंचावन्न ते नव्वदी पर्यंतच्या उत्पनाची (cashflow) व्यवस्था कशी करायची हे दाखवले आहे.
त्यात पहिल्या वर्षी असणारा खर्च रु. १० लाख वार्षिक असेल, जो वार्षिक ६% टक्क्याने वाढत असेल.
तर, Liquid फंडात पुढील तीन वर्षाचा खर्च ४% दराने पार्क केलेला असेल, .
डेट फन्ड हा पुढील सहा वर्षाच्या खर्चाची तजवीज करेल आणि त्यावर अपेक्षित परतावा असेल ७%.
दरवर्षी, ‘Liquid’ फंडातून खर्चाला पैसे घ्यायचे, त्यातील तीन वर्षांचा फंड संपला की पुढील तीन वर्षांचा फंड हा ‘Debt’ फंडातून घेतला जाईल आणि तेवढीच रक्कम ‘Debt’ फंडात ‘Equity’ मधून भरली जाईल.
तर ह्या सगळ्या गृहितकावरून तुम्हाला वरील तक्ता समजून घेता येईल.
“तर, शंतनू तुम्हा दोघांना येत्या पंधरा वर्षात साधारण रु. २.५० कोटी उभे करायचे आहेत.
त्यासाठी पंचेचाळीस-पन्नास हजाराची 'SIP' तुम्हाला पुरेशी आहे. आणि तुम्ही लोकहो, 'DINK' परिवारातले असल्याने अगदी सहजपणे तुम्हाला जमेल.”
"Wow, Bravo! सॅम!" शंत्याने चीत्कारून आपला ग्लास उंचावला.
(*DINK -Double Income No Kids, *Expected SIP Return rate 13% pa )
_______________________________________________________________
“I dread traveling in April.” Shantanu was opening up while sipping on the chilled beer at the Irani café on the corner.
“Sam! Shreyas loves to wander and travel.
And let me tell you, that's totally different, too.
On a full moon night, from the gateway to 'Bhau-cha-Dhakka' in a yacht with songs of Kumar Gandharv, Lata, and Talat playing along.”
“Shantya, your fiancée is great, a class apart.
But what is the reason you are telling this to me in this scorching sun?
That means, either the Foster has cast its spell, or the bucket list of Shreyas has brought you back to your senses.”
“Sam, it’s more or less the same man!”
“So now you are sober!” Sam sipped on the frothy bear laughing.
“Yes, man! Her fundas are totally different.
She does not want children, wants to retire at the age of 45, and then just wanderlust.”
“Yes, but as of now, you're reaping in heaps, no!”
Sam signaled to the waiter to repeat the drink and bit into the chili-chicken.
“That’s all fine, but I had not taken her seriously and was thinking that this could be just a passing craze.
But she discussed this topic all evening yesterday.
It blew my brains.”
“What's the big deal, guys? You both are decent earners. I will offer you a super plan and make your lives Jinga-Lala”.
Sam wiped his glasses and began talking seriously.
So, let’s understand what planning Sam did for Shantanu.
The above table indicates three types of asset classes: 'Liquid', 'Debt', and 'Equity', in which he
has suggested investments.
Through this medium, the cash flow arrangement from age 55 to 90 is shown.
This includes the ₹ 10 Lakh Expense per annum for the first year and will grow at 6% per annum.
Whereas, the expenses for the next 3 years will be placed in a 'Liquid' fund at an expected growth rate of 4%.
The 'Debt' fund will cover expenses for the next 6 years, and returns are expected at 7%.
Every year, withdraw funds from the liquid fund for expenditure.
Once the three-year funds are exhausted, funds for the next three years will be withdrawn from the Debt fund, and the same amount (withdrawn amount) shall be replenished from the Equity Fund.
This hypothesis will help you understand the above table.
“So, Shantanu, you both need to accumulate about ₹. 2.5 Crores over the next 15 years.
For that, a SIP of 45-50 thousand per month is sufficient. And yes, you guys are DINK-oriented, which will make this all easier.”
“Wow, Bravo! Sam!” Shantya raised the toast, screaming.
(*DINK -Double Income No Kids, *Expected SIP Return rate 13% pa)




Comments
Post a Comment