अनुदिनी ४८-'वार्षिकी / Blog 48 - 'Annuity'

"हा, अरे भाई, ये ये!"

संदीपने मिलिंदभाईला आत घेतले.

संध्याकाळची वेळ होती. घरातली मंडळी डायनींग टेबलभोवती चहाची मस्त तल्लफ भागवत होती आणि सोबत मस्त गरमागरम 'खेकडा-भजी.’ (मंडळी, खेकड्याची भजी नव्हे तर एका विशिष्ठ प्रकारे चिरलेल्या कांद्याची भजी)

लगोलग भाईलासुद्धा चहाचा कप आला. संदीपची आई, 'लीलाकाकू' वय वर्षे ६५. शाळेतून निवृत्त झालेल्या त्यांच्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय सुचवण्यासाठी 'मिलिंदभाई' चे आगमन झाले होते.

आता लीलाकाकू पेन्शनधारक होत्या, दोन्ही मुले कर्ती-सवरती झाली होती त्यामुळे 'गुंतवणुकीच्या फ्रंटवर' त्या निवांत होत्या. असणारी पेन्शन देखील त्यांना वापरायची गरज पडत नव्हती. येत असलेली काही पेन्शन सरळ बँकेत रिकरिंग खात्यात व काही मुलांच्या आग्रहाखातर म्युच्युअल फंडात, SIP मध्ये जात होती. मोठ्या मुलाच्या ऑफिसमधील मेडिक्लेम पॅालीसीत त्यांचे नाव होते.

थोडक्यात मंडळी, लिलाकाकू चांगला बँकबॅलन्स ठेवून होत्या आणि मस्त आनंदाने दिवस जगत होत्या, ढकलत नव्हत्या.

तर राव, असे सगळे असतांना आता 'लीलाकाकूंना' आपले 'मिलिंदभाई' कोणता प्लॅन सुचवणार?

झालं असं की, लिलाकाकूंच्या यजमानांनाही पेन्शन होती आणि योगायोगाची गोष्ट लिलाकाकूची आई कोर्टातून निवृत्त होऊन, पेन्शनधारक होत्या.

आत्ताच ३ वर्षांपूर्वी त्या गेल्या.

आता, त्या गेल्या हे नव्हतं मला सांगायचं पण आपल्या मुलांना पेन्शन नाही ही चुटपुट लिलाकाकूंना होती, हे महत्वाचे!

"अग, आई जरा इथे ये!" संदीपने फर्मान सोडले.

"हा, बोल भाई!" संदीपने भाईला बोलते केले.

"तर, आजपासून तीन वर्षांनी काकूंना ८ टक्क्याने आजीवन वार्षिकी मिळेल..... "

पुढे?

मंडळी, सांगतो, सांगतो!

तर, तो प्लॅन असा होता, काकूंना आजपासून ३ वर्षांनी ८ टक्क्याने आजीवन वार्षिकी (Annuity) मिळणार, पुढे संदीपला त्याच्या आयुष्यभर ८ टक्क्यानेच आणि तेही पूर्ण रक्कमेकरता उत्पन्न चालू आणि आजीच्या नातवंडानाही गुंतवलेली मूळ रक्कम अधिक ५ टक्के मिळतील.

तर, मंडळी यातून काय साध्य होईल?

एकतर लिलाकाकूंना घरबसल्या उर्वरित आयुष्यासाठी एका ठराविक परताव्याची सोय झाली. आणि मुख्य म्हणजे लिलाकाकूंना मुलांकरता आजीवन पेन्शनची सोय करता येणार होती.

आं! काय म्हणालात?

"बँकेतील मुदत ठेवीवरसुद्धा घरबसल्याच व्याज मिळत होतं की!"

“एकदम बरोबर!”

“पण, आता मला सांगा सहकारी बँकेतील ठेवी २-४ वर्षांनी पुनर्जिवित (Renew) करायच्या, त्यांच्या 'KYC' च्या गोष्टींची पूर्तता करायची हे ठराविक एका वयानंतर त्यांना शक्य नाही. त्याकरिता त्यांना कोणावर तरी अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही.” आणि आयुष्यभरासाठी एकाच रक्कमेची, व्याजाची खात्री बँक देऊ शकत नाही ना राव! असं काय करता!

अहो, मिलिंदभाई, तुम्ही ३ वर्षांनी पैसे द्यायला सुरवात करताय? त्याचे काय?

अहो, जर लिलाकाकूंना मुलांनाकरिता पेन्शनचीच सोय करायची आहे म्हंटल्यावर वार्षिकीचीच (Annuity) योजना हवी की!

उगीचच ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं!

आता ताकाचाच विषय निघालाय तर, तहान लागल्यावर पाणी घ्याल की ताक?

काय बरोबर ना?

आता अगदीच खोलात शिरायचं म्हंटलं तर, तीन वर्षांनी उत्पन्न सुरु होणार म्हणजे तुमचे पैसे ३ वर्ष वापरले, बरोबर!

आता त्यावरचे व्याज?

काय, एकदम मनातलं बोललो ना?

अहो, तुमचं एकदम बरोबर आहे

तसा विचार केलात तर परताव्याचा दर ६ ते ६.५० टक्के येईल.

हो, पण राव हा दर तुम्हाला पुढे तुमच्या प्रियजनांना आयुष्यभर कायम रहातोय त्याचे काय?

आणि हो मुद्दल अधिक ५ टक्के परतावा तुमच्या नातवंडांना हि आहेच की!

काय बरोबर ना?

काही राहून गेले असेल तर जरूर कळवा!

मंडळी ही भा.आ.म.मं (LIC) ची 'नवीन जीवन शांती' योजना आहे. ही योजना सख्खे भाऊ, बहीण देखील एकत्रित घेऊ शकतात.

बाकी भेटीअंती सविस्तर बोलूच!

“Oh, Yes, Bhai, Please come!”

Sandip let Milind Bhai come in. It was evening tea time, and all the family members were sipping on their tea and munching the Onion Fritters (Khekda bhaji – The onion fritterfried in a way that resemble a crab). 

Bhai, too, was promptly served a cup of tea.  Leela Aunty – Sandeep’s mother was 65 and retired from the school service. Milind Bhai had been called to suggest a few investment options.

Now, Leela Aunty was a pensioner. Both her children were independent and earning, so she was relaxed on the investment front. She did not even have to use her pension.

The entire retirement was invested in recurring deposits and SIP due to the insistence of her children. Her name was included in the office’s Mediclaim policy of her elder son. In short, Leela Aunty had a handsome bank balance and was living her life comfortably& happily.

So friends, in spite of all this, what plan would Milind bhai suggest to Leela Aunty? It so happened that Leela Aunty’s husband was a pensioner and, coincidentally, her mother had also retired from the court and was a pensioner.

She expired just three years ago. I did not want to mention her death, but her children were not eligible for any pension, making Leela Aunty anxious.

“Mom, please come here,” Sandeep summoned his mother.“Yes, start Bhai,” Sandeep asked Milind Bhai to speak up.

“So, three years from today, Leela Aunty shall get annuity at 8%.......”

Do you know if that is true?

I just wanted to tell you.

The proposed plan was – that Leela Aunty would get an annuity @ 8% for her life; further, Sandeep would get the same assistance at 8% of the entire amount invested, and her grandchildren would get the invested amount plus a 5% additional amount. So, friends, do you know what will be achieved through this?

First, Leela Aunty has provisioned for a definite amount for the rest of her life, and most importantly, she will be able to arrange for a pension for her children, too.

"Could you let me know what you said?" “You also get hassle-free interest on the term deposits in the bank!”

“Perfect!” “But, you all know that the term deposits in co-operative banks must be renewed every 2 to 4 years.

After a certain age, it is impossible to complete the KYC formalities independently, and the elders, without any choice, have to depend on somebody.”

A bank does not guarantee a fixed amount and interest for life. Understand!" "But Milind bhai, you are starting the annuity after three years!

"What about that?" "Yes, if Leela Aunty wants to provision for a pension for her children, then an annuity is the best plan, isn’t it?"

"Now, if you want to get deep into this, it means that when the returns are started after three years, your money shall be used for three years, right? And also the interest on it?"

"Did I not speak what you had in mind?" "Yes, you are right." "If you think that way, the interest rate would be 6 to 6.5%. But this interest rate shall remain constant for the lifetime of your loved ones. What about that?"

"And, of course, the grandchildren shall get the capital plus 5%." "Right?" "If anything is missed out, please do let me know."

"Friends, this is the new Jeevan Shanti Scheme from LIC." This policy can be taken together by real brothers and sisters, too. Also, I'd like to talk in person.

Comments

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'