अनुदिनी ७९ - GIFT CITY / Blog 79 - GIFT CITY
"अरे, साक्षी आता ऑगस्ट महिन्यात डब्लिनला चालली आहे. तसं तिचं आधीच ठरलं होतं की MS बाहेरून करायचं. आणि त्याप्रमाणे गेल्या सात आठ वर्षांपासून मी गुंतवणुकीवर जरा जास्तच जोर दिला होता. खास करून म्युच्युअल फंडातील 'SIP' मध्ये जाणीवपूर्वक दर वर्षाला रक्कम वाढवत गेलॊ.
पण काही उपयोगच झाला नाही.
तरी बरं दर दोन-तीन वर्षांनी मी फंडांचा आढावा घेत होतो. मला अपेक्षित असलेला तेरा ते चौदा टक्के परतावा मिळत होता." वीरेंद्र तावातावाने बोलत होता.
"मग लेका माशी शिंकली कुठे?" इती प्रशांत.
"माशी शिंकली की नाही हे माहिती नाही, पण आपला रुपया डॉलर समोर शिंकून, खोकून बेजार झाला. आणि आम्हाला रडवेला करून गेला." वीरेंद्रने वैतागून एका दमात चहाचा कप रिकामा केला.
"अरे बाबा नक्की झालं काय?
उगीचच गोलगोल फिरवू नकोस." प्रशांत शांतपणे चहाचा घोट घेत विचारता झाला.
"अरे प्रशांत, सात वर्षांपूर्वी युरोच्या समोर रुपयाचा भाव होता ७८."
"म्हणजे जेव्हा तू गुंतवणूक सुरु केलीस तेव्हा?"
"बरोबर!
आणि, आज तो ११२ रुपये आहे.
आता पडला का प्रकाश?"
"म्हणजे सात वर्षांपूर्वी एक युरो घ्यायला ७८ रुपये मोजावे लागत होते.
त्यासाठी आज तुला ११२ रुपये मोजावे लागत आहेत.
सरळ सरळ ४३% जास्त.
My goodness!
म्हणजे साक्षीचा MS चा खर्च सरळ ४३ टक्क्यांनी वाढला की रे!
म्हणजे तुझा फंड वाढतोय १३ टक्क्यांनी, पण इथे खर्च वाढला ४३ टक्क्यांनी." प्रशांतच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि चिंता दोन्ही भाव एकदमच उमटले.
तर मंडळी आपणही जर वीरेंद्रच्याच बोटीत बसला असाल, I mean तुम्हालाही जर हा प्रश्न भेडसावत असेल, तर त्याला उपाय आहे.
काय! डोळे एकदम चमकले ना!
हो तर तो पर्याय म्हणजे 'GIFT CITY' मधील गुंतवणूक. तर थोडक्यात जाणून घेऊ ‘GIFT CITY’ काय आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी ही देशातील पहिली स्मार्ट सिटी आहे.
या ठिकाणी आपण परकीय चलनात विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करू शकता. आपली गुंतवणूक ही परकीय चलनात असल्याने सध्याच्या पडणाऱ्या रुपयाचा आपण फायदा करून घेऊ शकतो. यात आपण कमीत कमी पाचशे डॉलरने गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
भारतात निवास असणाऱ्या व्यक्तींसाठी ह्यातील पहिली पायरी ही ‘International Financial Services Centre’ (IFSC), करता KYC पूर्ण करणे.
नंतर Liberalized Remittance Scheme (LRS) चा फॉर्म भरणे. ज्याद्वारे आपण परकीय चलनात वार्षिक डॉलर 2.50 लाखापर्यंतचा व्यवहार करू शकतो.
बँकेला परकीय चलनात व्यवहार करण्याचे निर्देश देऊन 'SWIFT' सेवेच्या माध्यमातून 'GIFT CITY' मधील नोंदणीकृत ब्रोकर अथवा म्युच्युअल फंडाच्या बँक खात्यात रक्कम पाठवू शकता.
अनिवासी भारतीयांना ‘LRS’ फॉर्मची पूर्तता करायची गरज नाही. त्यांनी ‘IFSC’ उपलब्ध असणाऱ्या बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. आणि in person KYC च्या ऐवजी V-CIP (Video-based customer identification) च्या माध्यमातून त्यांना KYC ची पूर्तता करता येते.
तर मित्रांनो कशीकाय वाटली ही 'GIFT' योजनेविषयीची GIFT?
आपले अभिप्राय जरूर कळवा.
------------------------------------------------------------------------------------------
"Hello, Sakshi is going to Dublin in August. She had decided earlier that she should do her MS abroad, and accordingly,
I was stressing myself a little too much on investments for 7-8 years. Especially in MF and SIP, I deliberately increased my investment year on year.
But it was all futile.
I was reviewing the fund every two to three years and getting returns of 13 to 14%, as expected." Virendra was venting.
“Then what went wrong?” asked Prashant.
“I don’t know what went wrong, but the rupee tripped against the dollar profusely, leaving us in tears.”
Virendra emptied his teacup in one swig out of frustration.
“Hey, man, what exactly happened?
Be straightforward, don’t beat around the bush.” Prashant was calmly sipping his tea as he asked Virendra this.
“Prashant, seven years ago, the rate of the Euro was Rs. 78.”
“You mean, when you started investing?”
“Right! And today it is Rs. 112. Understood?”
“That means, seven years ago you could buy a euro for Rs. 78, for which today you have to shell out Rs. 112.
Straight away, 43% more.
My goodness!
That means the education expenses of Sakshi have gone up by 43%!
That means, your fund grows at 13%, and your expenses swell by 43%.”
Expressions of anxiety and question mark, both, were apparently seen on Prashant’s face.
So friends, if you are sailing in the same boat as Virendra, I mean if you too are troubled by this question, then there is a solution to this.
Didn’t this brighten up your face?
Yes, that option is an investment in 'GIFT CITY'.
So let us understand what this 'GIFT CITY' is.
'Gujarat International Finance Tech City' is the first smart city in our country.
Here you can invest in foreign exchange in various property types.
Because the investment is in foreign exchange, you earn profits as the rupee falls.
You start the investment with a minimum of $500.
For resident Indians,
The first step is to complete the KYC in the International Finance Services Center (IFSC).
Then fill out the Liberalized Remittance Scheme (LRS) form, through which you can invest/transact up to $2.5 Lakh.
You can instruct the Bank to transact in foreign exchange through 'SWIFT' and send the money to the registered broker or MF’s bank account in GIFT City.
NRIs need not submit to the LRS. They have to open an account with a bank that has an IFSC, and instead of in-person KYC, they can complete KYC through V-CIP (Video-based Customer Identification).
So, friends, do you like this 'GIFT '?
Please share your comments.




Comments
Post a Comment