अनुदिनी ७८ - सहावं बोट / Blog 78 - 6th Finger

 


हा ये रे!

नितीनने दार उघडले.

आज काय ठाण्यातले कॅाल्स का?

हो!

म्हंटलं बरेच दिवस भेटला नाहीस तर भेटून जावं.

मला आठवतं आमची दोघांच्या सामयिक मित्रामुळे ओळख झाली. 

तो माझा उमेदवारीचा काळ होता. साहजिकच मेहनत आणि शिक्षण दोन्हींचा कस एकाच वेळी आणि तेही मार्केट मध्ये, चार भिंतींतील सोडवलेल्या पेपरप्रमाणे बंदिस्त नाही. म्हणजे जो काय रिझल्ट लागेल तो समोरासमोर उघडपणे. म्हणजे एकतर समोरची व्यक्ती तुमच्या विधानाला, शब्दाला मानेल तरी किंवा सरळपणे पर्दाफाश करून मोकळी तरी होईल. त्यामुळे खूपच जपून, तोलून- मापून बोलणे आवश्यक आणि मला तर आयुर्विमा योजना विकायची होती. नवशिका असल्याने दडपण होते.

नितीनचे वडिल त्या वेळेस ‘UTI’  करता काम करत सोबत कंपन्याच्या मुदत ठेवी योजनाही विकत असत; त्यावेळी मला आठवतं ‘Ceat’  कंपनी  १७% व्याज देत होती.

त्यामुळे काका फक्त रिटर्नवरच बोलत. त्या वेळी पोस्टाच्या योजनांप्रमाणे विमा, किती मिळणार आणि केव्हा मिळणारह्या दोन मुद्द्यांवरच विकला जात होता. त्यापुढे, सेलिंग पॅाईंट, कर सवलत (Income Tax Rebate) मिळणार ना

आणि पगारदार व्यक्ती असेल तर पगारातून परस्पर विमा हप्ता कट होईल ना? ह्याकडे बऱ्याच जणांचा कल असे. थोडक्यात विमा ही एक सोयीची गुंतवणूक म्हणून केली जायची; कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाच्या हिशोबात आवश्यक विमा संरक्षण, अपघाती विमा,अपंगत्व विमा ह्या बाबी बरेचदा दुर्लक्षित होत असत. 

आणि सर्वसामान्य व्यक्ती ही ‘मार्केट’ ह्या गुतवणुकीच्या प्रकारापासून लांबच असे.


तर जवळपास २५ एक वर्षांपूर्वी मी नितीनकडे आयुर्विमा योजना विकायला गेलो होतो.

नियमानुसार ज्या विमा योजनेकरिता त्याने विमा प्रस्ताव भरला होता त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक होते. मी त्याच्याकडून प्रार्थमिक स्वरूपातील आवश्यक माहिती लिहून घेतली होती. तो एकदम फिट होता.

त्याची वैद्यकीय तपासणी झाली आणि पेपर्स ब्रॅन्चमध्ये पाठवले गेले. 

मंडळी, आता इथेच कहानी मे ट्वीस्ट. मला ब्रॅन्चमधून कळवण्यात आलं की मेडिकल रिपोर्टमध्ये ‘नितीनच्या’ डाव्या पायाला सहा बोटे आहेत असं नमूद केलं आहे. तर त्यांचा ‘Deformity’  फॅार्म भरुन आणा. 

आता त्या उमेदवारीच्या काळात जास्त काही डोकं चालवायच्या फंदात पडलो नाही. 

नितीनकडे फॅार्म घेऊन गेलो. घरी त्याचे वडील होते. त्यांना मी येण्याच कारण सांगितले आणि ‘Deformity Questionnaire’ चा फॉर्म  त्यांना दिला. 

झालं, त्यावरील ‘Deformity’  हा शब्द वाचूनच त्यांनी मला सुनवायला सुरुवात केली. “माझ्या मुलाला व्यंग आहे असे कसे तुम्ही म्हणता? तो काय लंगडा आहे की लुळापांगळा.

एक बोट जास्त आहे तर त्याला तुम्ही व्यंग कसे म्हणता?”  वगैरे.

काय मंडळी, आपल्याही डोक्यात असेच काहीसे प्रश्न उभे राहिले असतील ना?

अहो, विमा कंपनी ही बाब व्यंग म्हणून विचारात घेण्याचे कारण असे की, समजा एखाद्या गजबजलेल्या ठिकाणी एका इमारतीला आग लागली, आणि सर्व बाजूने प्रत्येकजण आपापला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. अशावेळी पायात व्यंग असलेली व्यक्ती सहाजिकच चपळपणे त्या ठिकाणाहून लांब पळू शकणार नाही. आता आपल्या हीरोला निसर्गाच्या कृपाप्रसादाने लाभलेलं अतिरिक्त बोट, अशावेळी इतरांसारखे चपळपणे पळण्यासाठी अडसर तर ठरत नाही नाहे विमा कंपनीला खातरजमा करायचे होते. म्हणून कंपनीने, ‘Deformity Questionnaire’ फॉर्म नितीनकडून भरुन मागितला होता. 

तर मंडळी अशी असते विमा कंपनीची कार्यप्रणाली. 

कसा काय वाटला हा किस्सा! जरूर कळवा.

--------------------------------------------------------------------------------------------------


Yes, Welcome!


Nitin opened the door.


​So! Are you attending all calls in Thane today?


Yes!

 

Haven’t met you in a while, so thought of meeting you.


I remember we came to know each other through a common friend.

 

Those were my days of struggle. 

Obviously, it was a test of my efforts and education, both at the same time, and that, too, directly in the field (market), unlike answering questions in a closed examination hall. The result was also direct, open, and immediate.

 

That means the person you face would either accept what you are saying or refute it bluntly then and there.

 

Therefore, every word of the conversation had to be carefully weighed and said, and I had to sell the life insurance policies. I was tense as I was a beginner and novice.

 

Nitin’s father used to work for UTI in those days and sold term deposit plans alongside; I remember that​ ​'Ceat​' company offered 17% interest.

 

That’s why uncle used to speak mainly and only about returns. 


The policies used to be sold based on how much money would be given and when, just like a post office scheme. 


Furthermore, it was imperative to determine whether the customer could receive a tax rebate. And if the person was salaried, would the premium be directly cut from salary and remitted to the insurance company? Most customers were inclined towards such points. 


In short, the 'Life Insurance' investment was more of a convenience; so many a time, topics such as necessary insurance protection, accident insurance, disability insurance, etc. were ignored. 


And the common man used to shy away from the investment in the​ 'Market​.'​


So, about 25 years ago, in such a situation, I had been to Nitin to sell a life insurance policy.

 

It was mandatory to have a medical examination as per the policy rules. I had written down the necessary information from him. ​He was fit like a fiddle. His medical examination was conducted, and his papers were sent to the branch office.

 

Friends, now this is where the story takes a twist. 


I was informed by the branch office that Nitin had 6 fingers on his left leg, and hence the ​'​Deformity​' form is essential to be filled and submitted.

 

During that period of struggle, I did not get into the nitty-gritty of these rules.

 

I went to Nitin with the Deformity questionnaire. His father was at home. I told him the reason for my visit and gave him the deformity

questionnaire.

 

After reading the word ​'Deformity​' on the form, his father felt offended and asked, 

“How do you say that my son is handicapped? 

Is he lame or crippled?" 


​So, friends, you're all thinking about these same queries, right?

 

Friends!


The insurance company considers this anomaly a handicap because, suppose, in a crowded area, a fire broke out in a building and to save lives, all start running in all directions; then in such instances, the person with this anomaly in the leg may not be able to run far away deftly from the building on fire. 


The insurance company wants to confirm that the additional finger, which our hero got as a blessing from nature, does not hinder the deft actions required to run away and save his own life, just like all others.

Therefore, the insurance company asked Nitin to fill out the ​'Deformity ​Questionnaire.​'

So, this is how the insurance company’s procedure is!


How did you like this story? Do let me know.



Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

फुलपुडी - PhulPudi

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

घर..घर ! Ghar..Ghar !

एक दुपार ! - One Afternoon !