अनुदिनी ७४ - बीमा कवच आणि मी / Blog 74 – ‘Bima Kavach’ and me


नमस्कार मंडळी!

काय कसे आहात?

सगळं काही ठीक चाललंय ना!

असो, तर सांगायचं असं की नेहमीप्रमाणे एका कॉलवर गेलो होतो. पठ्ठ्याला टर्म प्लॅन हवा होता. तर 'बिमा कवच' योजना त्याला पसंत पडली. 

हा विमा दोन करोडचा होता आणि विमा संरक्षण वयाच्या शंभरी पर्यंत होते आणि आपला पठ्ठ्या उर्फ प्रथमेश, प्रीमियम त्याच्या वयाच्या १०० वर्षापर्यंत भरणार होता. 

 प्लॅनविषयी सर्व काही सांगून झाल्यावर प्रथमेशने मला उलट प्रश्न विचारला की, "काका हा प्लॅन विमा कंपनीला कसा काय परवडतो?"

तर आपणही जाणून घ्या ह्या उलट तपासणीला  मी काय उत्तर दिलं. 

"प्रथमेश त्याचं असं आहे की या योजनेत विमा संरक्षण हे वयाच्या शंभरी पर्यंत असल्याने कंपनीला दावा तर द्यावा लागणार आहेच, जो की दोन करोडचा असणार आहे. त्यामुळे तुला पडलेला प्रश्न हा बरोबर आहे की, दोन करोड न भरता विमा कंपनी दोन करोडचा दावा देणार कशी?

प्रथमेश, आता सर्वसाधारणपणे आपल्याकडील आयुष्यमान हे वाढत असून ते ऐंशी वयापर्यंत विचारात घेतलं जातं. आता समजा ही योजना घेतलेल्या  शंभर लोकांच्या समुदायातील जवळपास नव्वद टक्के व्यक्ती ह्या सरासरी वयापर्यंत पोहोचतील असा विचार केला. तर या सर्वांकडून त्यांनी निवडलेल्या प्रीमियम भरण्याच्या कालावधीतील ८०% ते ९०% पर्यंतचा कालावधी पूर्ण केला जाईल. म्हणजे त्यांनी निवडलेल्या प्रीमियम भरण्याच्या कालावधीत एकूण भरावयाच्या प्रीमियम पैकी ८० ते ९० टक्के प्रीमियम कंपनीला भरला असणार. येथे विमा कंपनीने 'Break-even point '   ओलांडलेला असेल.


आता तुझ्या बाबतीत विचार केला तर तू वर्षाला साधारणपणे लाखभर प्रीमियम तुझ्या वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत म्हणजे पुढील पासष्ट वर्षे भरणार आहेस. म्हणजे ऐंशीव्या वयापर्यंत रु. ६५ लाखापैकी तू ४५ लाख प्रीमियम भरलेला असशील. 

प्रथमेश आकड्यांना कंटाळला तर नाहीस ना रे !

प्रथमेशने नाहीम्हणून नुसतीच मान डोलावली.  

तर, सांगायची गोष्ट म्हणजे तू तुझे आयुष्य, वय वर्षे ७५ पर्यंत विचारात घेतो आहेस. 

आता तुला तर कल्पना आहेच की भाववाढ ही होत असतेच. 

तर, विचार कर आजपासून चाळीस वर्षांनंतर द्यावयाच्या दोन करोडच्या दाव्याचे जर अवमूल्यांकन हे सहा टक्क्याने केले, तर ती रक्कम होते रु १४.५० लाख. म्हणजे आज जे तू रु १४.५० लाखात घेऊ शकतो आहेस त्यासाठी तुला वयाच्या ऐशीव्या वर्षी दोन कोटी मोजावे लागतील."

 "ओक!" प्रथमेश ओठांचा चंबू करून बोलता झाला.

"वेगळ्या भाषेत सांगायचे झालं तर, आज विमा कंपनीने दोन कोटी द्यावयाच्या दाव्या समोर रु १४.५० लाखाची तजवीज केली की झालं!

आणि ह्याचा ब्रेक इव्हन तुझ्या ६५ वर्षांच्या प्रीमियम भरण्याच्या कालावधीत १५ व्या वर्षीच येतो. ह्या टप्यावर कंपनीला ना नफा असतो, ना फायदा. 

"म्हणजे उरलेली पन्नास वर्षे मी भरत असणारा प्रीमियम हा कंपनीचा नफा म्हणायला हरकत नाही!" प्रथमेशने भुवया उंचावल्या.

“Yes, there you are!”

प्रथमेशने 'बिमा कवचच्या' प्रपोजल फॉर्मवर सह्या करायला घेतल्या.

__________________________________________________________________


Hello Friends! How are you all?

 

All’s well, right?

 

So, I just wanted to tell you that I had been on a call as usual. 


The guy wanted a term plan. So, he liked the 'Bima Kavach' scheme.

 

This insurance was for 2 crores, with coverage until the age of 100. And our guy, AKA Prathamesh, was going to pay A premium​ till he reached the age of 100.  After I had explained everything about the plan, Prathamesh asked me, “Uncle, how can the insurance company afford this plan?”

 

You all too learn how I faced this cross-examination and answered his query.

 

“Prathamesh, it’s like this. The insurance cover for this scheme is until the age of 100 years; hence, 

the company shall have to pay the claim, which will be ₹ 2 crores. Therefore, you have a genuine question that, without paying ₹2 crores, how can the insurance company pay the claim of ₹2 crores? 

 

Dear, now the general life expectancy in our country has been increasing lately, and it is considered to be 80 years. Now consider that if 90% of 100 people who have taken this policy reach the average life expectancy, i.e., 80 years, then everybody shall be paying for 80% to 90% of the premium term.

 

That means the insurance company shall receive 80% to 90% of the premium, as per the premium payment terms which will cross the break-even point.


Now, considering your case, you shall be paying about ₹ 1 Lakh premium annually till you are 100 years old, which is for the next 65 years. That means till the age of 80 years, you will have paid ₹45 Lakh premium.

 

Prathamesh, hope you don’t get bored with the figures!”

 

Prathamesh nodded, indicating a “NO!”



“So, the thing I want to tell you is that you are considering your life till the age of 75 years.

And you also know that there is inflation, and it shall prevail.

 

So, imagine that if you devalue two crores over 40 years at an inflation rate of 6%, then the amount of two crores shall be worth ₹14.5 Lakh. That means the purchasing power of today’s ₹14.5 Lakh is equal to ₹2 crores when you are 75 years old.”

 

“Ok!” said Prathamesh, making a pout of his mouth.

 

“In other words, the insurance company has to just arrange for ₹14.5 Lakhs today against the claim of two crores, and that’s all.

 

And the break-even is achieved in the 15th year of your 65-year payment term. That means, the company at this stage is at ‘No profit, No loss’ situation.’”

 

“That is, it will not be wrong to say that the rest of the premium I pay will be the profit for the insurance​ Co.!”  Exclaimed Prathamesh, raising his eyebrow.

 

“Yes, there you are!”

 

Prathamesh started signing the form of ​'Bima Kavach' scheme.



Comments

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

फुलपुडी - PhulPudi

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

घर..घर ! Ghar..Ghar !

एक दुपार ! - One Afternoon !