Posts

अनुदिनी ५६ – श्रीमंती / Blog 56 – Magnanimity

Image
नमस्कार मंडळी! काय,एकदम 'बिझी बी?' हा, आता इयरएन्ड म्हटल्यावर जरा जास्तच बिझी असणार! चालायचंच, त्यातही एक मजा असते की हो राव! हा, म्हणजे कामा सोबत इयरएन्ड नंतर फिरायला जायचेही बेत ठरत असतात,ठरतात, आणि मग त्या उत्साहात ३१ मार्च केव्हा संपला ते कळतच नाही. तर,असो! मंडळी, आज थोडं काही वेगळं मनामध्ये आहे. वेगळं म्हणजे कोणत्या आर्थिक गुंतवणुकीविषयी नसून एक वेगळ्याच ‘गुंतवणुकीविषयी' आहे. ही ‘गुंतवणूक’ तुम्हाला-आम्हाला कोणताच परतावा देत नाही पण मनाची श्रीमंती मात्र जरूर वाढवते. सांगतो, सांगतो! झालं असं! परवा एका कॉलला गेलो होतो. स्टेशन बाहेर आलो, रिक्षात बसलो, थोड्या अंतरानंतर सिग्नलला रिक्षा थांबली. मंडळी! ट्रॅफिक सिग्नल हे ठिकाण काही सेकंदात-मिनिटांत, मनोव्यापाराचे दर्शन घडवणारी उत्तम जागा! समोरच काही मुलं चाफ्याच्या फुलांची माळ घेऊन गाडीच्या खिडकीजवळ नाचवत हिंडत होती, तर काही मुलं हातातील फड...

अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'

Image
प्रसंग १ "धन्यवाद बाप्पा!" निमिषने गणपतीच्या गाभाऱ्यातील घंटा वाजवली आणि तो काहीवेळ नतमस्तक झाला. मंडळी विचारात पडला असाल ना ! काय झालं? तर कारण असं होतं की निमिषला अमेरिकेतील 'H1B Visa' मिळाला, दोन वेळा संधी हुकली आणि अखेरच्या शेवटच्या चान्समध्ये त्याला लॉटरी लागली. नाहीतर पठ्ठेरावांना बॅग भरून मायदेशी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळी स्वप्ने धुळीस मिळाली असती.( ह्या शब्दप्रयोगाची उत्पत्ती बहुदा डोंबिवलीतच झाली असणार.) "हॅलो बाबा!" निमिषचा फोन. "हां बोल!" "एक मस्त घर बघितलं आहे!" "अरे वा!" "कितीला?" "चार ते साडेचार लाख डॉलरच्या घरात जाईल. (काय गंमत, घराची किंमत घरात, पण कारची किंमत कारमध्ये जात नाही) असो! "लोन तर होईलच, पण काही डाऊन पेमेंट करायचे असा माझा विचार आहे". प्रसंग २ "अरे दोन कडक चहा आण " श्यामने ऑर्डर सोडली. "मी मुलीला सांगितले आहे, तुझ्यासाठी कर्ज काढतो आहे, तुलाच ते फेडायचे आहे." ...

अनुदिनी ५४- ‘वार्षिकी- साईंची पालखी- हमारा बजाज’ / Blog 54 - Annuity in Arrears

Image
बळवंतरावांची नाशिकला बदली झाली. सकाळी कारनेच ते निघाले.थोडे लवकर निघून थेट ब्रॅन्चलाच जाण्याचा त्यांनी प्लॅन केला. वीकेंडला दरवेळेस येणे होणार असल्याने सामान जास्ती घेतले नव्हते. हवेत छान गारवा होता. भिवंडी सोडून पडघ्याच्या रस्त्याला गाडी लागली. रस्त्याच्या कडेने साईंची पालखी घेऊन शिस्तीत ५० ते ६० जणांचा समूह पायी चालला होता. त्यात अधिकतर तरुण मंडळींचाच भरणा होता. बळवंतरावांना या गोष्टीचा थोडा विषाद वाटला. नाही म्हटले तरी आठ- एक दिवस ही पदयात्रा चालणार होती. त्यांच्या मनात विचार आला, एवढे दिवस कामधाम सोडून ही तरुण मंडळी अशी पदयात्रा कशी करू शकतात? आपल्या डोक्यातील कामांची यादी तर 'Bucket list' प्रमाणे वाढतच जाते आहे आणि ही तरुण मुलं खुशाल सलग ७-८ दिवस सर्व कामे सोडून अशी पदयात्रा करत आहेत. कामांच्या यादी वरून त्यांना आईच्या पेन्शनच्या कामाची आठवण झाली. गाडी चालवता चालवता ते स्वतःशी पुटपुटले 'अरे यार हे काम अजून बाकीच आहे' असे म्हणून वैतागून त्यांनी स्टेअरिंगवर दोन्ही हात आपटले. मंड...

अनुदिनी ५३ - 'इन्शुरन्स, ऑनलाईन की ऑफलाईन' / Blog 53 - 'Buying Insurance Online or Offline'

Image
"अरे सॅम, त्या एजन्टने ईमेल केलेले इन्शुरन्सचे प्रपोजल तू ऑनलाईन तपासणार होतास ना?" उश्यांचे अभ्रे घालता, घालता उत्तराने समीर उर्फ सॅमला ढोसले. "हो हो बघीतले गं! ऑनलाईन प्रीमियम वर्षाला जवळपास ३०,००० रुपयांनी कमी आहे." परवाच सॅमचे बाबा त्यांच्या ओळखीच्या वित्तीय सल्लागाराला (Wealth Advisor) घेऊन आले होते. सॅम - उत्तराला गुंतवणुकीविषयी काही अडचणी व शंका होत्या आणि त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन हवे होते. विषयाच्या ओघात सध्या असलेल्या विमापॉलिसींविषयी बोलणे झाले. सॅमने त्यांच्या आग्रहाखातर त्या कपाटातून शोधून आणल्या. तेवढ्यात सिद्धू तेथे आला. त्याची लुडबुड सुरू झाली. खरेतर नवीन व्यक्तीला पाहून तो रडायचा, आरडाओरडा करायचा. पण कसा कोण जाणे तो त्या अनोळखी व्यक्तीच्या मांडीवरच जाऊन बसला. सिद्धूच्या एकंदरीत वागण्यामुळे सॅम - उत्तरा पाहुण्यांसमोर त्याला नेत नसत, चारचौघात त्याला नेणे ते टाळत असत. हो मंडळी,कारणच तसं होतं! सिद्धूला डाऊन सिंड्रोम होता! पण आज त्या अनोळखी व्यक्ती सोबत ...

अनुदिनी ५२ / Blog 52 - 'Planning, Planning & Planning'

Image
नमस्कार मंडळी! "माणूस हा प्लॅनिंग करता नसून माणसासाठी प्लॅनिंग आहे" तर त्यामुळे प्लॅनिंगला किती महत्व द्यायचे हे आपणच ठरवले पाहिजे. अहो, ह्या नियोजनातील अविभाज्य घटक 'भाववाढ'. जो आपल्या हातात नाही. आणि ज्या गोष्टीवर आपण प्रभाव टाकू शकत नाही अशा घटकावर विसंबून आपली आर्थिक गणिते किती अचूक ठरणार? हा, तर मी काय म्हणत होतो! तर, पुढच्या, पुढच्या, म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे किती नियोजन करायच कि वो! मुळात किती योजना आखायच्या? नोकरी लागल्यावर जवानीच्या जोशमधे स्वतःकरता खर्च करतांना ह्या सर्व गोष्टींची जाणीव होत नाही. पस्तीशी पार करता, करता मुलांच्या 'स्कूल' च्या फियांचे आकडे समजायला लागल्या नंतर 'शाळेचे', 'स्कूल' असे बारसे झाल्यावर ऐवढा फरक पडलेला पाहून पश्चिमेकडील ‘DINK' (Double Income No kids) पॅालीसीची आठवण आल्या शिवाय रहात नाही. सालं, आपण वेस्टनकलचर् ऐवढे ईझीली फॅालो करतो तर हे करायला काय हरकत आहे? मोदींना म्हणावं येवढ्या योजना राबवत आहात तरं ही पण ...

अनुदिनी ५१ - गुंतवणुकीत तारखांचे महत्व / Blog 51 - Importance of dates in investments

Image
'बंद करा तुमचे संगीत, ऐका निसर्गाचे गीत' मिहीरने सर्वांना बोट दाखवून समोर लिहिलेला सूचना फलक दाखवला आणि खरोखरच सर्वांच्या गप्पा, हसणे -खिदळणे बंद झाले. कर्नाळा किल्ल्यावरील ट्रेक मिहीरने आई-वडील आणि त्याच्या बहिणींकरिता आखला होता. नुकतीच दिवाळी संपली होती सुदैवाने वीकेंडला लागून सुट्टी आली होती; मस्त ३ दिवस मिळाले. वातावरणात छान गारवा होता. महत्वाचे म्हणजे सर्वांचे मोबाईल डेड झाले होते. "रेंज येत नाही" असा सुरवातीला खूप गाजावाजा झाला. श्वेता तर मिहिरवर ओरडलीच, "अरे काय रे तुला दुसरा स्पॉट नाही मिळाला का?" पण थोड्याच वेळात सगळेजण आसमंतात गुंजणाऱ्या अनोख्या आवाजांनी स्तब्ध झाले. नक्की कळेना हे आवाज प्राण्यांचे आहेत की पक्ष्यांचे. सर्वांचे डोळे आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांचे वेध घ्यायला लागले. दररोज नजरेच्या टप्प्यात 'कावळा' ह्या एकमेव पक्ष्याला बघणाऱ्या त्या सर्वांना ही पक्ष्यांची वैविध्यता म्हणजे नजरेला एक मेजवानीच होती. चारपाच तास कसे गेले ते कळलेच नाही. दमून भाग...

अनुदिनी ५० – Systematic Withdrawal and PPF

Image
नमस्कार मंडळी! काय, कुठे आहात? अहो, म्हणजे काय झालं, मागे आपण वाचलं असेलच की आपले प्रेमळ त्रिकुट, ‘रश्मी-ऋषी-सन्नी’ गोव्याला गेले, म्हणून विचारलं. तुम्ही कुठे बाहेर पडलात की नाही? मी तर आर्थिक नियोजनाच्या गप्पा मारुन, लिहून एकदम बोअर झालो की राव! म्हटलं बुध्दी देवतेचा आशीर्वाद घ्यावा आणि तैलबुध्दी वृद्धिंगत करण्यासाठी मत्स्यआहाराचे हवन करावे; मग निघालो की राव! आपल्या कोकणात, ‘तुरळला.' तेथून पुढे ‘गणपतीपुळे’ आणि 'तारकर्ली' आणि मग परतीचा प्रवास! हां! तर राव, आम्ही आधी विठोबा केला, म्हणजे आधी बाप्पांचे दर्शन घेतले मग पोटोबा करता तारकर्लीला वळलो. तर, मंडळी! ‘तारकर्ली’ ऐकून, सॉरी वाचून आमच्या सारख्या मत्स्यप्रेमी खव्वयांची जीभ एकदम खवळली असेल! काय बरोबर ना! तर मंडळी हे सगळं सांगायचं कारण की, हे आर्थिक नियोजन वगैरे सगळं करायचं कशाला तर, निवांतपणे हिंडता-फिरता यावं, मनासारखे चार पैसे खर्च करता यावेत म्हणूनच ना! ...

अनुदिनी ४९- 'उच्चशिक्षणा सोबत ट्रिपचे प्लॅनींग कसे कराल' / Blog 49 – 'Planning for a trip and funding for MS as well'

Image
रवीवारची सकाळ! रश्मीने डोळे उघडले. तीने मोबाईल चाचपडला, बघते तर ५:३० वाजले होते. रोजचा गजर ६:१५, असे असूनही तिला एकदम ताजंतवानं वाटत होतं. रविवार म्हणून परत लोळत पडावे असे तिला वाटले नाही. हॉलमधे येऊन तीने स्लायडींग विन्डो सरकवल्या. छानशी मंद गार वाऱ्याची झुळूक तिला प्रसन्न करुन गेली. पूर्वेला मंदपणे शुभ्रसा शुक्रतारा झळकत होता. त्याला बघता,बघता तिची तन्द्री लागली. "च ऽऽऽ हा!" रेश्मा एकदम दचकली. ऋषिकेश, हातात चहाचे मग घेऊन समोर उभा. "गुड मॅार्निंग मॅडम!" "अगं, काय!" "उभ्या उभ्या काय झोपतेस!" "अरे नाही रे!" "इकडे ये, तो बघ शुक्रतारा कसा छान दिसतोय. तांबड्या आकाशात ही त्याचं रुपडं कसं खुललंय. सगळं वातावरण कसं एकदम उल्हसित झालंय ना!" "ऋृषी, आपण दिवाळीत मस्त फिरायला जाऊया?" "फिरायला?" "अगं आपलं काय ठरलंय? अगोदर टॅक्स प्लॅनिंग. आता जानेवारी पासून दणादण टॅक्स कापायला सुरवात करतील." "अरे, करु रे! असा एकदम मूड ...

अनुदिनी ४८-'वार्षिकी / Blog 48 - 'Annuity'

Image
"हा, अरे भाई, ये ये!" संदीपने मिलिंदभाईला आत घेतले. संध्याकाळची वेळ होती. घरातली मंडळी डायनींग टेबलभोवती चहाची मस्त तल्लफ भागवत होती आणि सोबत मस्त गरमागरम 'खेकडा-भजी.’ (मंडळी, खेकड्याची भजी नव्हे तर एका विशिष्ठ प्रकारे चिरलेल्या कांद्याची भजी) लगोलग भाईलासुद्धा चहाचा कप आला. संदीपची आई, 'लीलाकाकू' वय वर्षे ६५. शाळेतून निवृत्त झालेल्या त्यांच्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय सुचवण्यासाठी 'मिलिंदभाई' चे आगमन झाले होते. आता लीलाकाकू पेन्शनधारक होत्या, दोन्ही मुले कर्ती-सवरती झाली होती त्यामुळे 'गुंतवणुकीच्या फ्रंटवर' त्या निवांत होत्या. असणारी पेन्शन देखील त्यांना वापरायची गरज पडत नव्हती. येत असलेली काही पेन्शन सरळ बँकेत रिकरिंग खात्यात व काही मुलांच्या आग्रहाखातर म्युच्युअल फंडात, SIP मध्ये जात होती. मोठ्या मुलाच्या ऑफिसमधील मेडिक्लेम पॅालीसीत त्यांचे नाव होते. थोडक्यात मंडळी, लिलाकाकू चांगला बँकबॅलन्स ठेवून होत्या आणि मस्त आनंदाने दिवस जगत होत्या, ढकलत नव्हत्या....

अनुदिनी ४७ - 'साडूभाऊ आणि मेडीक्लेम-रिचार्ज' / Blog 47 – ‘Co-brother and Mediclaim recharge’

Image
काय, कसा काय झाला गणपती उत्सव? आपला हा भाद्रपद महिना एकदम भरगच्च असतो ना? असतो फक्त गणपती बाप्पाचा उत्सव पण १० दिवस फुल जल्लोष. मंडळी, नाक्यावर आमच्या मित्रांच्या गप्पा चालल्या होत्या. बोलता बोलता एका मित्राच्या साडूभाऊंचा विषय निघाला. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यांनी सेकंड ओपिनियन घेतले आणि मग ठरवून रीतसर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता दिल का मामला म्हणजे जरा नाजूकच की! पण, हा साडूभाऊ एकदम बिनधास्त. ऑपरेशन थेटरमध्ये नेईपर्यंत ‘OTT’ वर मस्त सिनेमा बघत होते. झालं काही नाही, डॉक्टरांना ग्राफीमध्ये दोन ठिकाणच्या रक्तवाहिन्या (Blood Vessels) जरा जास्तच अरुंद दिसल्या. ग्राफिच्या ऐवजी ‘बायपास’ करणेच योग्य ठरणार होते. मग केली की राव! काय करता? परत परत कोण हा उद्योग करेल? दोन सोडून तीन ठिकाणी केली. आता खर्च विचारू नका. जसे ‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ’ विचारू नये म्हणतात तसे एकदा का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले की डॉक्टरांचे बिल विचारू नये. भरून मोकळे होणे हा एकमेव पर्याय असतो. आता तुम्ही म्हण...