अनुदिनी ५५ - 'H1B Visa आणि घर' / Blog - 55 'H1B Visa and House'
प्रसंग १ "धन्यवाद बाप्पा!" निमिषने गणपतीच्या गाभाऱ्यातील घंटा वाजवली आणि तो काहीवेळ नतमस्तक झाला. मंडळी विचारात पडला असाल ना ! काय झालं? तर कारण असं होतं की निमिषला अमेरिकेतील 'H1B Visa' मिळाला, दोन वेळा संधी हुकली आणि अखेरच्या शेवटच्या चान्समध्ये त्याला लॉटरी लागली. नाहीतर पठ्ठेरावांना बॅग भरून मायदेशी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळी स्वप्ने धुळीस मिळाली असती.( ह्या शब्दप्रयोगाची उत्पत्ती बहुदा डोंबिवलीतच झाली असणार.) "हॅलो बाबा!" निमिषचा फोन. "हां बोल!" "एक मस्त घर बघितलं आहे!" "अरे वा!" "कितीला?" "चार ते साडेचार लाख डॉलरच्या घरात जाईल. (काय गंमत, घराची किंमत घरात, पण कारची किंमत कारमध्ये जात नाही) असो! "लोन तर होईलच, पण काही डाऊन पेमेंट करायचे असा माझा विचार आहे". प्रसंग २ "अरे दोन कडक चहा आण " श्यामने ऑर्डर सोडली. "मी मुलीला सांगितले आहे, तुझ्यासाठी कर्ज काढतो आहे, तुलाच ते फेडायचे आहे." "हो ना, नाहीतर ही मुले एकदा का तेथे मिळवायला लागली की, नवनवीन घड्याळच घे, लॅपटॉप घे, मोबाईलच घे दर महिन्याला काही ना काही तरी खर्च चालूच." "त्यापेक्षा हे बरे एकदा का लोनचा हप्ता सुरु करून दिला की ३ ते ४ वर्षात लोन संपून जाईल." प्रसंग ३ "अहो, काल मयुरीचा फोन आला होता, तुम्ही लवकर झोपलात म्हणून तुमच्याशी बोलणं झालं नाही." "काय म्हणतायत मॅडम?" "तिने घर बघितलं आहे. ४ लाख डॉलर्स पर्यंत जाईल तर आपण किती मदत करू शकतो असं विचारत होती." मंडळी ! आपण हिशोब केला असेलच ! ४ लाख डॉलर्स म्हणजे झाले की हो तीन-सव्वातीन करोड! आणि नाही म्हणायला १०% डाऊन पेमेंट करायचे ठरवले तरी झाले की हो तीस लाख रुपये. आता आई-वडिलांनी आपल्या पन्नाशीत अशा प्रकारचे धाडस करणे कितपत योग्य? मग करायचे काय? मंडळी, परदेशस्थित उच्च शिक्षणासाठी लोन घ्यायचंच नाही. काय ! दचकलात ना ! योग्य गुंतवणुकीचे पर्याय योग्य वेळी निवडलेत तर हे नक्कीच शक्य आहे. त्याने काय होईल असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर लोन न काढल्याने साहजिकच ते फेडण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे घराचे डाऊन पेमेंट करण्याची रक्कम मुलांकडून विनासायास उभी राहील आणि ह्याची कल्पना मुलांना अगोदरच दिल्याने त्यांच्याकडून वायफळ खर्चसुद्धा होणार नाही. आता मुद्दा असा उपस्थित होतो की अरे अजून ३-४ वर्षे थांबून पैसे जमवून मग घर घेता नाही का येणार? राव, मुद्दा योग्य आहे पण अडचण अशी आहे की, तुम्ही तिथे भरत असलेले घराचे भाडे आणि घराचा हप्ता हा जवळपास सारखाच भरतो. त्यामुळे, कशाला उगीचच भाडे भरत बसा. त्यापेक्षा स्वतःचे घर घ्यावे. आणि मंडळी! तेथील सर्वसामान्य टुमदार, आजू-बाजूला हिरवाईने नटलेली घरे बघता, घर घेण्याचा मोह न होणं म्हणजे समोर सुहास्य-वदना माधुरी दीक्षित-नेने असताना डोळे मिटण्यासारखे आहे. तर, मंडळी आपण काय कराल? आपली मुले तेरा - चौदा वर्षांची असतांना त्यांचा शैक्षणिक कल विचारात घेऊन पदव्युत्तर शिक्षणाकरता वाढीव तरतूद करण्यास घ्यावी. ह्या कालावधीत आपल्याला आर्थिक स्थैर्य आले असल्याने ह्या सात ते आठ वर्षांच्या कालावधीसाठी आपण गुंतवणूक वाढवू शकतो जी मुलांच्या जन्माच्या वेळेस शक्य नसते. कसे ते आपण प्रत्यक्ष भेटी अंती ठरवू. -------------------------------------------------------------------------- |
||
Case 1 “Thanks, Bappa.” Nimish rang the bell in the Ganesh Temple and bowed before God. Friends, you must be thinking by now! What happened? It was that Nimish got the 'H1B Visa' of America. He missed the chance twice and secured it in the last chance with luck. Otherwise, the poor fellow had no choice but to pack up and return home. All his dreams would have gone to dust, ruined. (This phrase must have been coined in Dombivli) “Hello, Dad!" Nimish called on the phone. "Yes, tell me!” “I have seen a nice house.” “Oh, Good!” “How much!” “About 4 to 5 lacs Dollar!” “I will get the loan, but I am considering making some down payment.” Case 2 “Get two cups of strong Tea,” Shyam ordered. "I have told my daughter I am taking a loan for you, and you only will have to repay it.” “Otherwise, these children keep spending impulsively buying things like watches, laptops, mobiles, and so on every month.” “Instead, once they take an education loan and start repaying it, they can repay in 3 to 4 years.” Case 3 “Yesterday, Mayuri had called, but you went to bed early, so I did not wake you,” Mayuri's mother exclaimed. “What was she saying?” “She has seen a house costing about four lacs dollars and asked how much we can help her.” Friends, you must have calculated four lacs dollars, which means about ₹—3 to 3.5 crores.And even a 10% down payment would amount to about ₹. 30 – 35 Lakhs. Is it right for the parents to dare venture into such dead investments at 50? Then what is to be done? Friends, avoid taking loans for higher education in foreign countries. What? Stunned! This is possible if suitable investment options are chosen at the right time. How will this help? Because the loan is not taken, there is no worry about repaying it. This will help the children make the down payment easily. And if the children are kept informed about this in time, they will not spend money on unwanted things. Now, one more point: can the house be bought 3-4 years after the money is accumulated? The point is correct, but the amount of rent paid for the accommodation is almost equal to the amount of EMI paid for loan repayment. So, why pay rent instead of buying a house? And friends looking at the houses with greenery surrounding them, one cannot avoid the temptation to buy them. It is as if you are closing your eyes when the eternal beauty Madhuri Dixit-Nene is standing in front of you. So, Friends, what will you do? Increase the investment portion for the children's higher education when they are about 14 years of age after learning their inclination. As at this juncture you have more financial stability, you can increase the investment for 7 to 8 years, which was impossible at birth. I will tell you how to do this in person when we meet. |
Comments
Post a Comment