अनुदिनी ४९- 'उच्चशिक्षणा सोबत ट्रिपचे प्लॅनींग कसे कराल' / Blog 49 – 'Planning for a trip and funding for MS as well'
रवीवारची सकाळ! रश्मीने डोळे उघडले. तीने मोबाईल चाचपडला, बघते तर ५:३० वाजले होते. रोजचा गजर ६:१५, असे असूनही तिला एकदम ताजंतवानं वाटत होतं. रविवार म्हणून परत लोळत पडावे असे तिला वाटले नाही. हॉलमधे येऊन तीने स्लायडींग विन्डो सरकवल्या. छानशी मंद गार वाऱ्याची झुळूक तिला प्रसन्न करुन गेली. पूर्वेला मंदपणे शुभ्रसा शुक्रतारा झळकत होता. त्याला बघता,बघता तिची तन्द्री लागली. "च ऽऽऽ हा!" रेश्मा एकदम दचकली. ऋषिकेश, हातात चहाचे मग घेऊन समोर उभा. "गुड मॅार्निंग मॅडम!" "अगं, काय!" "उभ्या उभ्या काय झोपतेस!" "अरे नाही रे!" "इकडे ये, तो बघ शुक्रतारा कसा छान दिसतोय. तांबड्या आकाशात ही त्याचं रुपडं कसं खुललंय. सगळं वातावरण कसं एकदम उल्हसित झालंय ना!" "ऋृषी, आपण दिवाळीत मस्त फिरायला जाऊया?" "फिरायला?" "अगं आपलं काय ठरलंय? अगोदर टॅक्स प्लॅनिंग. आता जानेवारी पासून दणादण टॅक्स कापायला सुरवात करतील." "अरे, करु रे! असा एकदम मूड ऑफ करु नकोस!" रश्मी वैतागली. "अरे, एखाद वर्षी टॅक्स भरुन टाकू!" "आणि सनीच्या MS च्या फीचं काय?" "वर्षाला ठरलेली रक्कम बाजूला काढल्या शिवाय इतर खर्च करायचे नाहीत असं ठरलंय ना?" "मंडळी, ऐका! अहो आपल्या ह्या जोडीने त्यांच्या सनीच्या MS च्या शिक्षणाकरिता ₹१.५० ते ₹१.७५ करोडची सोय करायची ठरवलंय." अहो, दचकू नका राव! अहो ह्या MS पायी आजच साठ-सत्तर लाख लागत आहे की! तर, पंधरा वर्षांनी अगदी गेला बाजार ६ ते ७ टक्के जरी भाववाढीचा दर पकडला तर झाले की राव! "हां, तर मी काय सांगत होतो की, दरमहा SIP च्या माध्यमातून साधारण रु.१५,०३४ (वर्षाला रु.१,८०,४१८) जर म्युचलफंडात गुंतवले गेले तर संभावित १६ टक्क्याचा परतावा विचारात घेतला तर त्यांचे स्वप्न पूर्ण होणार होते. आणि म्हणूनच वर्षभरात तेवढी रक्कम बाजूला काढल्यावरच ते इतर खर्चाचा विचार करु शकणार होते. ह्याचीच आठवण ऋषीकेश तिला करुन देत होता. मंडळी, रश्मीचा मूड बघता आता येथुन पुढला नाजूक प्रसंग तुम्ही रंगवा. मी दुसरा प्रसंग रंगवतो. तर ह्याप्रसंगात, सनी कारच्या मागे फुटबॉल ठेवत होता.तर रश्मी छान पैकी हॅट घालून, मस्त गॉगल चढवून, हातात दोन बॅग्ज उचलून ऋषीची वाट बघत उभी! “आ sssलो!” अशी मोठ्याने आरोळी मारत ऋषी दुडक्या चालीने गाडीपाशी आला. मंडळी आपले हे त्रिकूट गोव्याला निघालं की ओ राव! काय म्हणालात आर्थिक नियोजनाचे तीनतेरा करून? नाही, नाही, अजिबात नाही! मग? सांगतो...सांगतो. त्यांनी एक छानसा सुवर्णमध्य साधला. फिरणेसुद्धा आणि आर्थिक नियोजनसुद्धा. कसे, ते खाली दिलेला तक्ता (Table) बघून तुम्हाला कळेल. मंडळी, आपण दोन्ही तक्ते तपासलेत तर आपल्याला समजेल की जी ठराविक रक्कम गुंतवण्याचे त्यांनी ठरवले होते (Ref. Table 1- Column ‘B’ -Rs.1,80,418) त्यापेक्षा कमी रक्कमेने सुरुवात करूनही (Ref. Table 2 - Column ‘B’- Rs. 1,36,867) दोन्ही तक्त्यांमधील सतरा वर्षानंतरची अपेक्षित परताव्याची रक्कम ही सारखीच आहे (Rs.1.50 Cr.) दुसरा महत्वाचा मुद्दा - तक्ता क्र.१ मधील पहिल्या वर्षाची गुंतवणूक (Ref. Table No.1 Column ‘B’-Rs.1,80,418) ही, तक्ता क्र.२ मध्ये पाच वर्षानंतर दिसते (Ref. Table No.2-Column ‘B’- Rs. 1,86,210). मंडळी ह्या स्मार्ट मूव्ह मुळे, पहिल्या वर्षी जवळपास रु ५०,००० कमी भरूनही त्यांचा प्लॅन पूर्ण होईल.आणि त्यामुळे ऋषी-रश्मीला खर्च करायला वाव मिळाला आणि आपल्या ह्या प्रेमळ त्रिकुटाचा गोवा प्लॅन सफल झाला. मग काय, तुम्ही पण निघणार ना दिवाळीत लाँग ड्राईव्हला? मंडळी, आपण काय कराल? एकतर आपले बचतीचे उद्दिष्ट्य, कालावधी, ह्या बाबत सजग रहा. दुसरी बाब, बचत ही आपल्या वाढत्या उत्पन्नाने, एका ठराविक दराने वाढवत चला. त्यामुळे, शिस्तबध्द गुंतवणुकीची सवय लागते आणि त्या निमित्ताने वर्षातून एकदा आपल्या गुंतवणुकीची उजळणी देखील होते. -------------------------------------------------------------------------- |
|||
Rashmi opened her eyes. She searched for her mobile and saw that it was 5:30 a.m. Though her alarm rang at 6:15 a.m. daily, she felt fresh. She did not feel like lying further even though it was Sunday. She came into the hall & opened the sliding windows. A cold, pleasant breeze further freshened her up. Venus shone dimly in the east. She was engrossed in watching Venus. “T ऽऽऽ ea.” Reshmi was stunned. Rishikesh was standing with the tea mugs in hand in front of her. “Good morning, Madam!” “Hey! What's up?” “You are dozing while standing!!” “Oh no man!” “Come here, see that cute Venus. Its beauty has enhanced in the dawn. The entire atmosphere is exuberant, no?” “Rishi, shall we go on a trip during Diwali?” “Trip?” “What have we decided? First tax planning. "Now, from January, they will start deducting the taxes rampantly.” “Let it be, don’t spoil my mood,” Rashmi was annoyed. “Let us pay the taxes this year.” “And then what about Sunny’s MS fees?” “We have decided that unless we keep aside the desired amount, we shall not plan any expenses.” Friends! Rashmi-Rushi wanted to build a Rs.1.50 Cr fund for Sunny's MS. "Don’t get stunned, guys!" The cost of MS fees today itself is ₹—60 to 70 Lakhs. Thus, after 15 years of considering 6 to 7 percent inflation, this amount shall be colossal! “So, I was saying that by investing through SIP every month a sum of ₹. 15,034 (Yearly ₹. 1,80,418) in Mutual funds, then considering an average return of 16% p.a., this dream could be realized”. And that is why they could not think of other expenses before putting aside this amount. Rishikesh is reminding Rashmi of this. Now, you can imagine the incident that followed, considering the mood of Rashmi. Meanwhile, I shall paint a different picture for you. So here, Sunny is keeping the football in the car's boot; Rashmi is waiting for Rishikesh, holding two bags in her hand, and wearing a nice hat & goggles. “Co ऽऽऽ ming,” Called out Rishikesh loudly and came trotting near the car. Friends, this trio is going to Goa. What did you say after ruining all the financial planning? Then? OK, let me tell you. They chose a golden mean. Financial planning along with the trip. How? You will get to know it once you look at the tables below. Friends, if you check both the tables, you will learn that despite starting the investment with a lesser amount (Ref. Table No.2 - Column ‘B’- Rs. 1,36,867) than what they planned, (Ref. Table No.1- Column ‘B’ -Rs.1,80,418), the returns after 17 years remain same i.e., ₹. 1.5 crores. The second important point is the investment shown in the first year of Table No.1 (Ref. Table No.1 Column ‘B’-Rs.1,80,418) is seen after 5 years in Table No. 2 (Ref. Table No.2-Column ‘B’- Rs. 1,86,210). Friends, due to this wise move, the plan will be fulfilled even though they were investing ₹. 50,000 less in the first year. This allowed their plan of going to Goa to become successful as they got the scope to spend the money. So, you shall also go out for a long drive during Diwali, right? Friends, what do you plan to do? First, you should be careful about your aims for savings and their duration. Secondly, increase the savings at a specific rate according to the increase in your income. This helps in inculcating a habit of disciplined saving and allows you to review the investments once a year. |
Comments
Post a Comment