अनुदिनी ५१ - गुंतवणुकीत तारखांचे महत्व / Blog 51 - Importance of dates in investments

'बंद करा तुमचे संगीत, ऐका निसर्गाचे गीत'

मिहीरने सर्वांना बोट दाखवून समोर लिहिलेला सूचना फलक दाखवला आणि खरोखरच सर्वांच्या गप्पा, हसणे -खिदळणे बंद झाले.

कर्नाळा किल्ल्यावरील ट्रेक मिहीरने आई-वडील आणि त्याच्या बहिणींकरिता आखला होता. नुकतीच दिवाळी संपली होती सुदैवाने वीकेंडला लागून सुट्टी आली होती; मस्त ३ दिवस मिळाले. वातावरणात छान गारवा होता. महत्वाचे म्हणजे सर्वांचे मोबाईल डेड झाले होते.

"रेंज येत नाही" असा सुरवातीला खूप गाजावाजा झाला. श्वेता तर मिहिरवर ओरडलीच, "अरे काय रे तुला दुसरा स्पॉट नाही मिळाला का?"

पण थोड्याच वेळात सगळेजण आसमंतात गुंजणाऱ्या अनोख्या आवाजांनी स्तब्ध झाले. नक्की कळेना हे आवाज प्राण्यांचे आहेत की पक्ष्यांचे. सर्वांचे डोळे आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांचे वेध घ्यायला लागले. दररोज नजरेच्या टप्प्यात 'कावळा' ह्या एकमेव पक्ष्याला बघणाऱ्या त्या सर्वांना ही पक्ष्यांची वैविध्यता म्हणजे नजरेला एक मेजवानीच होती. चारपाच तास कसे गेले ते कळलेच नाही.

दमून भागून संध्याकाळी सगळे खाली उतरले. भरपूर व्हिडिओ,फोटो काढून सर्वांच्या मोबाइलच्या बॅटऱ्या उतरल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने मंडळींना घरी पोहोचायची घाई नव्हती. आरामात धाब्यावर बसून गरमागरम जेवण करून सगळे आपापल्या स्थळी पांगले.

"अरे यार......!" मिहीर उठल्या उठल्या स्वतःवर चरफडला.

कारच्या पॉलिसी नुतनीकरणाची (Renewal Date) तारीख काल होती. आदल्या दिवशीचा रिमाइंडर लावला होता पण पिकनिकच्या नादात तो विसरला.

मंडळी, बघायला गेलं तर विसरणे हा सर्वसाधारण मानवी स्वभाव, पण त्यामुळे इकडचे तिकडे होऊ शकते. म्हणजे त्या दरम्यान काही अघटीत घडले तर 'आयोजन -नियोजनाचे' तीन तेरा!

महत्वाची बाब, गाडीच्या पॉलिसीच्या नुतनीकरणासाठी ( Renewal) सवलत (Grace period) मिळत नाही. तारीख निघून गेली तर गाडीची तपासणी (Inspection) करूनच पॉलिसी पुनर्जिवित (Revive) करता येते. पण एक थोडा दिलासा देणारी बाब म्हणजे त्यावरील No Claim Bonus (NCB) ९० दिवसापर्यंत राहतो.

मेडीक्लेमचा प्रीमियम चुकला तर काय? हे सांगण्याची गरज नाही. सुदैवाने पुढील ३० दिवसांत पॉलिसी पुन्हा सुरू करता येते; महत्वाची बाब, No Claim Bonus वर परिणाम होत नाही.

तसेच म्युच्युअलफंड मधील ‘SIP Request’ बँकेतून लागोपाठ ३ वेळा Dishonor झाली तर पुढील ‘SIP Transactions’ खंडीत (Deduction stop) होतात.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) मध्ये आपण ठरवलेली रक्कम जर १ ते ४ एप्रिल या दरम्यान भरली नाही तर पूर्ण १२ महिन्याचे व्याज दिले जात नाही.

तर मंडळी थोडक्यात काय, तर आपले आर्थिक नियोजन-आयोजन किंवा अलर्ट सगळेच ॲपवर टाकून देणे अयोग्य.

आपल्या मेंदूला सुद्धा काही चलन-वलन हे हवेच.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला ह्या अशा गोष्टींची रितसर नोंद करून ठेवा. एका फुलप्रुफ सिस्टीमबरोबर स्वतःलाही अलर्ट ठेवा.

मिहीरने कागदावर लाल पेनने अलर्ट लिस्ट करायला घेतली.

१ ते ४ एप्रिल- PPF

२ ते १० ॲागस्ट - मेडिक्लेम

१२ ते २० नोव्हेंबर - कार पॅा रिन्यूअल

२० ते २७ - क्रेडिट कार्ड पेमेंट

१ ते ५ - इलेक्ट्रिक बिल

आणि समोरच्या पिनअप बोर्डवर कायमची लावून टाकली.

--------------------------------------------------------------------------

“Stop your music and listen to the song of the nature”

Mihir pointed his finger and showed the instructions board to all and all stopped chitchatting and laughing.

Mihir had planned the trek on ‘Karnala fort’ for his parents and sisters.

Diwali had just finished and fortunately a holiday adjunct to the weekend allowed them 3 days of holidays.

The atmosphere was cool and most importantly, the mobiles of all were dead. In the beginning, everybody hyped up their un-pleasantness citing “No Range”. In fact, Shweta asked in dismay “Did you not find any other spot?”

But in a short while, the chirping sounds stunned them and they were perplexed whether these sounds were of animals or birds?

All of them started searching for the birds perching on the trees around. It was a feast for their eyes to see such a variety of birds, as they were used to only seeing crows daily. They did not realise how they spent 4 to 5 hours watching the birds.

Tired and exhausted they all climbed down the fort. Tons of videos and photos had exhausted the batteries of their mobiles. They were not in a hurry to reach home as the next day was a holiday too. After having piping hot food at a roadside ‘Dhaba’ they all reached home and retired.

“OH shit….!” Mihir exclaimed immediately after he woke up.

The car’s policy renewal date had lapsed yesterday in spite of having set the reminder. But due to the picnic he missed it.

Friends, actually forgetfulness is natural to human behaviour. Though, any untoward incident is not expected during such time, if any mishap were to happen, then that could have been the end of all the planning.

Most important is, there is no grace period for renewal of car insurance policy. If the date lapses, fresh inspection of the car has to be conducted only then can the policy be revived. There is a slight relief though. The No Claim Bonus can be claimed up to 90 days.

What if the payment of Mediclaim policy premium is missed? No need to tell. Fortunately, there is a grace period of 30 days to revive the policy. Also there is no effect on the No Claim Bonus.

Similarly, if the SIP requests are dis-honoured by the bank thrice, the future SIP transactions get stalled.

If we don’t pay the decided amount in PPF between 1st and 4th April, then the interest for 12 months won’t get credited to the PPF account.

In short, it is not prudent to set all such reminders on the apps. Our brains also need to be utilised for such tasks.

Please make a note of all such things in the beginning of the year.

Please keep yourself alert through a foolproof system.

Mihir started making an alert list with red pen

1st to 4th April – PPF,

2-10 August Mediclaim

12-20 November – Car policy renewal

20 to 27th Credit card payment

1st to 5th Electricity bill

and pinned it up on the pin up board permanently.

Comments

  1. Nice one. Good important reminders... thank you

    ReplyDelete

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'