अनुदिनी ५४- ‘वार्षिकी- साईंची पालखी- हमारा बजाज’ / Blog 54 - Annuity in Arrears
बळवंतरावांची नाशिकला बदली झाली. सकाळी कारनेच ते निघाले.थोडे लवकर निघून थेट ब्रॅन्चलाच जाण्याचा त्यांनी प्लॅन केला. वीकेंडला दरवेळेस येणे होणार असल्याने सामान जास्ती घेतले नव्हते. हवेत छान गारवा होता. भिवंडी सोडून पडघ्याच्या रस्त्याला गाडी लागली. रस्त्याच्या कडेने साईंची पालखी घेऊन शिस्तीत ५० ते ६० जणांचा समूह पायी चालला होता. त्यात अधिकतर तरुण मंडळींचाच भरणा होता. बळवंतरावांना या गोष्टीचा थोडा विषाद वाटला. नाही म्हटले तरी आठ- एक दिवस ही पदयात्रा चालणार होती. त्यांच्या मनात विचार आला, एवढे दिवस कामधाम सोडून ही तरुण मंडळी अशी पदयात्रा कशी करू शकतात? आपल्या डोक्यातील कामांची यादी तर 'Bucket list' प्रमाणे वाढतच जाते आहे आणि ही तरुण मुलं खुशाल सलग ७-८ दिवस सर्व कामे सोडून अशी पदयात्रा करत आहेत. कामांच्या यादी वरून त्यांना आईच्या पेन्शनच्या कामाची आठवण झाली. गाडी चालवता चालवता ते स्वतःशी पुटपुटले 'अरे यार हे काम अजून बाकीच आहे' असे म्हणून वैतागून त्यांनी स्टेअरिंगवर दोन्ही हात आपटले. मंडळी झाले होते असे की, बळवंतरावांच्या आईची वार्षिकी देणारी योजना (Annuity Scheme) होती. त्याची वार्षिकी दर सहा महिन्यांनी येत असे, शेवटची डिसेंबर मध्ये आल्याचे त्यांना आठवत होते. अचानक मार्च महिन्यात त्यांची आई निवर्तली (expired). आता मधील काळातली म्हणजे 'डिसेंबर ते मार्च’, कालावधीची पेन्शन मिळावी याकरिता त्यांना सगळे कागदपत्र घेऊन विमा कार्यालयात जायचे होते. पण त्यासाठी त्यांना वेळ मिळत नव्हता. विचारांचा डोक्यात नुसता भुंगा चालला होता. मंडळी, कदाचीत आपल्याला माहित नसेल म्हणून सांगतो, 'वार्षिकी योजना' (Annuity Scheme) ह्या विमा कंपनीकडून विकल्या जातात. राव, होत असं की आपल्याकडे विमा योजना ह्या एजंटचे टार्गेट पूर्ण करण्या करताच काढल्या जातात असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे त्यात ती योजना घेणारा विशेष रस घेत नाही. आणि घरी आलेल्या विम्याचे दस्तऐवज, हा एक साधारण 'A-4' साईझ कागद हा बरेचदा त्याचे पाकीट न उघडताच कपाटात ठेवला जातो. त्या मुळे तो सविस्तर वाचणे तर लांबचीच गोष्ट. मंडळी ह्या कागदावरुन मला बजाज स्कूटरची टिव्ही वरील जाहिरात आठवली. त्यात एक शाळेतील मुलगी देणग्या (Donation) जमा करण्यासाठी रस्त्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांना पत्रकं वाटत असते. लोकं तो कागद न वाचताच चुरगळून टाकून देत. ती बिचारी हिरमुसते. तेवढ्यात तिकडून बजाज स्कूटर वरुन एकजण येतो, तिच्या हातातलं माहिती पत्रक ( leaflet) तो घेतो आणि चुरगळतो आणि मग वाटायला सांगतो. तर, मंडळी! आता लोकं तो चुरगळेलेला कागद सरळ करुन वाचतात आणि तीच्या डब्यात पैसे टाकतात. बरे असो... आता बळवंतरावांच्या ह्या न मिळालेल्या वार्षिकीचा मुद्दा आपण समजून घेऊ. तर मंडळी 'वार्षिकी' (Annuity) ही पूर्ण झालेल्या कालावधीसाठी दिली जाते (Paid in arrears). आता बळवंतरावांच्या आईने वार्षिकीचा सहामहीचा पर्याय निवडला होता. ह्याचा अर्थ जर विमा पॉलिसीची सुरवात 'जून' महिन्यात झाली असेल तर वार्षिकी सुरु होण्याचा पहिला महिना हा 'डिसेंबर' असेल आणि त्या नंतर सहामहिन्यांनी म्हणजे 'जून' महिन्यात, अशी वर्षातून दोनदा ती दिली जाईल. तर, मंडळी झाले असे कि गेल्या १०-१२ वर्षांपासून दर सहा महिन्यांनी त्यांच्या बँकेत परस्पर ही वार्षिकी जमा होत होती. अचानक मागच्या मार्च महिन्यात त्या निर्वतल्या (expired). आता बळवंतरावांचा मुद्दा होता की 'डिसेंबर ते मार्च' ह्या कालावधीची वार्षिकी मिळावयास हवी; पण मंडळी मागे सांगितल्याप्रमाणे 'सहा' महिन्याचा कालावधी (डिसेंबर ते मे ) पूर्ण झाला नसल्याने ह्या मधील अपूर्ण काळाची (डिसेंबर ते मार्च) वार्षिकी मिळणार नाही. तर मंडळी, आपल्या न चुरगळलेल्या पॉलिसी विषयी जाणून घ्यायचे असल्यास मला जरूर बोलवा. मी बजाजच्या स्कूटरवरून नाही येणार; पण येईन हे मात्र नक्की! आजची अनुदिनी कशी वाटली हे जरूर 'शब्दांत' कळवा! धन्यवाद! -------------------------------------------------------------------------- |
||
Balwantrao was transferred to Nashik. He started in his Car in the morning. He had planned to leave a bit early and directly reach the branch. He only carried a little luggage as he could come every weekend. The air was pleasantly cool. The Car left Bhiwandi and was on the road to Padgha. On the side of the road, 50 to 60 people were carrying the Palkhi of Shree Sai Baba in a well-disciplined manner. The group mainly comprised of youth. Balwantrao was worried about this because this pilgrimage would require at least eight days to complete. He was thinking, "How could the youth go on this pilgrimage, leaving aside their jobs?" "Like the bucket list, my to-do list is increasing daily, and these young people are going on a pilgrimage." The thought of a To-Do list reminded him of one task – his mother’s pension. He murmured to himself while driving, “Oh hell, this pension task is yet to be completed,” and banged his hands on the steering. It so happened that Balwant’s mother’s scheme was an annuity! She used to get her annuity every six months. She got it last in December, as he remembered. His mother expired abruptly in March. So he was to go to the insurance office with all the documents to claim the pension for 'Jan-Feb-March.' But he could not find time for this. All this thinking was so tiresome for him. Friends, you may not know that insurance companies sell annuity schemes. The general understanding is that the agents sell the policies to meet the targets. Hence, the person buying the policy is not interested in it. The document received at home, generally an A4-sized paper, gets stowed in the cupboard without reading. Friends, this 'paper document' reminded me of the Baja scooter advertisement. One schoolgirl is distributing leaflets to the people on the road. The people would take the paper, roll it into a ball, and throw it away. This was disheartening to that girl. Then, one person comes to her on a Bajaj Scooter. He takes the leaflets from her hand, rolls them into balls, and asks her to distribute them to the people. Friends, now the people would straighten the rolls, read the leaflet, and then donate to the girl. Now, let us understand the topic of this un-dispersed annuity to Balwantrao. Friends annuity is paid in arrears for the completed term. Balwantrao’s mother had chosen the 6 monthly annuity option. This means that if the Commencement month of the policy is in June, the first payment would be made in December, and later, after six months, that is in June. Thus, yearly twice. Friends, for the past 10 to 12 years, the annuity was directly credited to her account every six months. Abruptly, she had expired in March. And the task in front of Balwantrao was – how to get the annuity for the period of 'January to March?' Friends, as I told you earlier, because she expired between those six months, the dispersal of annuity for the period between the six months was not possible as the six months period has not elapsed. Please call me if you'd like to learn more about that 'Unreased' policy. I will come, though not on Bajaj Scooter. Please let me know how you liked this today’s blog. Thank you |
Comments
Post a Comment