अनुदिनी ४७ - 'साडूभाऊ आणि मेडीक्लेम-रिचार्ज' / Blog 47 – ‘Co-brother and Mediclaim recharge’

काय, कसा काय झाला गणपती उत्सव?

आपला हा भाद्रपद महिना एकदम भरगच्च असतो ना? असतो फक्त गणपती बाप्पाचा उत्सव पण १० दिवस फुल जल्लोष.

मंडळी, नाक्यावर आमच्या मित्रांच्या गप्पा चालल्या होत्या.

बोलता बोलता एका मित्राच्या साडूभाऊंचा विषय निघाला.

डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यांनी सेकंड ओपिनियन घेतले आणि मग ठरवून रीतसर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

आता दिल का मामला म्हणजे जरा नाजूकच की!

पण, हा साडूभाऊ एकदम बिनधास्त. ऑपरेशन थेटरमध्ये नेईपर्यंत ‘OTT’ वर मस्त सिनेमा बघत होते.

झालं काही नाही, डॉक्टरांना ग्राफीमध्ये दोन ठिकाणच्या रक्तवाहिन्या (Blood Vessels) जरा जास्तच अरुंद दिसल्या.

ग्राफिच्या ऐवजी ‘बायपास’ करणेच योग्य ठरणार होते.

मग केली की राव! काय करता? परत परत कोण हा उद्योग करेल?

दोन सोडून तीन ठिकाणी केली.

आता खर्च विचारू नका. जसे ‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ’ विचारू नये म्हणतात तसे एकदा का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले की डॉक्टरांचे बिल विचारू नये. भरून मोकळे होणे हा एकमेव पर्याय असतो. आता तुम्ही म्हणाल की, “मेडीक्लेमची पॉलिसी असणारच की राव!”

मंडळी, अगदी योग्य विचार केलात. पॉलिसी तर होतीच पण त्याच बरोबर या साडूभाऊंनी त्यात एक वेगळा पर्याय घेतला होता.

कोणता होता तो पर्याय?

सांगतो… सांगतो!

त्या अगोदर पुढचं ऐका.

पुढे काय झालं, डिस्चार्ज दिल्यानंतर काही दिवसातच हे साडूभाऊ घरात धडपडले, खरोखरच धडपणे 'पडले नाहीत’ आणि झालं की हो फॅक्चर.

आता, बोला!

नुकताच ‘दिल की धडकन’ बरोबर करण्यात साडे चार लाखाचा क्लेम केला होता. आता या पन्नास हजारात काय होतंय?

तर!

साडूभाऊंनी त्यांच्या मेडीक्लेम पॉलिसीत 'Restored and Recharge' (R&R) चा पर्याय घेतला होता.

काय आहे हा पर्याय?

'Restored and Recharge' (R & R) चा पर्याय.

साडूभाऊंनी ‘R & R चा’ पर्याय घेतला असल्याने पहिल्या क्लेम नंतर ती पॉलिसी त्वरीत पाचलाखांसाठी Restored झाली. त्यामुळे ह्या ‘धडपडल्याचाही’ पूर्ण क्लेम त्यांना मिळाला आणि झालेल्या खर्चाने इतरांची दिल की धडकन वाढली नाही.

थोडक्यात काय तर अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच Mediclaim असणे आवश्यक आहे आणि ‘RESTORED AND RECHARGE’ चा पर्याय ही अत्यावश्यक आहे.

तर मंडळी, असा प्रसंग आपल्यावर न येवो ही देवीपुढे प्रार्थना आणि आलाच तर 'निश्चिंत ' आहेच!

So! How was the Ganesh Festival?

This 'Bhadrapad' month of ours is packed with festivities. It’s just the Ganesh Festival, but the ten days are full of gala celebrations and frolicking.

Folks, we friends were chitchatting at the corner one day, and eventually, the subject turned to one of the friends’ co-brothers. The doctor had advised him to go for angiography. After obtaining a second opinion, he was admitted to the hospital.

Being the ailment of the heart, it’s serious. But, this co-brother was carefree and tension-free. He was watching a movie on OTT until taken to the Operation Theatre. The doctor observed too much constriction of blood vessels in 2 places. It was apt to go for bypass rather than angioplasty.

So they did it. As such, who would like to do this over and over again?

Now, please don’t get into the details of expenses. As an adage in Marathi says, “Never search for the genesis of a river and origin of a sage,” one should never ask regarding the hospital bill once the patient is admitted. The only option available is to pay it quietly

You may say, “But he would have a mediclaim policy?” Yes, you are right. He did have the mediclaim policy, and he had chosen one different option in that policy.

What option?

Yes, I will tell you, but before I tell you, please know that after being discharged, this co-brother had a minor accident at home and fractured his arm.

Now, what would you say? He had claimed about Rs. 4.5 Lakhs for his bypass surgery and, again, within such a short span, another medical expenditure. With a balance of just about ₹. 50,000/- in the medical policy would make anyone ponder how he can claim the expenses for fracture.

But the co-brother had chosen the Restore and Recharge (R&R) option, so the policy was restored to ₹. 500,000/- immediately after his first claim. This helped settle all the claims for his fracture expenses and prevented the rising heartbeats of others.

In short, having a Mediclaim Policy with the 'Restore and Recharge' option, like food, clothing, and shelter, is essential.

Friends, God forbid such an incident happen to anyone, but if at all it happens, rest assured, as 'Nishchint' is at your service, always.

Comments

Post a Comment

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'